शिक्षकांची जवळपास १७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त-शिक्षक भरती अपडेट! – Maharashtra Shikshak Bharti 2023

hanuman

Active member
Pavitra Portal Shikshak Bharti 2023

Maharashtra Shikshak Recruitment 2023 Update


: Currently, there are 32 thousand teachers less than the number of students in the schools of Zilla Parishads, Municipalities and Municipalities in the state. There are 29,000 vacant posts in secondary schools as well. In order to increase the educational quality of students, 30 thousand posts will be recruited from the school education department. The recruitment process will start in April with the announcement of the result of ‘TAIT’ and the posts will be filled before June 12.​



प्राथमिक शिक्षकांच्या भरतीबाबत मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी सोमवारी राज्य शासनास दिले. सुनावणीदरम्यान न्यायालयाचे मित्र ॲड. अजित घोलप यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, नवीन शैक्षणिक वर्ष (२०२३-२४) सुरू होण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी राहिला असून, अद्याप जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. शिक्षकांची भरती हा ‘मूळ मुद्दा’ आहे, तर संबंधित शिक्षकांच्या पात्रतेविषयक (टीएआयटी) परीक्षा घेऊन शासनाने दि. २४ मार्च रोजी निकाल जाहीर केला असल्याचे सहायक सरकारी वकील प्रवीण पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.



खंडपीठाच्या दि. २२ सप्टेंबर २०२२च्या आदेशानुसार शासनाने प्राथमिक शिक्षक भरतीसाठीच्या ‘टीएआयटी’ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दि. १३ ऑक्टोबर रोजी खंडपीठात सादर केले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. त्यावर खंडपीठाने शासनास वरीलप्रमाणे निर्देश दिले. या ‘सुमोटो जनहित याचिकेवर’ दि. २८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे.



TAIT निकाल जाहीर, पण भरती कधी?

  • २०१७ साली एकदाच टीएआयटी परीक्षा झाली होती. त्यानंतर ती परीक्षा झाली नव्हती. तेव्हापासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही.
  • परिणामी छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता राज्यात प्राथमिक शिक्षकांची जवळपास १७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, असे यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले.
  • मात्र, खंडपीठाच्या दि. २२ सप्टेंबर २०२२च्या आदेशानुसार शासनाने परीक्षा घेऊन दि. २४ मार्च रोजी निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याची घोषणा केली; परंतु तातडीने याची अंमलबजावणी करणे आवश्यक असून विकासाच्या नुसत्या गप्पा नकोत. त्याची परिपूर्ती मे महिन्याअखेर पूर्ण झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण विभाग शिक्षणसेलचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्यशासन शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्या केल्या त्यामुळे जागा रिक्त आहेत. २०१० पासून शिक्षकांची भरती केली नाही. नवीन शैक्षणिक धोरण, नवीन वर्ष जून २०२३ पासून राबवले जाणार आहे; परंतु रिक्त जागा शिक्षक नाहीत त्यामुळे शिक्षणक्षेत्र उद्ध्वस्त होईल. अनेक शिक्षकांना नुसते राबवून घेतले जात आहे. त्यांना संचमान्यता देऊन वेतन अदा केले जात नाही. उपशिक्षण संचालकाकडून वेतन आयडी क्रमांक दिला जात नाही. भ्रष्टाचाराची गंगा वाहत आहे. सामान्य शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

त्यात नवीन शैक्षणिक धोरणात डीएड्धारकांना नोकरीत ठेवले जाणार नाही. त्यांनी करायचे काय? त्यांचे वेतन, नोकऱ्या धोक्यात आहेत. पेन्शन योजना लागू नाही. बीएड्चा कोर्स चार वर्षाऐवजी दोन वर्षाचा ठेवावा. त्यात सर्व अभ्यासक्रम पुरा करावा, अशी मागणी अनिलकुमार जोशी यांनी केली आहे. शिक्षकांची ५० हजार पदे रिक्त होत असून, ती भरावीत. नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक धोरणाची माहिती, प्रशिक्षण द्यावे. त्यांना पूर्ण वेतन, पेन्शन द्यावी. सेवाशाश्वती, संरक्षण, रोजगार द्यावे, अशी मागणी शिक्षणतज्ञ अनिलकुमार जोशी यांनी राज्य शासनाकडे केली आहे.



Shikshak Bharti for 30,000 Posts will begin soon through . This recruitment process will be carried through Pavitra Portal. The Bharti will be start before this Education year. More details are given below. Also more updates about Shikshak Bharti 2023 publish on Mahabharti.

School Education Minister Deepak Kesarkar informed in the Legislative Assembly on Thursday that teachers are being recruited through the School Education Department and before the start of the new academic year in the state, 30 thousand teachers will be recruited and their names will appear on the sacred portal.​



राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत ३२ हजार शिक्षक कमी आहेत. तर माध्यमिक शाळांमध्येही २९ हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी त्यातील ३० हजार पदांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून केली जाणार आहेत. ‘TAIT’ चा निकाल जाहीर झाल्याने एप्रिलमध्ये भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून १२ जूनपूर्वी पदे भरली जाणार आहेत.

आता जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीनेच त्याठिकाणी संबंधित उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती होणार आहे. खासगी अनुदानित संस्थांना मात्र दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्या संस्थेतील रिक्तपदासाठी एका जागेसाठी एक की दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे, याचा निर्णय संबंधित संस्थेनेच घ्यायचा आहे. पण, त्या पदभरतीवर शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. भरतीपूर्व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात त्यांना पदभरतीच्या अनुषंगाने सूचना दिल्या जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन महिन्यानंतर पुन्हा पदभरतीची संधी
राज्य सरकारने १० नोव्हेंबर २०२२ रोजी एक आदेश काढला आहे. त्यानुसार शासकीय पदांची भरती करताना काही कारणास्तव एखाद्या विभागाला पहिल्या टप्प्यात पदभरतीस अडचणी आल्या, तर त्यांना तीन महिन्यांनी पुन्हा पदभरतीची जाहिरात काढून भरती करता येणार आहे. त्यासाठी बिंदुनामावली अद्ययावत असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय कक्षाकडून त्याची पडताळणी करावी लागणार आहे. तर शिक्षक भरती ही २०२२-२३च्या आधार बेस्‌ड संचमान्यतेवर होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे १५ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील १५ हजार पदांची भरती होईल.

शिक्षक होण्यासाठी आता ‘टेट’ बंधनकारकच
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांच्या ‘टेट’चा निकाल २४ मार्च रोजी जाहीर केला. त्यात जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांना दोनशेपैकी १००पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्या उमेदवारांना आता त्यांचे प्रोफाइल तयार करावे लागणार आहे. दरम्यान, पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक म्हणून अर्ज करणारा उमेदवार ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेला असावा. तर कोणत्याही शाळांवर शिक्षक होणारा उमेदवार ‘टेट’ उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शिक्षक भरतीसाठी त्या उमेदवाराला अर्जच करता येत नाही.​




राज्यात एप्रिल अखेरपर्यत तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. आधारजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास नवीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TET) घेण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे टेट परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.



पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षक भरतीबाबत लक्षवेधी मांडली होती. यावर दिपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे राज्य सरकारचे ध्येय असून, एप्रिल अखेरपर्यंत तीस हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली. केसरकर म्हणाले, ‘शिक्षकभरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे.



ही प्रक्रिया एप्रिल अखेर पूर्ण करण्यात येईल. या पदभरतीमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. या पदभरतीमध्ये कला विषयाच्या पदांचा समावेश नाही. हे शिक्षक ‘समग्र शिक्षा अभियाना’मधून भरण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार भरतीची कार्यवाही करण्यात येईल.’ राज्य सरकारने नेमलेल्या एजन्सीच्या माध्यमातूनच कला शिक्षक घेतले जातील, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.



सेवानिवृत्त सैनिकांच्या माध्यमातून शिक्षण
राज्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयांचे शिक्षण देण्यासाठी सेवानिवृत्त सैनिकांना शिक्षण खात्यात नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आगामी काळात बीपीएड पदवीधर आणि सेवानिवृत्त सैनिक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शारीरिक शिक्षण देता येईल, असेही दिपक केसरकर यांनी सांगितले.





कोणत्याही शाळेत गेलो की तेथे एकच सूर आळवला जायचा, तो म्हणजे काय करावं शिक्षकांची संख्याच कमी आहे. तर दुसरीकडे नवीन शिक्षक म्हणायचे शिक्षणसेवक म्हणून मानधन खूपच कमी आहे. आता मुलांचा पट चांगला असतानाही शिक्षकांअभावी शिक्षणाचा खेळखंडोबाच झाल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने ६६ हजार ७०० रिक्तपदांपैकी ३२ हजार शिक्षकांची म्हणजे जवळपास ५० टक्के पदभरतीचा निर्णय घेतला आहे. त्यातून काहीसा फरक पडेल, पण शिक्षकांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय शैक्षणिक प्रगती अशक्यच आहे.

सर्व अपडेट्स आम्ही .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



एकाचवेळी तब्बल ३२ हजार ३०० शिक्षक भरती होण्याची दहा-बारा वर्षांतील पहिलीच वेळ असेल. शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांवर अतिरिक्त कामाचाच ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाचवा, सहावा अन् सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही अनेक शिक्षकांनी स्वेच्छानिवृत्तीचा सुखकर मार्ग चोखाळला. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याचे सर्वेक्षण आहे. या सर्व प्रकारानंतर शिक्षकांची हवी तशी भरती झाली नाही. शैक्षणिक संस्थांचे विविध प्रकारचे अनुदान पूर्वीसारखे राहिले नाही. संस्थांना शासकीय यंत्रणेबरोबर सतत लढावे लागते. त्यातच शिक्षकांची कमी झालेल्या संख्येचे त्यांच्यासमोर मोठे आव्हानच होते.

शिक्षण सेवकांच्या मानधनात दहा हजारांची भरघोस वाढ केली आहे. त्यानुसार, पहिली तीन वर्षे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांवरील शिक्षण सेवकाला १६ हजार तर माध्यमिक शाळांवरील शिक्षण सेवकांना १८ हजार आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार मानधन मिळणार आहे. मात्र, शिक्षणासारख्या पायाभूत सुविधेत रिक्त पदांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढल्याशिवाय शैक्षणिक प्रगतीचा आलेख पूर्णपणे उंचावणार नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.​



राज्यातील खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास दहा वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे सध्या तब्बल ६७ हजार पदे रिक्त झाल्याची शिक्षण विभागाची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, आता ५० टक्के पदे भरली जातील. त्यात खासगी संस्थांमधील १७ हजार तर शासकीय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ हजार पदे आहेत. शिक्षक होण्यासाठी ‘टेट’चे बंधन असून त्याची परीक्षा नुकतीच पार पडली असून आता या महिन्यातच परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर गुणवत्ता यादी प्रकाशित होऊन शिक्षक भरती सुरु होईल.​



मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचा पदभरतीसाठी टीईटी परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणार आहे.



२०१७ नंतर आता २०२३ मध्ये टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या वेळी १२ हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करीत असून ७ हजार ९३० शिक्षकांची भरती करण्यात आली होती. आता शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. टीईटी परीक्षेत दोषी असलेल्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.


Maharashtra Shikshak Bharti 2023 Salary Details


-All the educationists expressed the feeling that the government should take a decision about the promising recruitment in the budget, the recruitment of teachers should be done urgently in the educational institutes which are counting the last element. The severity of the vacant posts of professors was noticed. With more than a century of stalled teacher recruitment, more than 60 per cent vacant faculty posts and dwindling permanent staff. More Update about Maharashtra Shikshak Salary 2023 are as given below.​

शाळांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते. त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.



मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यात शिक्षक पद भरती करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. एकूण मान्यतेच्या 50 टक्के शिक्षक पद भरती केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. शिक्षकभरती नंतर शिक्षकेतर भरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पदभरतीनंतर रिक्त पदांचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तसेच शाळांमध्ये नियमित कामकाज सुरळीत होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असल्याने आधार जोडणीचे काम सुरू आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्या कळू शकेल आणि शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सुधाकर अडबाले, आमशा पाडवी, अभिजित वंजारी, जयंत पाटील, कपिल पाटील, अरुण लाड आदींनी सहभाग घेतला.


शिक्षक भरतीची कार्यवाही सुरु- महत्वाचा अपडेट जाहीर

राज्याच्या शैक्षणिक विकासनिधीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पण, शिक्षकांविना ओस पडत चाललेल्या संस्थांचे करायचे काय? हा मोठा प्रश्न आहे. सरकारने अर्थसंकल्पात पदभरतीबद्दल आश्वासक निर्णय घ्यायला हवा, शेवटच्या घटका मोजत चाललेल्या शिक्षण संस्थात शिक्षकांची भरती तातडीने करावी, अशी कळकळीची भावना शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली. सर्व अपडेट्स आम्ही .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Shikshak-Recruitment-800x698.jpg


राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल शिक्षणतज्ज्ञांचे मत जाणून घेताना प्राध्यापकांच्या रिक्त पदांची तीव्रता लक्षात आली. एक तपाहून अधिक काळ रखडलेली शिक्षक भरती, ६० टक्क्यांहून अधिक रिक्त प्राध्यापकांची पदे आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेले कायमस्वरूपीचे कर्मचारी यामुळे शैक्षणिक संस्थांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींचे मात्र सर्वांनीच स्वागत केले. खासगी विनाअनुदानित संस्थेचे प्रतिनिधी रामदास झोळ सांगतात, “अर्थसंकल्पात मुलींसाठी चांगल्या तरतूदी केल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे. केवळ शासनाने केलेल्या तरतूदी आणि अनुदानांच्या वितरणाचे काम प्रशासनाने योग्य पद्धतीने करावे एवढीच अपेक्षा.” तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर सांगतात, “राज्यातील काही विद्यापीठांना ५०० कोटींचे अनुदान घोषित केले आहे. निश्चितच विकासकामांसाठी फायदा होईल. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवरप्राध्यापकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.​


Maharashtra Teacher Bharti 2023


The condition of Marathi schools in the state is bad. Schools are closing in many places due to lack of enrollment. Despite the availability of qualified Ded teachers, teachers were not recruited for the past several years. But now, soon there will be recruitment of 30000 teacher posts in the state. School Education Minister Deepak Kesarkar also gave this information while replying to a written question in the Legislative Assembly yesterday. After that today Minister Girish Mahajan gave information about this in the hall.​

‘टेट’ परीक्षेचा निकाल आता १५ दिवसांत जाहीर होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील शिक्षकांची भरती केली जाणार आहे. एकाचवेळी साधारणत: ३२ हजार ३०० शिक्षकांची भरती होणार आहे. पंधरा वर्षांतील ही सर्वात मोठी भरती असल्याची माहिती शिक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.सर्व अपडेट्स आम्ही .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

सेवानिवृत्ती, आकाली मृत्यू, पटसंख्या वाढ, स्वेच्छानिवृत्ती अशा विविध कारणांमुळे राज्यातील एक लाख शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे वाढली आहेत. मागील सहा वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने आता रिक्त पदे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दोन लाख ४० हजार उमेदवारांची ऑनलाइन ‘टेट’ परीक्षा नुकतीच पार पडली. त्याचा निकाल २० मार्चपूर्वी जाहीर केला जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त महेश पालकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

एप्रिल-मे मध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे

‘टेट’ निकालानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.



राज्यातील खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील सहा वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे तब्बल ६७ हजार शिकांची पदे रिक्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच शाळांची संचमान्यता होणार आहे. २०२२-२३ च्या संचमान्यतेवर शिक्षक भरती राबविली जाणार आहे. मात्र, त्यासाठी शाळांमधील आधार क्रमांक असलेल्या आणि विशेषत: ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफाय झाले, तीच पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार त्या शाळांमधील रिक्त पदे निश्चित करून पदभरतीस मान्यता दिली जाणार आहे.




राज्यातील मराठी शाळांची अवस्था बिकट आहे. पटसंख्या अभावी अनेक ठिकाणी शाळा बंद होत आहेत. पात्रता धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती. परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.

आमदार राजेश एकडे आणि इतरांनी विधानसभेत काल यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे भरती जातील अशी माहिती दिली.

दरम्याम, मंत्री दीपक केसरकर यांनी मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात देखील याबाबतची माहिती विधानसभेत दिली होती. “येत्या नव्या वर्षात राज्यात 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थ खात्यानं शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50 टक्के पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा त्यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्याचसोबत, महाराष्ट्रातील कोणतीही शाळा बंद करणार नसून, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचा खुलासाही दीपक केसरकर यांनी त्यावेळी केला होता.​



: More than 576 posts of teachers are vacant in the Sindhudurga district.The request to be made to the district collector to immediately recruit the vacant posts of teachers in the primary education department of Sindhudurga and give opportunity to the local D.Ed holders in that place. And The Necessary action should be taken as soon as possible to get justice for the local unemployed. is the demand for filling Maharashtra Shikshak Bharti 2023, Maharashtra Primary Shikshak Bharti 2023

सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर तात्काळ भरती करून त्या ठिकाणी जिल्ह्यातील स्थानिक डी.एड धारकांना संधी द्यावी, अशी मागणी युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान सद्यस्थितीत जिल्हयात ५७६ हून अधिक पदे शिक्षकांची रिक्त आहेत.


तर बदली होऊन जाणाऱ्यांना कार्यमुक्त केल्यास हीच संख्या १००० च्या वर जाणार आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरात-लवकर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत आज त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

त्या निवेदनावर युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, योगेश तावडे, तानाजी पालव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ५७६ जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे डी.एड पदवीधारक तरुणांच्या बेरोजगारीचा आकडा सुद्धा मोठा आहे. या रिक्त पदावर जिल्ह्यातील युवकांना संधी दिल्यास यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटू शकतो. तसेच बदली होऊन जाणाऱ्या पर जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. ती कार्यवाही झाल्यास आणखीन बरीचशी पदे रिक्त होणार आहेत. आणि त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड धारकांना होईल. तरी या संदर्भात सकारात्मक ती भूमिका घेऊन आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.​


Maharashtra Teachers and non-teaching staff Salary Details


– Education Minister Deepak Kesarkar announced that there will be an increase in the salary of teachers and non-teaching staff in the state. For this the government decision has been issued and teachers will get an increased salary from January 1, 2023. So those who have not yet applied for TAIT Exam 2023 must apply, after clearing exam you will get Increased salary as per given below :​

शिक्षकांचे काम हे फार जबाबदारीचे काम असून नव्या पिढीला घडवण्याचे काम शिक्षक करतात. गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून आहेत. शिक्षकांनी मोकळेपणाने शिक्षण देण्याचे काम करावे यासाठी शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. सरकारी शाळेवर पालकांचा विश्वास वाढत असून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.




नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती केली जाईल, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पा-टप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा, अशी अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान आज वेंगुर्ला नवा बाग बीच येथील झुलत्या पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी ‘माझा वेंगुर्ला’ पतंग महोत्सवाचे उद्घाटन आणि वेंगुर्ला नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देखील करण्यात आले.

⏰


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला.

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde)


राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून, यासाठी तब्बल 2 लाख 40 हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे.



राज्यातील बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्तच पडल्या आहेत. या जागा भरण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. सन 2017 मध्ये पहिली चाचणी परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी 1 लाख 91 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 72 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परिषदेला उपस्थिती लावली होती. त्यानंतर पाच वर्षात ही अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षाच झाली नव्हती. शिक्षक भरतीकडे आस लावून बसलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेण्याबाबतची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे अनेकदा केली होती. अखेर त्याची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.

उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र 17 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी दररोज दोन बॅचेस करण्यात येणार आहेत. जास्त नोंदणी झालेल्या महत्वाच्या शहरात परीक्षेसाठी एखादी बॅच वाढविण्याचे नियोजनही करावे लागणार आहे.



राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु, शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Maharashtra Teachers and non-teaching staff Salary


मराठी बाबत ग्रेडिंगचा पर्याय

शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिली पासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.

शिक्षकांचे सुधारित मानधन – Maha Shikshak Salary

– प्राथमिक, उच्च प्राथमिक १६००० रु.
– माध्यमिक १८००० रु.
– उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय २०००० रु.
– शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ
मानधन १४००० रु.
– प्रयोगशाळा सहायक १२००० रु.
– कनिष्ठ लिपिक १०००० रु.
– चतुर्थ श्रेणी कर्मचारी ८००० रु.


Maharashtra Shikshak Bharti 2023 Exam Date


– Maharashtra Shikshak Bharti Exam Date and Kendriya Vidyalay Bharti Exam coming in the same week, and thousands of students in the state are worried about missing out. After five years, both processes are taking place and lakhs of students are facing the question of which exam should be given priority. Now its a big question for students how to appear for KVS Exam and Maha Shikshak Bharti Exam 2023.​

अभियोग्यता चाचणी, केंद्रीय शिक्षक भरती दोन परीक्षा एका आठवड्यात

राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (टीएआयटी) वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरू झाली. परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. ‘टीएआयटी’कडे राज्यातील पाच लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

विद्यार्थ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण संधीवर पाणी फिरण्याची शक्यता झाल्या आहेत. फेब्रुवारीला सुरू होत आहे ती सहा मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये परीक्षांचा कालावधी प्राथमिक, माध्यमिकस्तरावरील पीआरटी, पीजीटी, टीजीटी परीक्षा २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यानच होणार आहे. त्यामुळे काय करावे, असा एकच प्रश्न डीएलएड, बीएड पात्रताधारकांना असून दोन्हीकडे तयारी करणाऱ्या पडला. मंगळवार सकाळपासून विद्यार्थ्यांची संख्या लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाबाबत आहे. वेळापत्रक एकच आल्याने सोशल मीडियावरुनही नाराजी व्यक्त आहेत. त्याचेही वेळापत्रक आल्याने राज्यातील लाखों विद्यार्थ्यांना एका केली.​

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे. या संर्भातील पूर्ण माहिती आणि आपण बघू शकता. “(TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे. अधिक माहिती व येथे बघा

Exam from 22nd February to 3rd March, deadline 8th February for online applications

The Teacher Aptitude and Intelligence Test-2022 (TET) online examination for the recruitment of teachers through sacred system in local bodies, private schools in the state will be conducted from February 22 to March 3. Candidates can apply online for this exam from 31st January to 8th February and this exam will be conducted through IBPS company.

Teacher recruitment process will be implemented in the state. For that, aptitude and intelligence test was announced by school education department. Therefore, lakhs of candidates in the state were paying attention to when the exam schedule will be announced. State Examination Council Deputy Commissioner Sanjay Kumar Rathod announced the examination schedule through a circular.​


Maharashtra Shikshak Recruitment 2023 New Update


Maharashtra Shikshak Bharti 2023 – TET Examinations will be scheduled soon, the Timetable of these examinations will available on 31 Jan 2023. More updates & details are given below. In the coming 3 months Maharashtra Government will fill 30 thousand Teachers Posts Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced here on Wednesday. He also explained that the state government is positive about implementing the old pension scheme. The recruitment of teachers has been closed since 2012 in the state. Fadnavis said that 30 thousand posts of teachers will be filled in the next three months. Let’s See When Maharashtra Shikshak Bharti 2023 actually started for this Keep Visiting MahaBharti.in​

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे. या संर्भातील पूर्ण माहिती आणि आपण बघू शकता. “(TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे. अधिक माहिती व येथे बघा



प्रवेशपत्र १५/०२/२०२३ पासून ऑनलाईन उपलब्ध असणार आहेत.परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेले होते. शिक्षक आमदार निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सदर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.​







राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ (टेट) ही ऑनलाइन परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार असून, आयबीपीएस या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष लागले होते. राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी परीक्षेचे वेळापत्रक परिपत्रकाद्वारे जाहीर केले.


परीक्षा घेण्यासाठी परीक्षा परिषदेने आयबीपीएस या कंपनीची निवड केली आहे. या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांना ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येईल. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. तर १५ फेब्रुवारीपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून घेता येईल. परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती, कालावधी याबाबतची अधिसूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी दहावी, बारावी, पदविका, पदवी आदी शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, अपंगत्व, राखीव प्रवर्गातील असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेले अद्ययावत रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी, स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाइन अर्जात अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षेबाबत पुढील कार्यवाहीसाठी लघुसंदेश, ईमेलद्वारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता अचूक देणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

तर उमेदवारी रद्द!


ऑनलाइन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल, निकाल घोषित केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेली माहिती आणि मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.




Previous Update (मागील अपडेट)

पहिली ते बारावीच्या वर्गांव शिक्षक होण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक क्षमता व अभियोग्यता चाचणी (टेट) उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. जिल्हा परिषद असो वा खासगी अनुदानित शाळांवरील नवीन शिक्षकांना त्याशिवाय मान्यताच दिली जात नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा आता फेब्रुवारीअखेरीस घेतली जाणार आहे.



‘टेट’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असून जेईई व सीईटीच्या धर्तीवर ‘टेट’ घेतली जाणार आहे. साधारणत: साडेतीन लाख परीक्षार्थी ही परीक्षा देतील असा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. दररोज आणि तीन सत्रातील पेपरसाठी प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असणार आहेत.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ‘आयपीबीएस’ व ‘टीसीएस’ या कंपन्यांकडील जवळपास दहा हजार केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन पार पडेल. परीक्षा केद्रांची यापूर्वीच निश्चिती झाली असून दररोज तीन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका असेल आणि पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना दोन तासांचा वेळ मिळेल. दररोज साधारणत: २५ ते ३५ हजार विद्यार्थी देतील, अशी व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पेरीक्षेची केंद्रे असणार आहेत.




राज्यात येत्या तीन महिन्यात शिक्षकांची ३० हजार पदे भरली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

शिक्षक मराठवाडा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे. आम्ही ती पुन्हा सुरू करीत आहोत. येत्या तीन महिन्यांत शिक्षकांची ३० हजार पदे भरली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.​


Maharashtra Shikshak Bharti 2023 – Latest Update


: The latest update for Teachers Recruitment 2023. Also the PESA Shikshak Bharti 2023 update is published now. For more updates keep visiting us. As per the latest, There are a total of 1405 teachers posts vacant. Teachers Recruitment 2023 will be soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. For more details about Shikshak Recruitment 2023 Maharashtra, Teachers Bharti 2023, visit our website . Further details are as follows:-​

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील वर्षानुवर्षे भरती न केल्यामुळे शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त आहेत. एकट्या पालघर जिल्ह्यात मराठी माध्यमाची सर्वात जास्त ४४८१, तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी १७ पदे रिक्त आहे. उर्दू माध्यमाची पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त ३६ पदे रिक्त आहेत, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ३ पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एकही जागा रिक्त नसल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाने शिक्षक बदली पोर्टलवर ४ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केलेली आहेत.

राज्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त


अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची भरतीच करण्यात न आल्यामुळे ७ हजार १८७ पदे सन २०१४ पासून रिक्तच आहेत. अनुसूचित क्षेत्रात व बिगर अनुसूचित क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दरवर्षी बदली, सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या पदांपैकी अनुसूचित क्षेत्रात रिक्त होणारी पदे, जास्तीत जास्त एकूण रिक्त पदांच्या २० टक्के पदे दरवर्षी स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरावयाची आहेत. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, राज्यपालांच्या आदेशालाही शासन-प्रशासन जुमानत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष
राज्यपाल यांनी ९ जून २०१४, १४ ऑगस्ट २०१४, ३१ ऑक्टोबर २०१४, ३ जून २०१५ रोजी अधिसूचना काढलेल्या आहेत. या अधिसूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मार्च २०१५ व २६ जून २०१५ रोजी शासन निर्णय काढले. यानंतरही राज्यपाल यांनी ९ ऑगस्ट २०१६ आणि २३ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिसूचना काढल्या. परंतु या अधिसूचनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील पदे भरण्यात आलेली नाहीत.

जिल्हा, माध्यम निहाय शिक्षकांची रिक्त पदे
जिल्हा, मराठी, उर्दू
१) अहमदनगर २८, ००
२) अमरावती १६५, १४
३) धुळे ५३, ७
४) गडचिरोली २६५, ००
५) जळगाव १८२, १२
६) नांदेड १२६, ००
७) नंदुरबार ३००, ३१
८) नाशिक ४१७, ० ३
९) पालघर ४४८१, ३६
१०) पुणे १७, ००
११) ठाणे ५३३, १४
१२) यवतमाळ ५०३, ००
१३) चंद्रपूर ००, ००



शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरुण-तरुणी परीक्षा देतील, असा अंदाज आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी ‘टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.



उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरू आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.







Pavitra Portal Shikshak Bharti 2023


महाराष्ट्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या नव्या शैक्षणिक वर्षात (Academic Year) राज्य सरकार (Maharashtra News) तब्बल 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती (Teachers and Non-Teaching Staff) करणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची आधार जोडी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची एकूण संख्या कळेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी काल (गुरुवारी) विधानसभेत बोलताना म्हटलं आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – D.ed / B.Ed and More
  • पद संख्या – अंदाजे 30 हजार
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Eligibility Criteria for Educational Maharashtra Shikshak Recruitment 2023:

  • Education Qualification: D.ed / B.Ed and More. For Post wise Education Details follow the detailed advertisement.
  • Age Limit:
    • Open Category-18 to 38 years
    • Reserved category – 18 to 43 years.

Teachers Recruitment Application Fee

  • Open category – Rs. 500 /-
  • Reserved category – Rs. 250 /-

शिक्षण मंत्री दीपक केसरकरयांनी दिलेल्या नवीन माहिती नुसार महाराष्ट्रात लवकरच ३०,००० पदांची शिक्षक भरती राबविण्यात येणार आहे.​


Teachers Recruitment 2023 | education.maharashtra.gov.in 2023

Organizer NameMaharashtra Education Department
Recruitment NameMaha Teachers Recruitment 2023
Post NameTeachers
Total Number of Vacancies
Job TypeGovernment Job
Job LocationMaharashtra
Age LimitOpen Category-18 to 38 years
Pay Scale / SalaryUpdate Soon
Application ModeOnline/ Offline
Last Date for Online ApplicationUpdate Soon
Official Website


Reserved category – 18 to 43 years.

मार्चपर्यंत शिक्षक भरती पूर्ण होईल


New Update on 28th Dec 2022 : शिक्षक भरतीसंदर्भात मार्चपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण शिक्षक भरती पूर्ण होईल, अशी माहितीही आज विधानसभेत लक्षवेधीवरील चर्चेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्री दीपक केसरकर यांनी सांगिंतले की, शिक्षकाला नोकरीत भरती होताना आपला विभाग निवडावा लागेल. एकदा विभाग निवडल्यानंतर संबंधित शिक्षकाला त्या विभागातच राहावे लागेल. मार्चपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षक भरती पूर्ण होईल. त्यानंतर शिक्षकांची कमतरता भासणार नाही

Maharastra Teachers Recruitment 2023 maharashtra.gov.in


येत्या नव्या वर्षात राज्यात 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थ खात्यानं शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50 टक्के पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याचसोबत, महाराष्ट्रातील कोणतीही शाळा बंद करणार नसून, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचा खुलासाही दीपक केसरकर यांनी केला आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भरती संदर्भात माहिती देताना म्हटले की, “50 टक्के शिक्षक भरती लवकरच केली जाणार आहे. 80 टक्के भरती करता आली असली, पण सध्या आधारकार्ड लिंकिंग सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची निश्चित संख्या ठरेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती होईल.” पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, “परवानगी मिळाली तर 100 टक्के भरती करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे. डिसेंबर 31 पर्यंत आधार लिंक करण्याचं काम होईल आणि त्यानंतर एक महिन्यानं सर्व कामांचा मेळ घेतला जाईल, पण भरती न थांबवता 50 टक्के भरती ही ताबडतोब केली जाईल, यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती होईल.” अशी घोषणा केसरकरांनी यावेळी केली आहे. तसेच, नव्या वर्षात 30 हजार प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे.

Teachers Bharti 2023 Maharashtra


20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाही. तसा शासनाचाही विचार नसल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे सरकार या शाळा बंद करणार, असा अनेकांचा समज झाला. मात्र, ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल, त्याला त्या ठिकाणी योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का, हा मुद्दा आहे. त्यामुळे मुलांच्या हिताचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटलं. दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्री केसरकर यांनी म्हटलं.



Maharashtra Shikshak Recruitment 2023





एप्रिलमध्ये 75 हजार शिक्षकांची भरती केली जाईल – Shikshak Bharti 2023


: The latest update for Maharashtra Shikshak Recruitment 2022. As per the latest update, In the coming month of April, 75 thousand teachers will be recruited in the state. Recruitment will be soon. Further details are as follows:-​

राज्यात एक लाखापेक्षा जास्त शाळा आहेत. राज्यात शिक्षक कमी पडत आहेत. परिणामी, आंतरजिल्हा बदल्या करण्यात अडचणी येत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात राज्यात ७५ हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यानंतर रखडलेल्या बदल्या केल्या जातील, अशी जाहीर घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Shiksha Recruitment 2023


जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर बोलत होते. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आ. महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले आहे. ज्या काही समस्या असतील त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणू. त्यातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिव्यांगांना दिले. रायगड जिल्हा परिषद दिव्यांगांसाठी चांगल्या योजना राबवत आहे. हाच रायगड पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केसरकर यांनी यावेळी जाहीर केले.​



Previous Update –

एप्रिलमध्ये 30 हजार शिक्षकांची भरती!! फेब्रुवारीत ‘टेट’ – Maharashtra Shikshak Bharti 2023


: The latest update for Maharashtra Shikshak Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 30 thousand teachers posts will recruit in April. For that, ‘TET’ will be held in February and after the declaration of results in March, the relevant teachers will be directly appointed through the holy portal according to merit before June. Recruitment will be soon. Further details are as follows:-​

Maharashtra Shikshak Recruitment 2023

कमी पटसंख्या (२० पेक्षा कमी) असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची तर माध्यमिक शाळांमध्येही अनेक पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी मेरिटनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Teachers Recruitment 2023

  • राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ९७ हजार शाळा असून त्यात सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
  • जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २० पेक्षाही कमी आहे.
  • त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे.
  • त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत.
  • दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत.
  • मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही.
  • या पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
  • फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील.
  • साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे.
  • परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.
  • परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वासनिय सूत्रांनी दिली.
  • परंतु, वित्त व नियोजन विभागाकडून त्याला ‘हिरावा कंदिल’ आवश्यक असणार आहे.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • एकूण शाळा – ६०,९१२
  • एकूण विद्यार्थी – ४३,५५,०७०
  • शाळांवरील शिक्षक – २,१४,६६०
  • रिक्तपदे – २९,६००

खासगी संस्थांमध्ये मुलाखतीद्वारे भरती

टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आहे. भरती करण्यासाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना बोलावणे आवश्यक आहे. त्यांची मुलाखत घेऊन खासगी संस्थांवर शिक्षक भरती करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मेरिटनुसार थेट भरती देखील करण्याचा अधिकार खासगी संस्थांना देण्यात आला आहे. त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी जूनपूर्वी मोठी शिक्षक भरती होईल, असेही सांगण्यात आले.​



Previous Update –

६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता! Teachers Recruitment 2022


: The latest update for Shikshak Recruitment 2022. As per the latest news, there are a total 31 thousand teachers posts vacant in the state. Further details are as follows:-

आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील मंजूर असलेल्या शिक्षक आणि शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदे भरती करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विविध विद्यापीठांमधील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला असला तरीही प्रत्यक्षात एकूण एक हजार १६६ जागा रिक्त आहेत. त्यातील ६५९ जागा भरण्यासाठी मान्यता मिळाली असून उर्वरित ५०७ जागा रिक्त राहणार आहेत. या माहितीचा क्रमवार तपशील खाली दिलेला आहे.

घटनाक्रम –

– राज्य सरकारने २५ मे २०१७ च्या निर्णयानुसार सर्व विभागांतील पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर होईपर्यंत बंदी घातली होती.

– त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली अकृषी विद्यापीठातील शिक्षकीय पदांचा आकृतीबंध सुधारित करण्याची कार्यवाही सुरू झाली

– या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव विद्यापीठांमधील अनेक पदे रिक्त झाली.

– शासनाने नेमलेल्या उपसमितीच्या १६ जुलै २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत १५ अकृषी आणि अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर पदांच्या ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता मिळाली.

– उपसमितीने दिलेल्या मंजुरीनुसार ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यात सरकारने मान्यता दिली

– त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत वित्त विभागाने पदभरतीवर निर्बंध आणले

– त्यामुळे ही पदे मान्य होऊनही भरता आली नाहीत.

– कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुन्हा वित्त विभागास सादर करण्यात आला

– त्याअनुषंगाने वित्त विभागाने स्थापन केलेल्या उपसमितीच्या १८ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला

– बैठकीत उपसमितीने ६५९ पदे भरण्यास मंजुरी दिली.

– आता राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे आणि सरकार मान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या शिक्षक व शिक्षक समकक्ष अशा एकूण ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिल्याचा अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला आहे.



मान्यता मिळालेल्या पदांची संख्या –

विद्यापीठाचे नाव : मंजूर पदे : रिक्त पदे : भरतीस मान्यता मिळालेली पदे


  • मुंबई विद्यापीठ : ३७८ : २११ : १३६
  • एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई : २५८ : १२९ : ७८
  • कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक : ४३ : २१ : १२
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : ३३९ : १६० : ९२
  • गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : ४३ : २० : ११
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : ४६ : १६ : ०७
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : २६२ : १२४ : ७२
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ४०० : १९१ : १११
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद : २७२ :१२८ : ७३
  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : १११ : २८ : ०६
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : १६७ : ५४: २१
  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : १२१ : ३७ : १३
  • डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे : ५३ : २५ : १४
  • गोखले अभिमत विद्यापीठ, पुणे : २४ : १३ : ०८
  • टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, पुणे : १७ : ०९ :०५

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock