रेल्वेत लवकरच होणार बंपर भरती! ओडिसा रेल्वे अपघातानंतर भरती हालचालींना वेग – Indian Railway Bharti 2023

hanuman

Active member
indian-railway.png

Indian Railway Bharti 2023


Railway Bharti 2023 : As per the QA Sessions in Indian Parliaments, There are More than 1 Lac vacant posts in Indian Railway. Mot of Posts belongs to Group C & Group D. The recruitment process for this is expected soon. More details are given below.

रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्तीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या ओव्हर टाइमचा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत वेगवेगान हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना अंतरिम आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, मंडळाने वेळोवेळी पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्याच्या आवश्यकतेवर भर देत या सूचना जारी केल्या आहेत. विभागीय रेल्वेने त्यातील रिक्त पदांचा तपशील तयार करावा आणि त्यावरील भरतीसाठी योजना तयार करावी. यासाठी झोन विशेष मोहीम राबवू शकतात.

रेल्वेकडून रिक्त पदांची अद्ययावत माहिती देण्यात आलेली नाही. डिसेंबर 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये एकूण 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत. यामध्ये सिग्नल आणि दूरसंचार विभागात एकूण 14,815 आणि वाहतूक परिवहन विभागात 62,264 पदे रिक्त आहेत. त्यांच्या उत्तरानुसार, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सर्वाधिक रिक्त जागा होत्या. ज्यात देशभरात 87,654 रिक्त जागा होत्या. त्यानंतर यांत्रिक विभागात 64,346 आणि इलेक्ट्रिकल विभागात 38,096 रिक्त जागा होत्या.



या अंतर्गत एक लाख पदांसाठी भरती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे भरतीच्या निर्देशात म्हटले आहे की, निवड/नॉन-सिलेक्ट/ट्रेड टेस्ट/एलडीसीई (मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा)/जीडीसीई (सामान्य विभागीय स्पर्धात्मक परीक्षा) सारख्या सर्व पद्धतींचा वापर केला जातो, जेणेकरून रिक्त जागा वेळेत भरल्या जातील.




भारतीय रेल्वे (RRB) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. मंडळाकडून Group C आणि Group D च्या लाख पदांवर लवकरच भरती केली जाईल. अधिसूचना जारी केल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल. यापूर्वी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की बोर्डाकडून २.८ लाख पदांसाठी लवकरच भरती केली जाईल. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व २१ आरआरबींकडून रिक्त पदांची मागणी केली आहे. २०२३ पर्यंत रेल्वेमध्ये दीड ते दोन लाख रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. यामध्ये, गट ड आणि गट क संबंधित पदांवर पुनर्नियुक्ती केली जाईल. त्याची तयारी सुरू आहे. वृत्तानुसार, मध्य रेल्वे यावर्षी २ लाखांहून अधिक पदांची भरती करणार आहे, ज्यामध्ये गट C आणि D पदांवर जास्तीत जास्त भरती केली जाईल. पूर्व, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम विभाग वगळता प्रत्येक झोनमध्ये १० हजारांहून अधिक जागा रिक्त असतील.

याशिवाय मंडळ लवकरच अ आणि ब गटातील पदांसाठी भरती सुरू करणार आहे. ही भरती यूपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. २०२० पासून ग्रुप-ए आणि बी पदांची भरती झालेली नाही. मात्र, या दोन्ही भरतीच्या अधिसूचनेबाबत भारतीय रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात भरतीची अधिसूचना निघू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी रेल्वेकडून ग्रुप डीच्या १ लाखाहून अधिक पदांवर भरती करण्यात आली होती.​




सध्या सुरु असलेल्या संसदेचे अधिवेशन सुरू होताच देशातील सरकारी खात्यांमधील रिक्त पदांची स्थितीही स्पष्ट होऊ लागली आहे. खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, रेल्वेमंत्री अश्विनी चौबे यांनी सभागृहात सांगितले की, देशातील रेल्वेमध्ये सुमारे 298973 पदे रिक्त आहेत. बहुतांश रिक्त पदे गट-क आणि ड पदांवर आहेत. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेने माहिती दिली आहे की 2019 मध्ये ग्रुप सी च्या 1 लाख 30 हजार पदांची भरती करण्यात आली होती, तर पॅरा मेडिकल आणि ग्रॅज्युएट एनटीपीसीच्या 1 लाख 39 हजार पदांसाठी अद्याप रिक्त पदांची प्रक्रिया सुरू आहे.



तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेने आपल्या RRB कडून रिक्त पदांचा तपशील मागवला आहे. त्यामुळे 2023 या वर्षात रेल्वेत भरती होण्याची दाट शक्यता आहे. वृत्तानुसार, मध्य रेल्वे यावर्षी 2 लाखांहून अधिक पदांची भरती करणार आहे. ज्यामध्ये गट-क आणि ड पदांवर जास्तीत जास्त भरती केली जाईल. तर गट-अ आणि ब पदे भरण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय आहे की 2020 पासून गट-अ आणि ब पदांवर भरती झालेली नाही. दुसरीकडे, रेल्वेच्या व्यवस्थापन अधिकारी पदांवर आता केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती केली जाणार आहे. पूर्व, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम झोन सोडल्यास सर्व झोनमध्ये १० हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.

उल्लेखनीय आहे की जानेवारीमध्येही, रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिली होती की 1 डिसेंबर 2022 पर्यंत, रेल्वेला भारतीय रेल्वेच्या 18 झोनमध्ये सुमारे 3.12 लाख अराजपत्रित पदांसह गट-क आणि डी पदांवर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि माहिती महाभरती वर प्रकाशित होईलच. सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत







– The railway is a golden opportunity for the youth who dream of a government job. Railway Recruitment Board (RRB) is soon going to issue a notification for the recruitment of 75 thousand posts. After this, the eligible candidates will be able to apply online for Indian Railway Bharti 2023 on the official website of the board within the stipulated time.​

भारतीय रेल्वे आता सुस्साट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.४ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत ७५००० नवीन नोकरी भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. रेल्वेच्या नवीन योजनेकरिता ७५ हजार कोटी रुपये दिले जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

RRB Recruitment 2023 Apply Notification, Exam Date & More


75 thousand crore rupees will be given for the new schemes of Indian Railways. Nirmala Sitharaman said that 75000 crores have been invested for the infrastructure of transport​

IR-Jobs-450x800.jpg


नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी
भारतीय रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, परिवहनाच्या पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.4 लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सगळ्यात जास्त तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम चौपट आहे. तसेच 2013-14 मधील अर्थसंकल्पाशी तुलना केली तर ही रक्कम नऊ पट आहे.​




Indian Railway Bharti 2022


Good news for job seekers. The recruitment has started for Apprentice in Railway. More than 35000 posts will be filled soon in railways. Railway Exam Recruitment Exam Results declared will be soon. visit the official website for more details about the recruitment. Further details are as follows:-​

रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे.

या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.

रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.

आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.​



  • या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.
  • अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती.
  • 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.

रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.

आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.​



Previous Update –

रेल्वेमध्ये 3000 हून अधिक पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जातील. याची माहीती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ते 29 ऑक्टोबर ही आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


रेल्वेच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, सुतार, पेंटर यासह अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट er.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा. ही प्रक्रीया 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.​

Indian Railway Vacancy 2022


या पदांसाठी आहे संधी

  • हावडा डिवीजन – 659 पद
  • लिलुआ ऑफिस- 612 पद
  • सियालदह डिवीजन – 440 पद
  • कांचरापाडा ऑफिस – 187 पद
  • मालदा डिवीजन – 138 पद
  • आसनसोल ऑफिस – 412 पद
  • जमालपुर ऑफिस – 667 पद

Indian Railway Bharti 2022 – Who Can Apply


कोण करू शकतो अर्ज

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यासारख्या संबंधित शिक्षणातील ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावेत.​

“ओबीसी आणि ईडब्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.”

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock