MSBSVET कौशल्य, व्यवसाय शिक्षण प्रवेश प्रक्रिया २०२३- MSBSVET Admission 2023 – msbsvet.edu.in

hanuman

Active member
MSBSVET-Admission-2023.jpg


MSBSVET Admission 2023 – msbsvet.edu.in – Maharashtra State Skill, Vocational Education and Training Board Director Yogesh Patil has released the schedule for admission to various certificate courses through a circular. The admission process has been affected for the last three years against the background of Core-Ghana. Students interested in admission can register online till 31st July. After that the institution wise admission will be held from 15th June to 31st July. Admission promotion campaign will be implemented this year to complete the admissions in the training institutes of the state.​



महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे. कोर- घनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर संस्थानिहाय प्रवेशनिश्चिती १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्यातील प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश पूर्ण होण्यासाठी यंदा प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२३ साठीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. मंडळाशी संलग्न असणाऱ्या संस्थांद्वारे कौशल्यांवर आधारित विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतात. यातील अनेक कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. प्रवेश प्रोत्साहन अभियानामध्ये मंडळाच्या अभ्यासक्रमांची माहिती, शिकाऊ प्रशिक्षण योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी, अभ्यासक्रमांची समकक्षता, उच्च शिक्षणाची संधी आदी माहिती विविध माध्यमांतून प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यात आयोजित होणाऱ्या विविध मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन शिबिरे, रोजगार मेळावे यामध्ये संस्थांनी सहभाग घेऊन मंडळाच्या अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी आणि पालकांना द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Msbsvet Important Dates


या वेळापत्रकानुसार १० जूनला संस्थानिहाय उपलब्ध अभ्यासक्रम व प्रवेशक्षमता यादी यांची माहिती प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock