ZP शिक्षकांसाठी होणार ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’ ! जाणून घ्या परीक्षेसंदर्भात माहिती | ZP Teachers Recruitment

hanuman

Active member
Important.jpg

Marathwada ZP Teacher Motivation Test


: The aim of strengthening and developing the capacity of the teachers to impart updated knowledge to the students, the Divisional Commissioner Sunil Kendrakar has approved the conduct of teacher motivation test for the teachers of Zilla Parishad schools teaching classes 1st to 10th in Marathwada. Instructions have been given to the district level system and the concerned persons in accordance with the organization of the examination. There will be a departmental coordinating committee for the examination. It will include the Chairman Divisional Commissioner, Member Secretary State Education Authority Director, Member Deputy Commissioner Development, Divisional Deputy Director of Education, Chhatrapati Sambhajinagar, Deputy Director of Education Latur.​

शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, विषयज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी; तसेच विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

या संदर्भात १३ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शिक्षक संघटनांची सहविचार सभा झाली होती. त्यात यावर चर्चा झाली होती. परीक्षा आयोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणा व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी विभागीय संनियंत्रण समिती असेल. त्यात अध्यक्ष विभागीय आयुक्त, सदस्य सचिव प्रादेश विद्या प्राधिकरण संचालक, सदस्य उपायुक्त विकास, विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर, शिक्षण उपसंचालक लातूर यांचा समावेश असेल

समितीने प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिकेची प्रत सीलबंद स्वरूपात जिल्हा परीक्षा संनियंत्रण समिती सुपूर्द करणे, समिती सदस्यांनी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्ह्यांना पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष सीइओ जिल्हा परिषद, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), सदस्य अतिरिक्त सीइओ, प्रकल्प संचालक डीआरडीए, डेप्युटी सीइओ (सामान्य प्रशासन)आणि प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था​

याशिवाय आर्थिक नियोजन, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, छपाई, सिलिंग, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांसाठी कस्टडी रूम, ओएमआर मशीन उपलब्धतता, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल, केंद्रनिश्चिती, बैठक व्यवस्था, परीक्षा संचलन सुरळीतपणे पार पाडणे आदी जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.

शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात माहिती


– परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची असेल. निकालानुरूप कुठलीही कारवाई शिक्षकांवर होणार नाही.

– परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शिक्षकांना कळविणे.

– जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक प्रेरणा परीक्षेत सहभागी करून घ्यावे.

– विभागातील परीक्षेसाठी तारीख व वेळ सर्व जिल्ह्यांसाठी एकच असणार आहे.

– परीक्षेची तारीख व वेळ, विहित प्रपत्रे, पेपर तपासणीची तारीख स्वतंत्रपणे कळविली जाणार आहे.

– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र विषयांवर प्रत्येकी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल.

– प्रत्येक प्रश्नपत्रिका ५० प्रश्न, वस्तुनिष्ठ स्वरूपाची व ५० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरास एक गुण, चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा केले जातील.

– परीक्षेचा कालावधी एक तास.

– ५० टक्के व त्याहून अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यास उत्तीर्ण ठरविले जाईल.


ZP Ratnagiri Teacher Bharti 2023


: 725 teachers of Ratnagiri Zilla Parishad were recently transferred to their respective villages on a single day. Previously, 2010 and 2017 Sakil teachers were recruited. Compared to that, there are about 2000 vacancies in the district due to continuous district transfer and retirement. Check Latest Update of ZP Ratnagiri Teacher Recruitment 2023, ZP Ratnagiri Teacher Bharti 2023 at below​

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी डीएड, बीएड पदवीधारकांनी केली आहे. कोकणात परजिल्ह्यातून शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. जिल्हा परिषद शाळा वाचवायच्या असतील तर स्थानिक शिक्षकांना भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करावी, अशी मागणी डीएड, बीएडधारक करत आहेत. पेसाप्रमाणेच स्वतंत्र निकष वापरून कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती करावी, अशी त्यांची मागणी आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ७२५ शिक्षकांची नुकतीच एकाच दिवशी जिल्हा बदली झाली आणि ते आपापल्या गावी निघून गेले. यापूर्वी २०१० आणि २०१७ साकील शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने आणि सेवानिवृत्तीमुळे जिल्ह्यातील सुमारे २००० पदे रिक्त आहेत. दरवेळी परजिल्ह्यातील शिक्षकांची नेमणूक केल्री जाते आणि ते शिक्षक ठरावीक वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून कोकणातील डीएड, बीएड पदवीधारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून मुंबईपर्यंतच्या उमेदवारांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. तरीही भरतीप्रक्रिया करताना ऑनलाइन पद्धतीचाच अवलंब केला जात आहे. त्यामध्ये भरतीसाठी पोर्टल उघडण्यात येणार असल्याने पुन्हा परजिल्ह्यातील उमेदवार भरले जातील. त्यावर वेळीच रोख लावला गेला नाही तर अडचणी निर्माण होतील.

सध्या उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाबदलीविरोधात ओस पडणाऱ्या कोकणातील शाळा वाचवण्यासाठी आता स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. गावागावातील लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत शाळा बचाओ आंदोलन सुरू केले आहे. पाठिंब्याची पत्रे कोकण डीएड, बीएड पदवीधारक असोसिएशनमार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत. असोसिएशनकडे आलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पत्रात कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायचे आणि काही वर्षांनंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परजिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेतात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकवायला शिक्षकच नसतात, अशी स्थिती आहे. यात बदल करण्यासाठी स्थानिक उमेदवारांचीच भरती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.​


ZP Primary Teacher Bharti 2023 Update


: The state government has announced the recruitment of primary teachers vacancies in the state through holy portal. However, due to the decline in the number of points, the students who qualify for ‘Tate’ in the open category will be affected. Out of 15,300 seats in the state, barely 1,600 seats will be available for open category students. For this, there is a demand to reserve 10 percent seats for ‘EWS’ category and 40 percent for open category.​



राज्यात रिक्त प्राथमिक शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, बिंदू नामावलीमध्ये झालेल्या घसरणीमुळे खुल्या प्रवर्गातील ‘टेट’ पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. राज्यात १५,३०० जागांपैकी जेमतेम १६०० जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यासाठी ‘ईडब्लूएस’ प्रवर्गासाठी १० टक्के व खुल्या प्रवर्गसाठी ४० टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे. राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास ६७ हजार जागा रिक्त असल्याने महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे भरती प्रक्रियाच ठप्प असल्याने अनेक शाळा शिक्षकांविनाच भरत आहेत. आता शिक्षक भरती प्रक्रियेला गती देऊन रिक्त जागांपैकी किमान ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, पुन्हा एकदा बिंदू नामावली खुल्या गटातील इच्छुकांच्या मानगुटीवर बसणार आहे.



यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या शिक्षक भरतीमध्ये ५२०० जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी जेमतेम १०० जागा आल्या होत्या. वास्तविक खुल्या प्रवर्गातील इच्छुकांसाठी ४० टक्के जागा राखीव असतात. मात्र, तेवढ्याही जागा दिल्या गेल्या नव्हत्या. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, कोणालाही या वेदनेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आता नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तेनुसार ही प्रक्रिया राबवली जाणार असली तरी मुळात खुल्या गटासाठी कोटाच कमी केला तर न्याय मिळणार कसा? असा प्रश्न खुला प्रवर्ग संघर्ष समितीने केला आहे.

यापूर्वी मराठा समाजाला एसईबीसी कोट्यातून १६ टक्के आरक्षण मिळत होते. मात्र, तेही आता रद्द केल्याने त्याचा फटकाही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसत आहे.​




शिक्षक संवर्गाची आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्याची सन २०२२ मधील शिक्षक संवगांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सदर बदली प्रक्रियेमध्ये ४७८ प्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषद पालघर मधून आंतरजिल्हा बदली झालेली होती, परंतु ९ प्राथमिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीस नकार दिल्याने संबंधित शिक्षकांचे ऑनलाईन संगणक प्रणालीवरील आंतरजिल्हा बदली झालेले आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या मान्यतेने रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांची संख्या ४६९ एवढी आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यावर पालघर जिल्ह्यात एकूण २००२ पदे रिक्त असून हि भरती लवकरच होणे अपेक्षित आहे..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

– रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल १०९१ शिक्षक पदांची होणार बंपर भरती​


जिल्हा परिषद पालघर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचा रिक्त पदांचा गोषवारा

Zilla Parishad Bharti 2023


वर नमूद केल्याप्रमाणे सर्व माध्यमाची रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २.८ नुसार कार्यमुक्त करता येणार नाही.


ZP Teachers Bharti 2023


– The rules for recruitment were fixed nine years ago. The syllabus was also decided for Kedra Pramukh Bharti. Accordingly, many teachers in the state started studying for this recruitment. However, suddenly the rural development department has canceled the direct service quota of 40 percent in the recruitment of this post. Due to this, about 4 thousand 860 posts are vacant. Now When this vacant posts will get filled, this question is arises in many candidates. Know More update about ZP Kendra Pramukh Bharti 2023 at below​

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे तसेच शाळांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने राज्यात दहा ते बारा शाळांसाठी सन १९९४ मध्ये केंद्रप्रमुखांचे पद निर्माण करून ४ हजार ८६० पदे भरली. मात्र, सध्या राज्यात ४ हजार १६० पदे रिक्त आहेत. त्याकरिता केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


पदभरतीसाठी गेल्या नऊ वर्षांपूर्वी नियम निश्चित करण्यात आले. अभ्यासक्रमही ठरविण्यात आला. त्यानुसार या भरतीसाठी राज्यातील अनेक शिक्षकांनी अभ्यास सुरू केला. मात्र, अचानकपणे शासनाच्या ग्रामविकास विभागाने या पदाच्या शासनाच्या ग्रामविकास विभागाने या पदाच्या भरतीतील ४० टक्के सरळसेवेचा कोटा रद्द केला आहे. त्यामुळे तयारी करत असलेल्या सुमारे ३५ हजार शिक्षकांना फटका बसणार आहे.​

ZP Teachers Bharti 2023




सुमारे ३५,००० शिक्षकांना फटका बसणार

भरतीतील ४० टक्के सरळसेवेचा कोटा रद्द केला आहे. त्यामुळे तयारी करत असलेल्या सुमारे ३५ हजार शिक्षकांना फटका बसणार आहे. शासनाने केलेला बदल अन्यायकारक असून, संबंधित कोटा कायम ठेवण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली.

ग्रामविकास विभागाने दि. १० जून ने २०१४ रोजी केंद्रप्रमुख सेवा प्रवेश नियम तयार केले. निर्माण करण्यात आले. त्यावेळेपासून या पदाची भरती पदोन्नतीद्वारे केली जात होती. परंतु, दि. २ फेब्रुवारी २०१०च्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख पदभरतीचे प्रमाण ४०:३०:३० टक्के असे करण्यात आले. त्यावर आधारित ग्रामविकास विभागाने केंद्रप्रमुख हे पद सन १९९४मध्ये दि. १० जून २०१४ रोजी केंद्रप्रमुख सेवा यांच्याकडे केली आहे.​

new-flash-gif-animation.gif



ZP Teachers Bharti 2023


: The latest update for ZP Pramiry Schools Recruitment. As per the latest news, 50 percent of the posts of Head of Center will be filled by promotion and 50 percent of the posts will be filled through limited departmental competitive examination. Further details are as follows:-​

केंद्रप्रमुखाची 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय उक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


ZP Teachers Bharti 2022


ZP Primary School Bharti 2023


शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०१० अन्वये केंद्र प्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळसेवा, पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे ४० : ३०:३० या प्रमाणात निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्राम विकास विभागाने दि.१०.०६.२०१४ रोजी अधिसूचनेन्वये केंद्रप्रमुखाचे सेवाप्रवेश नियम प्रसिध्द केले. संदर्भ क्र.८ येथील शासन निर्णयान्वये सदर पदे भरणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. परंतु सदर कार्यपध्दतीनुसार पदे भरली जात नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे १०० टक्के पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.​

ZP Primary School Recruitment 2023

  • केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत.
  • केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर, ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.


Previous Update –

ZP Teachers Recruitment : जि.प.च्या 30 हजार शिक्षकांची भरती होणार!! जाणून घ्या सविस्तर माहिती


ZP Teachers Bharti 2022: Zilla Parishad Teachers recruitment 2022 will be soon. कमी पटसंख्या (२० पेक्षा कमी) असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे. राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ९७ हजार शाळा असून त्यात सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २०पेक्षाही कमी आहे.​

  • त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे.
  • त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत.
  • दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत.
  • मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही.
  • या पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
  • फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील.
  • साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे.
  • परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.
  • परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘खासगी’त मुलाखतीद्वारे भरती

टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आहे. भरती करण्यासाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना बोलावणे आवश्यक आहे. त्यांची मुलाखत घेऊन खासगी संस्थांवर शिक्षक भरती करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गुणवत्तेनुसार थेट भरती देखील करण्याचा अधिकार खासगी संस्थांना देण्यात आला आहे. त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी जूनपूर्वी मोठी शिक्षक भरती होईल, असेही सांगण्यात आले.​

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • ६०,९१२ – एकूण शाळा
  • ४३,५५,०७० – एकूण विद्यार्थी
  • २,१४,६६० – शाळांवरील शिक्षक
  • २९,६०० – रिक्तपदे


Previous Update –

शिक्षकांची तब्बल 1200 पदे रिक्त!! जाणून घ्या सविस्तर माहिती | ZP Teachers Bharti 2022


: The latest update for ZP Teachers Recruitment 2022. There are a totla of 1218 teachers posts vacant. Further details are as follows:- गावे-वाड्यांमधील गोरगरिबांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात; परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांवर मोठा ताण पडतो आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शिक्षकांची जवळपास १,२१८ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यात मुख्याध्यापक, उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.​

  • रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या १६ लाख असून दोन हजारांहून अधिक गावे-वाड्या आहेत.
  • डोंगर-दऱ्यात, दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत.
  • जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या २,६०३ शाळा असून ९५, ९८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
  • या शाळांमध्ये ५,७४९ शिक्षक कार्यरत आहेत. त्यात ४६ मुख्याध्यापक, ४ हजार ७६१ उपशिक्षक, व ९४२ पदवीधर आहेत.
  • मंजूर पदांपैकी तीस टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
  • तरीदेखील गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक प्रयत्न करीत आहेत.
  • त्यात शासनाच्या वेगवेगळ्या योजना, निवडणुकीची कामे शिक्षकांना करावी लागतात.
  • एकट्या रायगड जिल्ह्यात शिक्षकांच्या ६,९५२ मंजूर पदांपैकी १,२१८ पदे रिक्त आहेत.
  • या रिक्त पदांमुळे जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या कामांवर प्रचंड ताण पडत असून एका शिक्षकाच्या खांद्यावर एक ते दोन शाळांचा भार पडतो आहे; तर काही शिक्षकांना प्रशासकीय कामांत घेतले जात असल्‍याने शाळेतील एका शिक्षकावर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी पडते; तर दुसरीकडे अध्यापनाचे शिक्षण घेऊन हजारो तरुण नोकरीविना बेरोजगार आहेत.
  • सरकारकडून शिक्षकांची भरती करण्यात येत नसल्‍याने बेरोजगारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, तर काही तरुणांनी घरगुती शिकवणी, खासगी क्‍लासमध्ये शिकवण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात केवळ ८६ केंद्रप्रमुख

  • शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रप्रमुख असतात.
  • पंचायत समिती व शाळांमधील दुवा म्हणून केंद्र प्रमुखांकडे पाहिले जाते.
  • जिल्हा परिषद व सरकारच्या वेगवेगळ्या योजना, निर्णय यांच्यामार्फत शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे.
  • जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातील दोन तास तासिका घेणे, शाळांची माहिती गोळा करणे, शाळांना मार्गदर्शन करणे अशी कामे असून प्रत्येक केंद्र प्रमुखाकडे १५ शाळांचा भार दिला जातो; परंतु जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची २२८ पदे मंजूर आहेत.
  • त्यापैकी ८६ केंद्र प्रमुख कार्यरत आहेत, तर उर्वरित पदे रिक्‍त आहेत.
  • अपुऱ्या मनुष्यबळामुळे एका केंद्र प्रमुखाकडे सुमारे ३५ शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिक्षकांची रिक्‍त पदे – Zilla Parishad Teachers Vacancy 2022


मंजूर – कार्यरत – रिक्त

  • मुख्याध्यापक – १३० – ४६ – ८४
  • उपशिक्षक – ५,५४६ – ४,७६१ -८००
  • पदवीधर – १,२७६ -९४२ -३३४
  • एकूण – ६,९५२ – ५,७४९ – १,२१८

तालुकानिहाय रिक्‍त पदे

  • अलिबाग – ६७
  • उरण – ३९
  • कर्जत – १४४
  • खालापूर -८३
  • तळा – ५६
  • पनवेल – १६१
  • पेण – ११०
  • पोलादपूर – ७४
  • महाड – ८६
  • माणगाव – ७३
  • मुरूड – ३६
  • म्हसळा – ७७
  • रोहा – ९१
  • श्रीवर्धन – ५४
  • सुधागड – ६७
    • एकूण – १२१८


Previous Update –

नवीन अपडेट – जिल्हा परिषद शिक्षकांची 31,472 पदे रिक्त!! ZP Shikshak Bharti 2022


: The latest update for Zilla Parishad Teachers Bharti 2022. As per the latest news, There are a total of 31,472 teacher posts vacant in Zilla Parishad. 2,45,591 teachers’ posts are sanctioned in Zilla Parishad but 31,472 posts are still vacant. Further details are as follows:-

राज्यभरात जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नुकत्याच आंतरजिल्हा बदल्या पार पडल्या. त्यासाठी शिक्षकांचे जिल्हानिहाय रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले होते. या रोस्टरनुसार राज्यात मराठी माध्यमाची १६ हजार ७४८ पदे, तर उर्दू माध्यमाची १ हजार ३०१ पदे रिक्त दाखविण्यात आली होती. अशी राज्यभरात एकूण १८ हजार ४९ पदे रिक्त होती. मात्र, एकाच महिन्यात रिक्त पदांची संख्या १ हजार ४०१ ने वाढल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून पुढे आले आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


पुणे येथील प्रदीप दराडे यांनी माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागविली होती. त्यानुसार आता राज्यात जि.प. शिक्षकांची १९ हजार ४५२ पदे रिक्त असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी दिली आहे.३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआर’नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते.​

ZP Teachers Bharti 2022



नवीन अपडेट – जिल्हा परिषद शाळांत शिक्षकांची 18 हजार पदे रिक्त!! ZP Teachers Bharti 2022


ZP Teachers Bharti 2022: There are a total of 18 thousand Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. There was a ban on teacher recruitment in the state since 2011. It was raised in 2012. The recruitment will be soon. Further details are as follows:-​

राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती २०१२ मध्ये उठविण्यात आली. मात्र, साडेतीन वर्षे लोटूनही शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.​

Zilla Parishad School Techares Vacancy Details


ZP Teachers Bharti 2022


  • ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआरनुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते.
  • सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी १८ हजारोवर पदे रिक्त आहेत.
  • २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी २०१९ च्या डिसेंबरमध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली.
  • पावणेदोन लाख डीएड, बीएडधारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या.
  • सध्या कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी.
  • रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे.

ZP Teacher Bharti 2022


ZP Teachers Bharti 2022



जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची 450 पदे रिक्त!! – ZP Teachers Bharti 2022


ZP Teachers Bharti 2022: There are a total of 450 Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. The ZP Shikshak Bharti 2022 will be soon. For more details about ZP Teachers Recruitment 2022, Zilla Parishad Shikshak Bharti 2022, Zilla Parishad Shikshak Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-

जिल्हापरिषदेच्या शाळांत शिक्षकांची ४५० पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही. शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.​

Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
  • शिकविणारेच अपुरे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत.
  • राज्य सरकारने शिक्षक भरती थांबविल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे.
  • ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे.
  • गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरती घेण्यात आली नाही.
  • भंडारा जिल्ह्यात शिक्षकांचा अनुशेष वाढू लागला आहे.
  • शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.
  • समायोजनाच्या नावावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
  • ही परिस्थिती असतानाच गेल्या १८ वर्षांपासून घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविण्यात आले नाहीत.
  • बीए बीएड, पदवीधर तथा अन्य घड्याळी तासिका शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत.
  • या शिक्षकांना तीन हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन देण्यात येते.
  • समाधानकारक मानधन देण्यात येत नसल्याने गावातील शिक्षित तरुण घड्याळी तासिका शिक्षक म्हणून काम करण्यास नकार देत आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पहिली ते चौथीचे वर्ग एक किंवा दोन शिक्षक सांभाळतात. ही पोकळी भरून काढण्याची क्षमता घड्याळी तासिका शिक्षकांत आहे. राज्य शासनाने शिक्षक भरती थांबविली असली तरी घड्याळी तासिका शिक्षक भरतीकडे पाठ फिरविली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे, घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढविणे गरजेचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.​

‘एमपीएससी’ची धास्ती

  • आतापर्यंत शिक्षक बनण्यासाठी डीएड, बीएड व त्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते.
  • परंतु, आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत शासनपातळीवर हालचाली सुरू आहेत.
  • त्यामुळे शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या राज्यातील हजारो तरुणांमध्ये धास्ती पसरली आहे.
  • एमपीएससीचे दिव्य पार केल्यानंतरच पुढे शिक्षक होता येणार आहे.

Other Related Link:

new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif



ZP Teachers Bharti 2022


ZP Teachers Bharti 2022 : There are a total of 700 Teacher posts vacant in Zilla Parishad Schools. The Education Committee has decided to fill 50 of them. There are 40 Thousand Teacher posts vacant in the State. This includes 27,000 posts in Zilla Parishad schools and 13,000 posts in secondary schools. Further details are as follows:-​

Zilla Parishad Shikshak Bharti 2022 | नवीन अपडेट – जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवकरच!!


जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मानधनावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सेस फंडातून 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून 50 शिक्षक नियुक्ती करण्यास समितीने मंजुरी प्रदान केली. या कंत्राटी शिक्षकांना मानधन म्हणून 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या 1518 शाळांमध्ये सातशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. बहुतांश दोन शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. तर काही ठिकाणी एकही शिक्षक नाही.​

  • जिल्हा परिषदेच्या शाळेत 2005 पासून शिक्षकांची भरती बंद आहे.
  • त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येत शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
  • आजच्या घडीला 700च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
  • अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. जिल्हा परिषदेने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्तीचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे.
  • अशा परिस्थितीत त्या शाळेमध्ये शेजारील दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.
  • शासन शिक्षक भरती करेल तेव्हा करेल, परंतु स्थानिक पातळीवर जि. प. ने विद्यार्थ्यांच्या हितार्थ कंत्राटी तत्त्वावर गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • एक शिक्षकी व विषय शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये प्रथम प्राधान्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ZP Teachers Recruitment 2022


राज्यात 40 हजार पदे रिक्त

  • राज्यात सध्या 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
  • यात जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार पदांचा समावेश आहे.
  • या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असून पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार असल्याची माहिती आहे.
  • नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची सुमारे 700 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 50 पदे भरण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.

ZP Teachers Bharti 2022


: There are 1594 teachers and 35 center heads working for 402 primary schools in the taluka. However, there are 165 vacancies for Headmaster, Graduate Teacher, Deputy Teacher and Head of Center. Further details are as follows:-​

ZP Teachers Bharti 2022 | ZP Teachers Recruitment 2022


खेड तालुक्‍यातपुढील शैक्षणिक वर्षाची जिल्हा परिषदेच्या शाळांची तयारी सुरु झाली आहे. शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकर भर दिला जात आहे. तालुक्‍यातील 402 प्राथमिक शाळांसाठी 1594 शिक्षक व 35 केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. मात्र, मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या 165 जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे करोनाच्या कहरानंतर आता शिक्षण क्षेत्रात दर्जा आणण्याची गरज निर्माण झाली आहे.​

  • खेड तालुका शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला तालुका आहे.
  • अंगणवाडी ते सातवीपर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा दर्जा सुधारला आहे.
  • शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुका अग्रेसर असतो.
  • यामुळे इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल कमी झाला आहे.
  • दरवर्षी नव्याने 2 ते हजार विद्यार्थी झेडपी शाळेत प्रवेश घेतात. इंग्रजीसह दर्जेदार शिक्षण प्राथमिक शाळांमध्ये मिळत असल्याने झेडपीच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
  • गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्या व त्यातील विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढली होती.
  • सर्वसामान्य पालक मुलाला इंग्रजी शाळांमध्ये पाठवत होता.
  • मात्र, या शाळांची अवाढव्य फी भरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली नाही.
  • केवळ फी वसुली हे एकमेव उद्दिष्ट ठेवून अनेक शाळा सुरु होत्या त्यावर पालकांनी अनेकदा आवाज उठवले.
  • आंदोलने केली मात्र पालकांची दखल शासन घेत नसल्याने आता पालकांमधून या शाळांकडे जाण्याचा कल कमी झाला आहे.

2 years of epidemics and financial planning collapsed. They cannot afford to pay for English medium schools. This has disturbed the parents. Zilla Parishad school buildings in Khed taluka and its physical facilities are satisfactory. Various necessary facilities are provided to the students in the school. In addition, parents are relieved that there is no need for fees.

शहरातील अनेक विद्यार्थी मराठी शाळांमध्ये शिक्षणासाठी जात आहेत. शाळा इमारती, परिसर स्वच्छता, शौचालये, संरक्षक भिंती, इ- लर्निंग सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची सोय होत आहे. तालुक्‍यातील अनेक शाळांची गुणवत्ता इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा जास्त आहे. निसर्ग चक्रीवादळात तालुक्‍यातील अनेक शाळांना फटका बसला. त्या शाळांच्या दुरुस्तीला झेडपीकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. जुन्या जीर्ण 60 शाळांची दुरुस्ती झाली नाही. 138 शाळांमध्ये मुलींसाठी व 120 शाळांमध्ये मुलांसाठी शौचालये नाही. तालुक्‍यात 163 शाळांना गरजेनुसार संरक्षण भिंत बांधल्या नाहीत. 402 शाळांपैकी 34 शाळांमध्ये इ- लर्निंगचे संच नाहीत.

खेड तालुक्‍यात उपशिक्षकांची 1218 पदापैकी 89 पदे रिक्‍त आहेत. पदवीधर शिक्षकांची 314 पदापैकी 23 पदे रिक्‍त आहेत. मुख्याध्यापकांच्या 62 पदापैकी 36 पदे रिक्‍त आहेत. केंद्रप्रमुख 35 पदापैकी 17 पदे रिक्त आहेत. अशी एकूण 1629 पदांपैकी 165 पदे रिक्त आहेत.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock