राज्यात 153 लवकरच क्रीडा मार्गदर्शकांची बाह्यस्त्रोतद्वारे भरती होणार – Sport Guide Recruitment 2023

hanuman

Active member
tous-les-sports-clipart-4.jpg


Sport Guide Recruitment 2023 – The state government has approved the recruitment of sports guides (Sport Guide Recruitment 2023) through an outsourcing system on the lines of Sports Authority of India (SAI) to produce Olympic, Commonwealth and other international medal winners from among the budding sportspersons of the state. Under this, 53 sports guides will be paid Rs 60,000 per month each and 100 assistant sports guides will be paid Rs 40,000 per month.



राज्यातील उदयोन्मुख क्रीडापटूंमधून ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी राज्य सरकारने भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (साई) धर्तीवर बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे क्रीडा मार्गदर्शकांची भरती करण्यास मान्यता दिली. त्यांतर्गत ५३ क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी दरमहा ६० हजार आणि १०० सहायक क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी महिन्याला ४० हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर १५३ क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणीनिहाय पदे मानधन तत्वावर निर्माण करण्याचा निर्णय १५ जुलै २०१० ला घेण्यात आला होता. मात्र, नियुक्ती करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने २३ ऑगस्ट २०१९ ला सुधारित नियमावली जारी करण्यात आली. मात्र, मानधन अल्प असल्याने क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध झाले नाहीत. आता सरकारने क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणी नव्याने निर्माण केली. क्रीडा मार्गदर्शकांसाठी किमान बारावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान, वय किमान २५ ते कमाल ५५ वर्षे अशी अट असेल. क्रीडा मार्गदर्शक पदासाठी एन. आय. एस. पदविकाधारक अथवा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू असणे आवश्‍यक असेल.

सहायक क्रीडा मार्गदर्शकासाठी या क्रीडाविषयक अर्ह्यतेच्या जोडीला राष्ट्रीय अथवा राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त, शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त खेळाडू, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू आदीचाही विचार केला जाईल.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock