23 कोटी शेतकऱ्यांना मिळतोय पीक विमा योजनेचा लाभ, तुम्ही घेतला का या योजनेचा २०२४ मध्ये लाभ! – Pradhan Mantri Pik Vima Yojana

hanuman

Active member
Pradhan-Mantri-Pik-Vima-Yojana.jpg

Pradhan Mantri Pik Vima Yojana – सध्या शासन विविध योजना राबवत आहे. यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना. (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) या योजनेच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आर्थिक मदत केली जाते. हि योजना म्हणजे शेतकरी बांधवांसाठी वरदानच आहे. सध्या या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या योजनेअंतर्गत 8 वर्षांमध्ये, सरकारने 23 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1.55 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पीक विम्याचा हप्ता भरून त्यांना पीक नुकसानीच्या बदल्यात ही रक्कम मिळाली आहे. पीएम पीक विमा योजनेतील व्याप्ती दरवर्षी वाढत आहे. शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी स्वेच्छेने या योजनेचे सदस्यत्व घेत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये पीक विम्यासाठी अर्ज करणाऱ्या लोकांच्या संख्येत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, ही संख्या सातत्याने वाढत आहे. याआधी 2021-22 मध्ये शेतकऱ्यांच्या अर्जांच्या संख्येत वार्षिक आधारावर 33.4 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर 2022-23 मध्ये अर्जांच्या संख्येत 41 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती.

या योजने संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Pradhan-Mantri-Pik-Vima-Yojana.jpg




पिक विमा योजना म्हणजे काय?
शेतकरी स्वतःजवळील दागिने, घर, जमीन गहाण ठेवून शेतात काबाड कष्ट करतो व शेती करतो परंतु अतिवृष्टी, वादळ, पूर, गारपीट यांमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो त्यामुळे ज्या शेती पिकावर ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे संपूर्ण जीवन अवलंबून असते त्याचे अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या या सर्व समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी राज्य शासन पीक विमा योजना जाहीर करते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई दिली जाते.

देशातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे भारताला एक कृषिप्रधान देश म्हणून संबोधण्यात येते. देशातील बहुतांश शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब आहे व त्यामुळे तो स्वतःचे जीवन दारिद्र्य रेषेखाली जगत आहे. शेतात कीटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते त्यामुळे शेतकरी शेतात खतांचा वापर करतो व फवारणी सुद्धा करतो परंतु सतत वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकऱ्यास बियाणे, खत, कीटक नाशके खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकरी बँक, वित्त संस्था किंवा साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतो व शेती करतो. परंतु दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व कर्ज फेडू न शकल्यामुळे शेतकरी स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतो. या सर्व गोष्टींचा विचार करून अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार ने 13 जानेवारी 2016 रोजी PM Pik Vima Yojana In Maharashtra सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते. प्रत्येक वर्षी पडणारा अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, गारपीट, कीटकांचा प्रादुर्भाव किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते त्यामुळे या सर्व समस्यांपासून शेतकऱ्याला मदत व्हावी व त्यांना या नुकसानीपासून दिलासा मिळावा यासाठी सरकार ने प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 राबविण्याचा निर्णय घेतला.



प्रधानमंत्री पीक विमा योजना उद्देश​

  1. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  2. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  3. आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  4. शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.
  5. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  6. शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  7. राज्यातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे.
  8. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  9. शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  10. अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थ्येर्य अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  11. शेतात नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा एक उद्देश आहे.
  12. शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थित ठेवणे.



प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट पिके

  • अन्न पीक
  • तेल बिया
  • वार्षिक व्यावसायिक/वार्षिक फलोत्पादन पिके
  • बारमाही फलोत्पादन/व्यावसायिक पिके



प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कोण अर्ज करू शकतो?

  • देशातील सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी आहेत.
  • अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.
  • राज्यातील सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेचे लाभार्थी आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रीमियमची रक्कम​

पिकांची नावेप्रति हेक्टर प्रीमियमची रक्कम
गहू11000.90/- रुपये
बार्ली661.62/- रुपये
मोहरी681.09/- रुपये
हरभरा505.95/- रुपये
सूर्यफूल661.62/- रुपये

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी मिळणारी विम्याची रक्कम​

पिकांची नावेप्रति हेक्टर विम्याची रक्कम
गहू67460/- रुपये
बार्ली44108/- रुपये
मोहरी45405/- रुपये
हरभरा33730/- रुपये
सूर्यफूल44108/- रुपये

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रीमियम रक्कम​

पिकांची नावेप्रति हेक्टर प्रीमियमची रक्कम
तांदूळ713.99/- रुपये
मका356.99/- रुपये
बाजरी335.99/- रुपये
कापूस1732.50/- रुपये
गहू409.50/- रुपये
बार्ली267.75/- रुपये
हरभरा204.75/- रुपये
मोहरी275.63/- रुपये
सूर्यफूल267.75/- रुपये

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य​

पिकांची नावेप्रति हेक्टर विमा रक्कम
तांदूळ35699.78/- रुपये
मका17849.89/- रुपये
बाजरी16799.33/- रुपये
कापूस34650.02/- रुपये
गहू27300.12/- रुपये
बार्ली17849.89/- रुपये
हरभरा13650.06/- रुपये
मोहरी18375.17/- रुपये
सूर्यफूल17849.89/- रुपये



8 वर्षात 23 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

8 वर्षांमध्ये सरकारने 23 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1.55 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पीक विम्याचा हप्ता भरुन त्यांना पीक नुकसानीच्या बदल्यात ही रक्कम मिळाली आहे. पीक विमा योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना प्रत्येक 100 रुपयांच्या प्रीमियमसाठी सुमारे 500 रुपये अदा करण्यात आले आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मते, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (PMFBY) 8 वर्षांमध्ये, 56.80 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज नोंदवले गेले आहेत. 23.22 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे दावे प्राप्त झाले आहेत. या कालावधीत, शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रीमियमचा हिस्सा म्हणून अंदाजे 31,139 कोटी रुपये भरले आहेत. त्या आधारावर त्यांना 1,55,977 कोटी रुपयांपेक्षा जास्त दाव्याचे पेमेंट मिळाले आहे. अशाप्रकारे, शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रत्येक 100 रुपयांच्या प्रीमियममागे त्यांना अंदाजे 500 रुपये दावा म्हणून देण्यात आले आहेत.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock