सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण; प्रवेश प्रक्रिया सुरू

hanuman

Active member
Marine Fisheries Sailing Training

Marine Fisheries Sailing Training 2023


: The 130th Session of Training in Marine Fisheries, Sailing and Marine Diesel Engine Maintenance and Operation has been conducted at Fisheries Training Center Versova, Mumbai Suburb. For this training, a fee of Rs 450 will be charged from the above-poverty-line trainees and Rs 100 from the below poverty line trainees.​

सन २०२३-२०२४ मध्ये दिनांक ०१ जुलै २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात येणार असून मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह दिनांक २३ जून २०२३ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अ. ना. जावळे यांनी केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३० व्या सत्राचे प्रशिक्षण, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५० रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तो १८ ते ३५ वयोगटातील असावा, प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक /आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे दिनांक २३ जून २०२३ पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीकरिता अशोक जावळे, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो.नं. ९८३३२६६२५१ आणि श्री. जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक, मो. नं ७५०७९८८५५२ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.​


Marine Fisheries Sailing Training Details


: The 127th Session Training of Marine Fisheries, Sailing and Marine Engine Maintenance and Operation has been organized at Fisheries Training Center, Versova, Mumbai Suburbs for a period of six months from 01 January 2022 to 30 June 2022. Further details are as follows:-

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण; 127 व्या सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरू. 2022-2023 या वर्षातील, 01 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन या 127 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी, प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये 100/- एवढे राहील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहीत नमुन्यात अर्ज करावा. आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मंबई-61 येथे दिनांक 21 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वर्सोवा, मुंबई. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.​

With a view to the development and expansion of fisheries, a six-month training in Marine Fisheries, Navigation and Marine Engine Maintenance and Operation is being imparted at the Fisheries Training Center to aspiring trainees in Fisheries.

Eligibility Criteria Marine Fisheries Sailing Training


प्रशिक्षणार्थीच्या पात्रतेसाठीचे निकष पुढीलप्रमाणे :-

  • प्रशिक्षणार्थी क्रियाशिल मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीचे वय18 ते 35 या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी किमान4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्ड धारक / आधार कार्ड धारक असावा.
  • प्रशिक्षणार्थीचा विहीत परिपूर्ण अर्ज असावा त्या अर्जावर संबंधित संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास,अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock