Air India मध्ये हजार पदासांठी पुन्हा भरती; विविध पदांसाठी नोकरी!। AIR India Bharti 2023

hanuman

Active member
Air-India-logo.png

AIR India Bharti 2023


: Big opportunity for engineers!! Earlier 3,800 jobs have been initialized by Air India in 6 months! Now re-hiring for thousands of posts will start soon in Air India. Candidates who are engineer Graduates can check this New Air India Bharti 2023 Update.​



टाटा समूहाची (Tata Group) विमान कंपनी एअर इंडिया (Air India) मोठ्या प्रमाणावर भरती सुरू करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी, केवळ मुलाखतीच्या आधारे 495 पदांची भरती करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. आता कंपनी 1000 हून अधिक वैमानिकांची भरती करणार आहे. यामध्ये कॅप्टन आणि ट्रेनर्स दोघांचाही समावेश आहे. टाटा समूह आपल्या ताफ्याचा आणि नेटवर्कचा विस्तार करत आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. सध्या या विमान कंपनीत 1800 हून अधिक पायलट्स कार्यरत आहेत. आता गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, वैमानिकांच्या संख्येनुसार एक हजारांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



टाटा समूहाच्या या कंपनीनं बोईंग आणि एअरबससह 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. एअरबसला दिलेल्या ऑर्डरमध्ये 210 A320/321 Neo/XLR आणि 40 A350-900/1000 चा समावेश आहे. याशिवाय कंपनीनं बोइंगला 190 737-मॅक्स, 20 787 आणि 10 777 ची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ताफ्यात 500 हून अधिक विमानांचा समावेश होणार आहे. यामुळे ते आपल्या A320, B777, B787 आणि B737 च्या ताफ्यासाठी कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि ट्रेनर्सची भरती करत आहे.

Ne.gif


वादादरम्यान भरती – एअर इंडिया अशा वेळी वैमानिकांची भरती करत आहे जेव्हा त्यांच्या विद्यमान वैमानिकांनी सॅलरी स्ट्रक्चर आणि सेवा शर्तींबाबत कंपनीच्या अलीकडील निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडियानं 17 एप्रिल रोजी पायलट आणि केबिन क्रूसाठी नवीन सॅलरी स्ट्रक्चर सादर केलं. इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट गिल्ड (IPG) या दोन पायलट युनियननं त्यास नकार दिला आहे. ते कामगार कायद्यांचं उल्लंघन करतं आणि तयार करण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतला गेला नसल्याचं युनियनचा आरोप आहे. एअर इंडियाच्या 1500 हून अधिक वैमानिकांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिलं आहे.


टाटा समूहाकडे एअर इंडियाची कमान पुन्हा आल्यापासून एकामागून एक मोठे निर्णय घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी करण्यावर टाटा समूहाकडून भर दिला जात आहे. आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑर्डर बुक केल्यानंतर आता एअर इंडियामध्ये हजारो पदांसाठी पुन्हा मोठी भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या ६ महिन्यात सुमारे ३ हजार ८०० जणांना नोकरी दिल्यानंतर आता पुन्हा एअर इंडियाकडून विविध पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यात इंजिनिअर्सना संधी असल्याचे म्हटले जात आहे. पायलट म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आणि हवाई वाहतुकीशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. टाटा उद्योगसमुहाकडून त्यांच्या एअर इंडिया कंपनीमध्ये हजारो जागांसाठीची लवकरच भरती जाहीर करण्यात येणार आहे. काही अहवालांनुसार, कंपनीला ६ हजार ५०० पेक्षा जास्त पायलट, अभियंते आणि क्रू मेंबर्सची गरज असून, लवकरच एअर इंडियामध्ये पुन्हा भरती सुरू होणार आहे.

सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती टाटा उद्योगसमूहाने एअर इंडिया कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत मागील सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असून, कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अशातच आता कंपनीकडून विविध पदासांठीची मोठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एअर इंडियामध्ये ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एअर इंडियाकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. तर कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे. एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.​



मागील अपडेट्स आणि जाहिराती

After the merger of ‘Air India’ and ‘Vistara’ as well as ‘Air India Express’ and ‘AirAsia India’, the Air India Group needs thousands of pilots for its expanding fleet. According to some reports, the company is said to need more than 6500 pilots, engineers & crew members. This AIR India Bharti 2023 will begin soon.

एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत, मागील सहा महिन्यांमध्ये तीन हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली आहेत, अशी माहिती कंपनीकडून गुरुवारी देण्यात आली. तोट्यात असलेली एअर इंडिया कंपनी टाटा उद्योगसमूहाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात ताब्यात घेतली. कंपनीकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. त्याशिवाय, सध्याच्या विमानांचे नूतनीकरण करण्यासाठी ४० कोटींची गुंतवणूक करण्यासाठीही कंपनी वचनबद्ध आहे. कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे.



एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. प्रारंभीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले.



एअर इंडिया यंदा ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ७० मोठय़ा विमानांसह ४७० विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय ३६ विमाने भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘७७७-२०० एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत.

टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया १८ हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-२०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात एअर इंडियाने १,९०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि १,१०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.

भारतीय आदरातिथ्याचे प्रशिक्षण

भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

मनुष्यबळाची गरज का?

‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी हजारो वैमानिकांची आवश्यकता आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला ६५०० हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.



जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कॉस्ट कटींग केले जात आहे. त्याचवेळी एअर इंडियाने 470 विमान खरेदी करण्याचा जगातील सर्वात मोठा करार केला आहे. या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट (Pilot) आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियामध्ये काही जागांसाठी तब्बल दोन कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. एअर इंडिया B777 विमानासाठी पायलटची भरती करणार आहे. त्यासाठी वार्षिक दोन कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. अनुभवी पायलटेसाठी ही चांगली संधी असणार आहे. या संदर्भातील पुढील अपडेट्स आंही जाहिरात आम्ही लवकरच महाभरती वर अपडेट्स करू. पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


मागील अपडेट्स आणि जाहिराती



: AIR India has going to conduct walk in interview for the post of “Cabin Crew (Female)”. Intrested and eligible candidates may attend the interview on given mentioned address as per the city. The official website of AIR India is airindia.in. More details are as follows:-​

AIR इंडिया अंतर्गत केबिन क्रू (महिला) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4, 6, 10, 12 जानेवारी 2023 (शहराप्रमाणे) आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नाव – केबिन क्रू (महिला)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, दिल्ली, दिमापूर
  • वयोमर्यादा
    • फ्रेशर्ससाठी – 18 ते 27 वर्षे
    • अनुभवी क्रूसाठी – 32 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता
    • मुंबई – स्क्वेअर मॉल, बी.एन. अग्रवाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, विलेपार्ले, विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व), मुंबई-400057
    • पुणे – हॉटेल ब्लू डायमंड, 11 कोरेगाव रोड, पुणे – 411001
    • दिल्ली – एसेक्स फार्म्स, ४ अरबिंदो मार्ग, आयआयटी फ्लायओव्हर क्रॉसिंगच्या समोर, हौज खास मेट्रो स्टेशनच्या पुढे, नवी दिल्ली – 110016
    • दिमापूर – हॉटेल बाभूळ, पूर्व पोलीस ठाण्यासमोर, दिमापूर, नागालँड – 79711211
  • मुलाखतीची तारीख
    • मुंबई – 10 जानेवारी 2023
    • पुणे – 04 जानेवारी 2023
    • दिल्ली – 06 जानेवारी 2023
    • दिमापूर – 12 जानेवारी 2023

Educational Qualification For AIR India Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
केबिन क्रू (महिला)1. Minimum Educational Qualification: Must’ve completed class 12 from a recognized board /university with minimum of 60% marks.


2. Minimum height required: Female-155 cm (Able to reach 212 cm).

3. Weight: In proportion to height.

4. BMI Range: Female candidates – 18 to 22.

4. Well-groomed with no visible tattoos in uniform.

5. Fluent in English and Hindi.

6. Vision 6/6.

Selection Process For AIR India Jobs 2023

  • वरील भारतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • कृपया मुलाखतीच्या दिवशी तुमचा अपडेट रेझ्युमे सोबत ठेवा.
  • अनुभवी उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी कृपया त्यांच्या SEP कार्डची एक प्रत सोबत ठेवावी.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • वॉक-इन मुलाखत खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार खाली दिलेल्या पत्त्यावर सकाळी 09:00 ते दुपारी 12:30 दरम्यान घेतली जाईल.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For AIR India Mumbai Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock