महत्त्वाचे – महसूल विभागात तब्बल १३००० पदे रिक्त!! | Mahsul Vibhag Bharti 2023

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra.png

Mahsul Vibhag Bharti 2023


Department of Revenue Bharti 2023: The latest update for Mahsul Vibhag Recruitment 2023. As per the latest news, There are a total of 13000+ posts vacant in the Department of Revenue. The last recruitment was conducted in few years ago for Clerk posts. The last six years have not been filled. Further details are as follows:-​

राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एखाद्या कामासाठी सर्वसामान्यांना वारंवार महसूल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र राज्यात आहे. शेतकऱ्यांचा वारंवार संपर्क येणाऱ्या तलाठ्यांची महसूल विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून हा आकडा ५ हजार ३० इतका आहे. तहसीलदार ६६ पदे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ५२३ पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कामेही प्रलंबित राहत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती आली की पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग प्रलंबित कामाचा ढीग वाढतच जातो.



तलाठी पदभरतीची केवळ घोषणा – Updates




– महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी पत्र काढून तलाठी संवर्गातील ४,१२२ पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर अशा सर्व महसूल विभागातील ही रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत.

– मात्र यासंदर्भात घोषणेपलीकडे काहीही झाले नसून तलाठी
भरतीसंदर्भात अद्याप जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील
सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे.



सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची…
=>अपर जिल्हाधिकारी – ३१
=>उपजिल्हाधिकारी – १६
=>तहसीलदार – ६६
=>नायब तहसीलदार – ४५७
=> – ५,०३०
=>अधीक्षक – १२
=>उपअधीक्षक भूमी अभिलेख – ९१
=>मुद्रांक निरीक्षक – १५
=>दुय्यम निबंधक – १८२
=>मंडल अधिकारी, अव्वल
कारकून, महसूल सहायक,
लघुटंकलेखक – २,५७५
=>अराजपत्रित लघुलेखक – १५३
=>कनिष्ठ लिपिक – ५३२
=>पदसमूह ४ – १,८१९
=>शिपाई – २,३७५



Mahsul Vibhag Bharti 2023 Updates Posts


Masahul-Vibhga-Post-Details-800x712.jpg



Mashul-Vibhga-Updates-RTI-534x800.jpg






Department of Revenue Bharti 2023

  • या रिक्त पदांमुळे पालघर जिल्ह्याचा विकास खुंटत चालला असल्याचे सांगितले जात आहे.
  • महसूल विभागअंतर्गत तहसीलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये सरळ सेवेच्या मंजूर पदांपैकी विविध पदे भरली गेलेली नाहीत.
  • २०१५-१६ मध्ये लिपिक पदाची शेवटची पदे भरली गेली.
  • त्यानंतर तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र न्यायालयाच्या नोकरभरती आरक्षणबाबतच्या स्थगितीमुळे ती थांबली.
  • त्यानंतर आतापर्यंत अनेक पदे रिक्त आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालयात गट अ, ब, क व ड वर्गातील अनेक पदे रिक्त आहेत.
  • यात काही ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे दिसत आहेत.
  • त्यातच अलीकडील काळात शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील २९ शिपायांची पदे निर्लेखित करण्यात आली.
  • शासकीय सेवेत घेण्यापेक्षा ही पदे कंत्राटी सेवेतून भरण्याच्या सूचना दिल्यामुळे ही पदे कमी झाली आहेत.
  • गट ड वर्गाच्या कर्मचारी कमतरतेमुळे कार्यालयीन कामे करण्यात अडचणी येत आहेत.
  • इतर कर्मचारी वर्गावर ही जबाबदारी सोपवली असल्याने त्यांच्यावरही कामाचा अतिरिक्त भार व तणाव दिसून येत आहे.

Mahsul Vibhag Recruitment 2023


तहसीलदार कार्यालयांमध्ये असलेल्या १३ ते १४ पदाच्या प्रवर्गापैकी सर्वाधिक पदे तलाठी संवर्गाची रिक्त आहेत. त्याखालोखाल लिपिक-टंकलेखक यांची पदेही रिक्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे कामे होण्यास उशीर झाल्यामुळे नागरिकांचा रोष अधिकारी- कर्मचारी वर्गाला ओढावून घ्यावा लागत आहे. उपविभागीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशीच काहीशी स्थिती आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय, तहसीलदार व मंडळ अधिकारी अशा महसूल विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन पदांचा अतिरिक्त पदभार दिल्यामुळे या कामांचा डोंगर वाढतच जात आहे. काही अधिकारी- कर्मचारी अशा अतिरिक्त कामामुळे मानसिक तणावाखाली असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊ पदभरती करावी अशी मागणी यानिमित्ताने अधिकारी- कर्मचारी वर्गाकडून समोर येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून महसूल विभागातील विविध विभागांमध्ये कर्मचारी कमतरतेमुळे कामांचे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. कर्मचारी वर्गावर कामाचा मोठा तणाव आहे. उपविभागीय व तहसीलदार कार्यालयांमध्ये नागरिकांचे काम न झाल्याने कर्मचाऱ्यांना रोष ओढवून घ्यावा लागत आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही भरती स्थगित आहे. – संजय लाडे, अव्वल कारकून, आस्थापना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय


Mahsul Vibhag Bharti 2023




Department of Revenue Bharti 2022: महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी व जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी याकरिता उपविभागीय कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिलपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.​

Maharashtra Revenue Department Bharti 2022


Department of Revenue Bharti 2022



Department of Revenue Recruitment 2022 Details


: Ministry of Finance and Revenue Department has invited applications for the interested and eligible candidates. Interested applicants apply before the last date. Further details are as follows:-​

Maharashtra Revenue Department Bharti 2022

अर्थ मंत्रालय आणि महसूल विभाग अंतर्गत इन्स्पेक्टर आणि स्टेनोग्राफर ग्रेड II पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • पदाचे नाव – इन्स्पेक्टर आणि स्टेनोग्राफर ग्रेड II
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण, अहमदाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Department of Revenue Bharti 2022

? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock