MPSC दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020 – सुधारित शिफारस यादी जाहीर | MPSC Duyyam Seva Result 2023

hanuman

Active member
mpsc-office-logo.jpg

MPSC Duyyam Seva Result 2023


: MPSC has Published List of candidates who are eligible for recommendation. Candidates can download revised List of MPSC Subordinate Services Non-Gazetted Group-B Main-2020-State Tax Inspector-Revised Recommendation List from below link. And Check Official MPSC Subordinate Services Cut off From below Table​

MPSC ने शिफारसीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार एमपीएससी अधीनस्थ सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य-2020-राज्य कर निरीक्षक-सुधारित शिफारस यादी खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, MAIN EXAMINATION – 2020 STATE TAX INSPECTOR REVISED RECOMMENDATION CUTOFF

CATEGORYSUBCATEGORYCUTOFF MARKS
OPENGENERAL290.00
FEMALE?7f.O0
SPORTS231.00
SCGENERAL2S9.00
FEMALE2SS.50
SPORTS186. SO
STGENERAL238.00
FEMALE228.00
DT(A)GENERAL274.SO
NT(B)GENERAL
NT(C)GENERAL285.00
FEMALE26S.00
NT(D(GENERAL
OKGENERAL281.00
FEMALE264.50
SPORTS204.50
EWSGENERAL286.00
FEMALE271.50
HWANGBlindness or low Vision260.41
Hearing Impairment260.50
.ocomotor disability or Cerebral paby244.50
ORPHAN165.00




MPSC Duyyam Seva Result 2022


: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Main Exam 2021 State Tax Inspector cadre final result. Click on the below link to download the result.

Candidates who have appeared in the said examination, their marks and scanned answer sheets have been made available under ‘View’ in front of the name of the respective examination in the candidate’s account, also a web link is being provided to the candidates who want to retotal the marks to submit the application for re-totalling. Following steps are required to submit the application along with the prescribed fee through the said web link. :- (1) Click on the link Retotalling of Marks under ONLINE FACILITIES on the Commission’s website .​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मधील राज्यकर निरीक्षक या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक ०८ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.​

सदर परीक्षेस उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. :-​

  • आयोगाच्या या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.​
  • परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉग- इन करावे.​
  • Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.​
  • उपलब्ध होणा-या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून ‘Save’ बटणवर क्लिक करावे.​
  • सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.​
  • गुणांच्या फेरपडताळणीकरिताची सदर वेबलिंक दिनांक ०६ जानेवारी, २०२३ ते दिनांक १५ जानेवारी, २०२३, २३ : ५९ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.​
  • उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरिता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडी वर संपर्क साधता येईल.​

MPSC Duyyam Seva Main Exam 2021 – Final Result


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ व २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण ६०९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक ०८ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.​

  • सदर परीक्षेमध्ये औरंगाबाद जिल्हयातील श्री. पडुळ अक्षय दिवाण, बैठक क्रमांक AU004129 हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून सांगली जिल्हयातील श्रीमती म्हस्के नम्रता ज्ञानदेव, बैठक क्रमांक PN004428 ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून जळगांव जिल्हयातील श्री. अक्षय अनिल परदेशी, बैठक क्रमांक A001054 हे राज्यात प्रथम आले आहेत.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
  • प्रस्तुत निकालात नमुद केलेल्या सर्व शिफारसपात्र उमेदवारांच्या शिफारशी, त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या तसेच आरक्षणाचे दावे/प्रमाणपत्रे विहित प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास, शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

प्रस्तुत अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. (कृपया आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्रमांक ६.४.४ पहावे)​

MPSC Secondary Services Final Merit List


MPSC Secondary Services Mains Result


: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Main Exam – 2020 State Tax Inspector Cadre final result. Click on the below link to download the result.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – 2020 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Secondary Services Final Result 2022


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ११ सप्टेंबर, २०२० व दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब मुख्य परीक्षा – २०२० या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण ८९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक ०१ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

  • सदर परीक्षेमध्ये श्री. शुभम प्रतापराव पाचंग्रीकर, बैठक क्रमांक A0001173 हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून श्रीमती प्रिया भरत मचे, बैठक क्रमांक A0001167 ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून श्री. सागर शांताराम आव्हाड, बैठक क्रमांक PN 002115 हे राज्यात प्रथम आले आहेत.
  • उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
  • मूळ अर्ज क्रमांक १०५५/२०२१ व ६४/२०२२ वरील मा. न्यायाधिकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून अनाथ प्रवर्गाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
  • प्रस्तुत निकालात नमुद केलेल्या सर्व शिफारसपात्र उमेदवारांच्या शिफारशी, त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या तसेच आरक्षणाचे दावे/प्रमाणपत्रे विहित प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास, शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

MPSC Duyyam Seva State Tax Inspector Final Result


दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अधीन राहून त्यांची शिफारस करण्यात येत आहे. यास्तव ती प्रमाणपत्र सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र. अपंग १००३/प्र.क्र.१२७/२००३/१६-अ, दिनांक ६ मे, २००४ मधील बाब क्रमांक (६) नुसार नेमणुकीपूर्वी उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची देखील वैद्यकीय मंडळाकडून पा करुन घेण्यात येईल. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय, क्र. अप्रकि- २०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या अथवा SADM या संगणकीय प्रणालीद्वारे वितरीत करण्यात​

Maharashtra Secondary Services Main Exam – 2020


MPSC Duyyam Seva Result 2022


– Maharashtra Public Service Commission has declared the MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B MAIN EXAMINATION – 2021 merit list & temporary selection list. Click on the below link to download the list.​

MPSC Mains Result 2022 Subordinate Group B

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – 2021 राज्य कर निरीक्षक पदभरतीची गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC कट ऑफ २०२२ बघण्यासाठी तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असून त्या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.​

MPSC Subordinate Services Group B Result

  • सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
  • खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
  • भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
  • भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-online@mpsc.gov.in या ई- मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

MPSC Secondary Services Group-B Main Exam – 2022


MPSC Duyyam Seva Result 2022


– Maharashtra Public Service Commission has declared the MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B MAIN EXAMINATION – 2021 result. Click on the below link to download the result.​

MPSC Subordinate Services Group B Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – 2021 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुक्रमे दिनांक ०९ जुलै, २०२२ रोजी व दिनांक १७ जुलै, २०२२ या दिवशी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा – २०२१ संयुक्त पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामधून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत संवर्गाकरीता मुख्य परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.​

  • प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
  • प्रस्तुत निकालाआधारे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व अर्जात प्राविण्यप्राप्त ( गुणवत्ताधारक) खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १ जुलै, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ व दिनांक ११ मार्च, २०१९ रोजीच्या शुध्दिपत्रकातील तरतुदीनुसार तसेच दिनांक २४ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार विषयांकित अराजपत्रित गट-ब पदाकरिता त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र वैध ठरते किंवा कसे याच्या पडताळणीकरीता सदर प्रमाणपत्र संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या दिनांक १९ नोव्हेंबर, २०२१ या अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वी सादर केल्याची पोचपावती, उक्त दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे संबंधित क्रीडा प्रमाणपत्र व सदर क्रीडा विषयक प्रमाणपत्र गट-ब पदाकरिता वैध ठरत असल्याबाबतचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहील.
  • प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जाद्वारे सादर केलेले दावे / अर्हतेच्या आधारेच निवडीसाठी पात्रता आजमाविण्यात येईल.
  • आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध मुद्यांसंदर्भात मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.​

MPSC Duyyam Seva Main Exam Result – Download Link


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock