०७ एप्रिल रोजी आयोजित सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल !! – MPSC Group C Admit Card Download 2023

hanuman

Active member
MPSC Instructions for Filling Application Form 2023

MPSC Typing Skill Test Re-Conduct


: The Maharashtra Public Service Commission conducted the prescribed Typing Skill Test for the posts of Clerk Typist and Tax Assistant in Maharashtra Group-C Service Main Examination – 2021 on 07 April 2023 at the center in Mumbai. It can be seen from the reports received by the candidates that the candidates faced some technical difficulties during the test. Based on the reports received by the commission, the commission has decided to take the following action regarding the typewriting skill test:-​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – २०२१ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक ०७ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथील केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. प्रस्तुत चाचणी दरम्यान उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या असल्याचे आयोगास प्राप्त उमेदवारांच्या अभिवेदनांवरून दिसुन येते.आयोगाकडे प्राप्त अभिवेदनाच्या आधारे प्रस्तुत टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

(१) दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल.
(२) प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी ही आयोगाच्या समक्रमांकाच्या दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमुद मानकांनुसार घेण्यात येईल.
(३) प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचना नव्याने प्रसिध्द केल्या जातील. सदर सूचना या उमेदवारांवर बंधनकारक असतील.
(४) प्रस्तावित चाचणीस अनुपस्थित उमेदवारांचा अथवा चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचा निवडप्रक्रियेकरीता विचार करण्यात येणार नाही.
प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. चाचणीचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

MPSC-Typing-Update.png



MPSC Typing Skill Test Admit Card Download


: Maharashtra Public Service Commission has released hall ticket for Typing Skill Test for the post of Clerk Typist and Tax Assistant. An announcement regarding Admission Certificate has been published on the commission site. Candidates who are going to appear for Clerk Typist and Tax Assistant Typing Skill test can download their admit card from below link:​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदासाठी टायपिंग कौशल्य चाचणीसाठी हॉल तिकीट जारी केले आहे. प्रवेश प्रमाणपत्राबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक टायपिंग कौशल्य चाचणीसाठी बसणार आहेत ते त्यांचे प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०७ एप्रिल २०२३ रोजी नियोजित खाली नमूद संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र असलेल्या व प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत:-​

MPSC Group C Admit Card Download 2023


२. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही.
३. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
५. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
६. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in किंवा support online@mpsc.gov.in या ईमेल आणि/अथवा १८०० – १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
७. टंकलेखन कौशल्य चाचणीची कार्यपध्दती व स्वरुप उमेदवारांना अवगत व्हावे याकरीता आयोगाच्या या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Typing Skill Test > Mock Test’ येथे वेबलिंक स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.​


MPSC Group C Admit Card Download 2023


– As per the notification by Maharashtra Public Service Commission Group C Mains Exam will be on 25th February 2023 and 11th March 2023. Admit card for MPSC Group C Mains Exam 2023 has been issued. Candidates who have cleared MPSC Group C Prelims Exam 2022 can now download MPSC Group C Mains Hall Ticket 2023. Download MPSC Group C Mains Call Letter from the below link.​

२५ फेब्रुवारी, २०२३ व दिनांक ११ मार्च, २०२३ रोजी होणारी MPSC गट क मुख्य परीक्षा हॉलतिकीट उमेदवार च्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवार Account log in करुन आपले हॉलतिकीट download करू शकता.

MPSC Group C Admit Card Download 2023


१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ४ मार्च, २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ कर सहायक करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
२. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
३. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. ५. कोव्हिड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
६. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
७. प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.insupport-online@mpsc.gov.in या ईमेल व / अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

अत्यंत महत्वाचे :-
1. प्रवेश प्रमाणपत्रावरील उपरोक्त मजकूर उमेदवाराने काळजीपूर्वक तपासणे आवश्यक असून यासंदर्भात काही अडचण संदिग्धता असल्यास परीक्षेच्या दिनांकापूर्वीच आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
2. मोबाईल फोन अथवा अन्य दूरसंचार साधने परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात आणण्यास बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मन आहे.
उमेदवारांना सूचना :-

1. परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीबाबत :-
1.1 परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीकरीता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहून उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. 1.2 आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल.
1.3 उमेदवारांची तपासणी झडती (Frisking), ओळख पडताळणी करणे. हजेरी नोंदविणे. सूचना देणे इत्यादी स्वरुपाच्या कार्यवाहीसाठी उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
1.4 परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उदभवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊ
विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 1.5 परीक्षा कक्षामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथ यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.​



Duyyam-Nirikshak-Admit-card-647x800.jpg


How to Download MPSC Group C Services Mains Exam Hall Tickets

  • एमपीएससी ग्रुप सी सेवा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाइट लिंक वापरा
  • प्रथम लॉग इन करण्यासाठी वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरा
  • हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळवण्यासाठी “लॉग इन” बटणावर क्लिक करा
  • भविष्यातील वापरासाठी हॉल तिकिटाची प्रिंट काढा





MPSC Group C Mains Admit Card Download 2023


List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 लिपिक-टंकलेखक (जा.क्र. 113/2022) करिता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.





MPSC Group C Admit Card Download 2022


MPSC Group C Admit Card Download 2022 from the Login link given below. Candidates can login to their MPSC login & Download the Admit Card. The Examination date is 5th November 2022.

५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारी MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा हॉलतिकीट उमेदवार च्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवार Account log in करुन आपले हॉलतिकीट download करू शकता.

MPSC Admit Cards 2022



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock