सावधान!- केईएममधील सफाई कर्मचारी भरतीचा मेसेज बोगस! | KEM Hospital Mumbai Bharti 2023

hanuman

Active member
KEM Hospital Mumbai Bharti 2023

KEM Hospital Fake Advertisement


गेले दोन दिवस सोशल मीडियावर केईएम रुग्णालयात सफाई कामगारांची मोठी भरती सुरू आहे, असा मेसेज फिरत आहे. मात्र हा मेसेज बनावट असून असे खोटे मेसेज सोशल मीडियावर पसरवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱयांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युवासेना सहसचिव अॅड. मेराज शेख यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.



मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सफाई कामगारांची भरतीबाबतचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सफाई कर्मचाऱयांसह महापालिकेच्या विविध खात्यांतील नोकरभरतीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर वय आणि पगाराचाही उल्लेख थेट नोकरभरती असून त्यासाठी अशोकराव नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबरही देण्यात आला आहे. या जाहिरातीला भुलून पुणे, पालघर, बदलापूर तसेच राज्यातील विविध भागातून तरुण-तरुणी केईएममध्ये दाखल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालय किंवा महापालिकेच्या आणखी कोणत्याही विभागात भरती नसल्याचे केईएम रुग्णालय आणि महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



फसवणुकीला बळी पडू नका!
सोशल मीडियावर फिरणारा मेसेज हा बोगस असून अशा प्रकारे केईएम रुग्णालयात कोणतीही भरती नाही. तरुण, बेरोजगार यांनी अशा प्रकारे बोगस जाहिरातीला बळी पडू नये. कोणत्याही प्रकारे पैशाचा व्यवहार करू नये. मात्र अशा प्रकारात बेरोजगारांची फसवणूक झाली तर त्याला केईएम रुग्णालय प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी स्पष्ट केले आहे.




KEM Hospital Mumbai Bharti 2023 Application


: As there are many vacant posts in the fourth category in KEM Hospital, Mumbai, Recruitment Process will start soon for 211 vacant posts. Smart Facitech Private Limited Company has been qualified and after the approval of the administrators, it is being informed that the workers will be appointed through this organization on a contract basis. So candidates who are searching for Job in KEM Mumbai can apply for KEM Hospital Mumbai Bharti 2023:​

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील अनेक कामगारांची पदे रिक्त असून यापैकी २११ जागांवर बहुउद्देशीय अर्थात मल्टीपर्पज कामगारांची पदे खासगी संस्थांमार्फत भरली जाणार आहे. यासाठी खासगी संस्थांची नेमणूक केली जाणार असून या संस्थेच्या माध्यमातून २११ कामगारांची पदे भरली जाणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


यामध्ये प्रत्येक अकुशल कामगाराला मासिक सुमारे २६ हजार रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या संस्थेच्या निवडीला प्रशासकांची मान्यता मिळाल्यानंतर केईएम रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या नेमणूका केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

केईएम रुग्णालयात चतुर्थ श्रेणीतील अनेक पदे रिक्त असल्याने या २११ पदांसाठी पुढील दोन वर्षांकरता अकुशल कामगारांची नेमणूक करण्यासाठी मागील नोव्हेंबर महिन्यात मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून दरपत्रिका मागवल्या होत्या.त्यामध्ये आय स्मार्ट फॅसिटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली असून प्रशासकांच्या मंजुरीनंतर या संस्थेच्या माध्यमातून कामगारांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. २११ कामगारांच्या नेमणूकीसाठी या संस्थेने दोन वर्षांकरता सुमारे साडे तेरा कोटी रुपयांची बोली लावल्याची माहिती मिळत आहे.​

एवढी मानधनाची रक्कम निश्चित

या संस्थेच्या माध्यमातन नेमणूक केलेल्या कामगाराला मासिक २६ हजार रुपये एवढी मानधनाची रक्कम निश्चित करण्यात आली असून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना भविष्यात महापालिकेच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणतेही फायदे महापालिकेच्या माध्यमातून दिले जाणार नाही असे या निविदेतच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच याबाबतची कोणतीही जबाबदारी महापालिकेची नसेल किंबहुना भविष्यात महापालिकेत नोकरीची हमी दिली जाणार नाही असेही नमुद केले आहे. संस्थेच्या माध्यमातून नेमलेल्या कामगाराला बेसिक ११ हजार ५०० रुपये आणि विशेष भत्ता ७ हजार याप्रमाणे ही एकूण भत्यासह २६ हजार रुपयांचे मासिक मानधन निश्चित करून दिले आहे. त्यामुळे प्रशासकांच्या मंजुरीनंतर संस्थेला कार्यादेश बजावला जाईल त्यानंतर या कंत्राटी अकूशल कामगारांची संस्थेमार्फत नेमणूक करत रुग्णालयात सेवा घेतली जाईल,असे बोलले जात आहे.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock