FYJC Admission 2023- अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख ठरली- वेळापत्रक २०२३!

hanuman

Active member
11th Admission 2021 - 2022

Maharashtra FYJC Admission 2023 Pune, Mumbai, Nagpur, Amravati & Maharashtra


Maharashtra FYJC Admission 2023: The 11th admission process has been delayed this year too. This process, which was announced at the end of May, will now be carried out directly in the month of June. The Directorate of Education has announced the probable schedule of the 11th online admission process to be implemented in Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur municipal areas along with Mumbai. Accordingly, from June 1, students will be able to register for admission online, and the application form will be filled and verified.​



दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला जर पुणे-मुंबई सारख्या महानगरांतील शाळांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आत्ताच तयारीला लागावे लागेल.कारण, अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून, विद्यार्थ्यांना येत्या २५ मे पासून ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत असणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील महानगर पालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यासाठी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे (Pune News) व पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात. २०२३-२४ या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक राज्याचे नवनियुक्त माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी येत्या २० ते २४ मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात, असे देखील राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल. दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येईल, असे राज्य मंडळातर्फे नमूद करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक विद्यालयांना २० मे ते इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाईल. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागणार आहे.​





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock