MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, शिफारस यादी आणि अंतिम मेरीट लिस्ट डाउनलोड करा.. | MPSC Rajyaseva 2023 Result

hanuman

Active member
mpsc-logo2-2019.jpg

MPSC Rajyaseva 2023 Result


: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the final result of the State Services (Main) Examination 2021, which was held last year from March 7 to 9, 2021. In this examination, Pramod Balasaheb Chaugule has secured the first position in the state from among the general candidates. While Sonali Arjunrao Mhatre has won the first rank among girls. Also, Vishal Mahadev Yadav has come first from the backward class candidates in the state. This result has been published on the Commission’s website. Accordingly, candidates have been recommended for a total of 405 posts.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल दिनांक १५ जून २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • सदर परीक्षेमध्ये श्री. चौगुले प्रमोद बाळासो बैठक क्रमांक ( PN006079) हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून श्रीमती म्हात्रे सोनाली अर्जुनराव बैठक क्रमांक (AU002180) या महिलांमधून तसेच श्री. महादेव बैठक क्रमांक (PN002131) हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. यादव विशाल​
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन रेषा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.​
  • प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.​
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्दयांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.​
  • प्रस्तुत निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे…​
  • प्रस्तुत निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका / उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांचे कृपया अवलोकन व्हावे.​

newicon.gif


newicon.gif


MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 अंतर्गत जाहीर झालेली शिफारस यादी आणि अंतिम मेरीट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

newicon.gif


163/2022Advt. No. 063/2022 Maharashtra Forest Services Main Examination 2021- Merit List15-06-2023
264/2022Adv. No. 64/2022 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2021 – Merit List15-06-2023
365/2022Adv. No. 65/2022 Maharashtra Electrical Engineering Services Main Examination 2021- Merit List15-06-2023
466/2022Adv. No. 66/2022 Maharashtra Mechanical Engineering Services Main Examination 2021- Merit List15-06-2023

newicon.gif
MPSC Recommendation List 2023

163/2022Advt. No. 063/2022 Maharashtra Forest Services Main Examination 2021- Recommendation List15-06-2023
264/2022Adv. No. 64/2022 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2021 – Recommendation List15-06-2023
365/2022Adv. No. 65/2022 Maharashtra Electrical Engineering Services Main Examination 2021- Recommendation List15-06-2023
466/2022Adv. No. 66/2022 Maharashtra Mechanical Engineering Services Main Examination 2021- Recommendation List15-06-2023
5031/2022Advt No 031/2022 State Services Main Examination 2021 – Final Recommendation List15-06-2023

MPSC Rajyaseva Selection List


:The list of eligible candidates with disabilities for Assistant/Clerical and grace period for State Services Main Examination, 2022 has been published on the Commission’s website. Candidates who are going to appear for MPSC Rajyaseva Mains Exam 2023 can download below list and check your names :​

जा.क्र.099/2022 – राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत








MPSC Rajyaseva 2022 Result


: Maharashtra Public Service Commission has declared the State Services (Pre) Examination 2022 Result. The exam was held on the 21st of August 2022. Click on the below link to download the result.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Rajyaseva Result 2022 Announced


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.​

MPSC State Service Prelims Result 2022

  • प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्य अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
  • आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. ४. मुख्य परीक्षा दिनांक २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा.न्यायालयात । मा.न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात येत आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पध्दतीने सादर करणे आवश्यक राहील त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील.​

MPSC State Service Result 2022



Previous Update –

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 लेखी परीक्षा निकाल जाहीर | MPSC Rajyaseva 2022 Result


: Maharashtra Public Service Commission has declared the State Service Main Exam 2021 Written Examination result. The exam was held on the 7th, 8th & 9th of May 2022. Click on the below link to download the result.​

MPSC State Service Result 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे (MPSC Result) घेण्यात आलेल्या चा निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 1 हजार 279 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये पुणे (PUNE) केंद्राने बाजी मारली आहे. पुणे केंद्रातून एकूण 903 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद केंद्रातून 113, नागपूर केंद्रातून 87, नाशिकमधून 77 मुंबई 75 तर अमरावती केंद्रातून एकूण 24 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. दिनांक सात मे ते नऊ मे या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेच्या निकालासह पात्रतागुणही आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी अपात्र ठरले आहेत, त्यांना जर आपल्या गुणाची पडताळणी करायची असेल तर त्यांनी दहा दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे असे देखील आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक दिनांक सात मे ते नऊ मे या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी एकूण 1 हजार 279 उमेदवार पात्र ठरले आहे. या परीक्षेत पुणे केंद्राने बाजी मारली असून, पुणे केंद्रातील सर्वाधिक 903 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद केंद्रातून 113, नागपूर 87, नाशिक 77, मुंबई 75 आणि अमरावतीमधून एकूण 24 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वातंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.


या परीक्षेत एकूण 1 हजार 279 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वातंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग वीतेने सांगण्यात आले आहे.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

MPSC State Service Mains Result 2022


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ७,८ व ९ मे, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २६ ऑगस्ट, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.​

  • उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
  • लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हतप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा.न्यायालयात / मा.न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.​

Important Links – MPSC Rajyaseva Mains Result 2022


Ne.gif


Ne.gif


Other Related Links:

👈


👈


⏰
👈


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock