सैनिकी मुलींच्या वसतिगृहात नोकरीसाठी अर्ज करा, भरती सुरु – Sainik Girls Hostel Bharti

hanuman

Active member
Corona School


Sainik Girls Hostel Bharti -The post of Non-Govt Assistant Hostel Superintendent is to be filled on temporary contract basis in Army Girls Hostel. Interested women have been requested to apply at the District Soldier Welfare Office at Santacruz by the District Soldier Welfare Officer.



सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका पद भरावयाचे आहे. इच्छुक महिलांनी सांताक्रुझ येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षिका म्हणून नेमणूक करावयाची आहे. (पद संख्या – 01) या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मुत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य) तसेच, त्यांचे शिक्षण – दहावी उत्तीर्ण असावे. एमएससीआयटी पास व टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा – 30 ते ५० वर्षे असावी. मानधन रू. २३,२८३/- दरमहा असून, यासाठीची मुलाखत २५ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्जासोबत युद्ध विधवा/ विधवा/ माजी सैनिक/ आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.



अधिक माहितीसाठी ०२२-३५०८ ३७१७, २२७९३३३५. या क्रमांकावर किंवा ईमेल zswo_mumbaiupnagar@maharashtra.gov.in वर संपर्क करावा.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock