MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! या वर्षी तब्बल 3750 जागा! – MBBS 2023 Admission

hanuman

Active member
MBBS-Exams-2020-logo.jpg

MBBS 2023 Admission​


MBBS 2023 Admission – Considering the increasing need of doctors to handle the increasing patient population, Maharashtra has succeeded in taking some positive steps and this year as many as three thousand 750 students will get admission in MBBS first year. There is an effort to set up 12 government medical colleges in the state in the next 12 months and the resolution for the approval of 11 places will be presented in the cabinet meeting. Each college will have a student capacity of 100.​



वाढती रुग्णसंख्या हाताळण्यासाठी डॉक्टरांची वाढती गरज लक्षात घेत काही सकारात्मक पावले टाकण्यात महाराष्ट्राने यश मिळवले असून या वर्षी तब्बल तीन हजार ७५० विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार आहे. राज्यात आगामी १२ महिन्यात १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभी करण्याचा प्रयत्न असून ११ ठिकाणच्या मंजुरीचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता १०० असेल.



राज्यात २०३० पर्यंत प्रथम वर्ष एमबीबीएसच्या तब्बल सहा हजार जागा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पदव्युत्तर जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली असून आता एक हजार ७१० विद्यार्थी- विद्यार्थिनींना ‘पीजी’ करता येणार आहे. २०१४ मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी केवळ ८३२ जागा होत्या. देशात या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्ष एमबीबीएसच्या सुमारे एक लाख जागा तयार होत आहेत. तब्बल ७१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या तमिळनाडूत देशातल्या सर्वाधिक जवळपास सात हजार जागा आहेत.



तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार उत्तम प्रकारे चालावा यासाठी ४५० पदे आदर्श ठरतात.



अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक असे ४० शिक्षक आवश्यक असतात. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग सक्रिय असून येत्या वर्षात बाराशे जागा भराव्यात यासाठी लोकसेवा आयोगाने विशेष कक्ष उभारावा, अशी विनंती करण्यात आली आहे. बिगरवैद्यकीय पदेही लवकरच भरली जातील, असा प्रयत्न सुरु असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले.




MBBS Exams 2021 Changes in Schedule


MBBS Exams 2021 : Examinations for the summer 2021 session of Maharashtra University of Health Sciences are being conducted at 177 various examination centers in the state. On 12th October, 2021, the first, second and third year of the Faculty of Homeopathy has been changed for administrative reasons. Further details are as follows:-

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१ सत्रातील परीक्षा राज्यातील विविध १७७ परीक्षा केद्रांवर घेण्यात येत आहेत. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी होमिओपॅथी विद्याशाखेचे प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाची प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेच्या अभावी परीक्षेस बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेसाठी उद्या १३ ऑक्टोबर रोजी प्रवेश नियामक प्राधिकरणाची मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रशासकीय कारणास्तव होमिओपॅथी विद्याशाखेच्या परीक्षेत बदल करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

सदर परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचित करणेबाबत कार्यवाही करावी असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.​



MBBS Exams 2021 : MBBS परीक्षा लांबणीवर – आता 19 एप्रिलपासून होणार परीक्षा (MBBS Exams 2021). वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. MBBS परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा आता १९ एप्रिलपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार आहे.​



: मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (MCI) ने एमबीबीएस परीक्षांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत…

MBBS Exams 2020 mandatory: मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (MCI) ने एमबीबीएस करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात एमसीआय (Medical Council Of India) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सने एमबीबीएस युनिव्हर्सिटी / कॉलेड परीक्षा आणि एक्स्टर्नल एक्झामिनर्ससंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

या अॅडव्हायजरीनुसार, कोणताही एमबीबीएस अभ्यासक्रम करत असलेला विद्यार्थी परीक्षेशिवाय पुढच्या स्तरावर जाऊ शकत नाही. महाविद्यालयांसाठी एमबीबीएस परीक्षांचे आयोजन करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा देणे आवश्यक आहे.​

MBBS Exams 2020 logo.jpg


कधी होणार परीक्षा?


अॅडव्हायजरीत असं म्हटलं आहे की महाविद्यालये उघडल्यानंतर दोन महिन्यांच्या आत एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात. त्यानंतर एका महिन्याच्या आत फर्स्ट एमबीबीएस युनिव्हर्सिटी परीक्षा घेतल्या जाव्यात.​

सवलत कुठे?


एमसीआय बोर्ड ऑफ गव्हर्नन्सने मेडिकलच्या एमबीबीएस परीक्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत देखील दिली आहे. ही सूट एक्स्टर्नल परीक्षांसाठी एक्झामिनर्सची नियुक्ती आणि परीक्षेच्या पॅटर्नसंदर्भात आहे. पीजी मेडिकल फायनल इयर परीक्षांच्या धर्तीवर एमबीबीएस युनिव्हर्सिटी परीक्षा घेतल्या जाव्यात.

जर करोनामुळे एक्सटर्नल एक्झामिनर्स राज्याच्या बाहेरून उपलब्ध होत नसतील, तर त्याच राज्यातील अन्य विद्यापीठातून परीक्षक बोलावले जाऊ शकतात. या एक्स्टर्नल एक्झामिनर्सना परीक्षेच्या वेळी स्वत: जागेवर शारिरिक रुपात उपस्थित राहावं लागेल. जर हे शक्य नसेल तर अर्धे एक्झामिनर्स जागेवर उपस्थित राहतील तर उर्वरित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होतील.​

सोर्स : म. टा.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock