पोलिस उपअधीक्षकांची ३७६ पदे रिक्त | MPSC Recruitment 2023

hanuman

Active member
mpsc-logo2-2019.jpg

MPSC Recruitment 2023 Update


: There are 296 posts of Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police (Unarmed) and a total of 376 vacancies in various departments of the police force in the state. The Maharashtra Public Service Commission has published advertisements for the recruitment of only 122 posts in the last five years. On the one hand, the students preparing for the competitive examination raised an angry question as to why the state government is not filling up the vacant posts of Deputy Superintendents despite a large number of vacancies in the state.​

राज्यात पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त (निःशस्त्र ) यांची २९६ आणि पोलिस दलातील विविध विभागात एकूण ३७६ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने मागील पाच वर्षांत केवळ १२२ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. एकीकडे राज्यात मोठ्या संख्येने जागा रिक्त असूनही राज्य सरकारकडून उपअधीक्षकांची रिक्त पदे का भरली जात नाहीत, असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षेसाठी ६७३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी येत्या ४ जून रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक या पदाच्या जागांचा उल्लेख केलेला नाही. एमपीएससीमार्फत उपजिल्हाधिकारी पदाने हुलकावणी दिली तर पोलिस दलात उपअधीक्षकपदी अधिकारी म्हणून नोकरीची संधी मिळावी, असे तरुणाचे स्वप्न असते. मात्र, यावर्षीही जागांचा उल्लेखच नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.​

MPSC-Police-News-800x490.jpeg




राज्यात पोलिस दलातील विविध विभागांत पोलिस उपअधीक्षक पदाच्या किती जागा रिक्त आहेत? याची माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली असता फेब्रुवारी २०२३ अखेर राज्यात पोलिस उपअधीक्षक पदाच्या तब्बल ३७६ जागा रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिस खात्यांतर्गत बढती देण्यात येते आणि काही रिक्त जागा भरण्यात येतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले


MPSC PSI Bharti Update


: It is Good news for the candidates who are going to interview for Sub-Inspector of Police. In the year 2021 and 2022, many youths appeared for the Police Sub-Inspector post exam and the candidates going for the interview will need a document. Candidates’ previous year’s non-criminal (Non-Criminal) will be considered.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) पीएसआय पदाचा महिला भरतीसाठीचा क्रायटेरिया बदलला आहे. त्याचा फटका अनेक विद्यार्थींनींना बसणार आहे. महिला भरती करण्यासाठी मैदानी परीक्षेसाठी आयोगाने नवे नियम तयार केले आहे. मैदानी परीक्षेसाठी असणारा क्रायटेरिया आयोगाकडून बदलला गेला आहे. 2020 ला वेगळे नियम तर 2021 भरतीसाठी आयोगाने नवीन नियम तयार केले आहे. “लांब उडी” संदर्भात बदललेल्या नियमावरुन विद्यार्थीनी आक्रमक झाल्या आहेत. मैदानी परीक्षेचा क्रायटेरिया आयोगाने बदलू नये, अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थिनींनी आयोगाकडे केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



वॉकिंग, रानिंग आणि गोळा फेक या तीन मैदानी परीक्षा याआधी आयोगाकडून घेतल्या जात होत्या. आता या नियमांमध्ये बदल करून रनिंग, लांब उडी आणि गोळा फेक करण्यात आले आहे. लांब उडीसंदर्भातील बदलास महिला परीक्षार्थींनी विरोध केला आहे. हा बदल त्यांना अवघड जाणार आहे. आयोगाने नियम बदलू नये, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.​









महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी 2021 आणि 2022 या वर्षात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीसाठी 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर आता 2021-2022 मध्ये काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरल जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 या वर्षांमध्ये शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये 2020-21 या वर्षांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोना असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर हे प्रमाणपत्र काढता आलं नव्हतं. त्यामुळे 2021आणि 2022 या वर्षात काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याची मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.​

महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 8 हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाईल. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.​


MPSC Recruitment Latest News


– The Commission has decided to cancel the procedure of writing the number of questions solved on the objective multiple choice type answer sheet and giving two minutes extra time for it and the related prospectus has been published on the website of the Commission. There will be no option to enter the number of solved questions. Check MPSC New Update regarding MCQ Answer Sheet. Read full details about MPSC Recruitment 2023 at below​

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकेवर सोडविलेल्या प्रश्नांची संख्या लिहिण्याची व त्याकरीता दोन मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याच्या कार्यपध्दती रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून त्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. सोडवलेल्या प्रश्नांची संख्या टाकायचा इथून पुढे option नसणार.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

mpsc-ndew-update.jpg



MPSC Recruitment New Update


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) तृतीय श्रेणीच्या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेर प्रश्न विचारण्यात आला नव्हता. त्यामुळे संबंधित प्रश्नपत्रिकेतील तीन प्रश्न गृहीत न धरण्यासंबंधी मॅटने दिलेला निर्णय चुकीचा आहे, असा दावा एमपीएससीने अॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला .



एमपीएससीतर्फे सहाय्यक अकाउंट अधिकारी, गट बी या तृतीय श्रेणीतील पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. २०१९ मध्ये त्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेत अभ्यासक्रमा बाहेरील आणि तीन प्रश्न चुकीचे असल्याने त्याच्या गुणांची मागणी करत या निकालाला आक्षेप घेणारी याचिका भरती प्रक्रियेतील मूळ उमेदवारांनी मॅट मध्ये दाखल केली. या याचिकेची मॅटने गंभीर दखल घेत. परीक्षेतील तीन प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा मान्य केला. मात्र त्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्याची मागणी फेटाळून लावत एमपीएससीला अभ्यासक्रमाबाहेरील तीन प्रश्न रद्द करून उर्वरित ९७ टक्के प्रश्नांच्या आधारे मूल्यांकन करा अथवा उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी जेवढे गुण कमी पडतील, तेवढे गुण देण्याचा आदेश दिला.



मॅटच्या या निर्णया विरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एमपीएससीच्या वतीने अॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी याचिकेला आणि मॅटच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला.



प्रश्नपत्रिकेत कुठलाही अभ्यासक्रमाबाहेरचा अथवा प्रश्न चुकीचा नसल्याचा दावा केला. तसेच मॅटच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. एमपीएससीची ही विनंती मान्य करत खंडपीठाने मूळ उमेदवार आणि एमपीएससीच्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर एकत्रित सुनावणी घेण्याचे निश्चित केले.



– The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the Maharashtra Civil Services Combined Prelims Exam-2023 Schedule. As per this latest update Published by MPSC Department, the deadline for online application for this exam which is being conducted for the recruitment of 673 posts is between 2nd to 22nd March. Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination will be conducted on June 4 across the state. There was an uproar across the state regarding the civil service syllabus. The Commission, while announcing its position recently, clarified that it will implement the new syllabus from 2025. More details about this are given below.​



महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा- २०२३ च्‍या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. ६७३ पदांच्‍या भरतीसाठी होत असलेल्‍या या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २ ते २२ मार्चदरम्‍यान आहे. ४ जूनला राज्‍यभरात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्‍त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. राज्‍यसेवेच्‍या अभ्यासक्रमाबाबत राज्‍यभर गदारोळ सुरू होता. आयोगाने नुकतीच याबाबत भूमिका जाहीर करताना २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करणार असल्‍याचे स्‍पष्ट केले.

यानंतर लगेचच राज्‍यसेवा २०२३ परीक्षेसंदर्भातील सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यामुळे आता स्‍पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले उमेदवार तयारीला लागणार आहेत. येत्‍या २ ते २२ मार्च या कालावधीत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

याच मुदतीत ऑनलाइन शुल्‍क भरण्याची मुदत असेल. भारतीय स्‍टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्‍क भरण्यासाठी २४ मार्चपर्यंत चलन प्रत घेण्याची मुदत असेल. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्‍क भरण्याची मुदत २८ मार्च असेल.

मुख्य परीक्षेची गुणवारी अशी
संयुक्‍त पूर्व परीक्षा ४०० गुणांसाठी घेतली जाणार आहे. तर राज्‍यसेवा परीक्षा वगळता अन्‍य सर्वांकरिता चारशे गुणांची मुख्य परीक्षा आणि पन्नास गुणांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. राज्‍यसेवा मुख्य परीक्षा ८०० गुणांसाठी राहील. तर मुलाखतीसाठी शंभर गुण असतील.

पोलिस खात्‍यातील जागा नाही
राज्‍यसेवा परीक्षेच्‍या माध्यमातून यंदा उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील जागांचा समावेश आहे. परंतु सहाय्यक पोलिस आयुक्‍त/पोलिस उपअधीक्षक या संवर्गातील पदांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.

प्रवर्गनिहाय भरती होणाऱ्या जागा
सामान्‍य प्रशासन विभाग (राज्‍यसेवा गट-अ, गट-ब) मध्ये २९५ जागा, पाणीपुरवठा, जलसंपदा, मृदा व जलसंधारण (महाराष्ट्र स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सेवा) १३० जागा, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत अभियांत्रिकी सेवा) १५ जागा, अन्न व नागरी विभागात ३९, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागातील १९४ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

ऑक्‍टोबरमध्ये मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षेनंतर संवर्गनिहाय ऑक्‍टोबरमध्ये मुख्य परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. यामध्ये राज्‍यसेवा मुख्य परीक्षा ७ ते ९ ऑक्‍टोबर, स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सेवा १४ ऑक्‍टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा १४ ऑक्‍टोबर, निरीक्षक, वैद्यमापन शास्‍त्र, गट-ब २१ ऑक्‍टोबर, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा २८ ऑक्‍टोबरला घेण्याचे नियोजित आहे.



महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील ६७३ पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३, दि. ४ जून २०२३ रोजी ही परीक्षा होईल. महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्यांमध्ये ४ जून रोजी परीक्षा होणार आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे, सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे, अन्न व नागरी विभागात ३९ पदे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदांकरीता परीक्षा होणार आहे.



परीक्षेचा तपशील

राज्यसेवा मुख्य परीक्षा ७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ, ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर रोजी होईल. तसेच निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर रोजी होईल तर अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर रोजी होईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंबंधीची सविस्तर जाहीरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. PDF जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.



MPSC Bharti 2023 Details









– The ongoing MPSC students’ agitation in Pune has been successful. Now the decision has been taken by the Maharashtra Public Service Commission to implement the new syllabus of MPSC not from this year but from 2025. After this the students have cheered. Maharashtra Public Service Commission has given information about this by tweeting. MPSC said in a tweet that ‘revised exam plan and syllabus is being implemented from the year 2025 taking into account the demand of the candidates regarding the descriptive nature of the State Services Main Examination​

MPSC च्या अभ्यासक्रमात 2023 पासून बदल करण्याचा निर्णयाविरोधात राज्यभर MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केली होती. अखेर त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहेत. अखेर आयोगाने मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

mpsc-News.png


नवा अभ्यासक्रमातील बदल आता 2023 पासून नाही तर 2025 पासून लागू होतील अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करुन दिली. पण तुम्हाला माहिती आहे का MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आलेत? आणि कसा असणार असणार MPSCचा नवा पॅटर्न? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत?

  • आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण 9 पेपर असतील.
  • त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी 300 गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील.
  • याशिवाय मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.
  • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.
  • सोबतच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.

मुख्यमंत्र्यानीही घेतली होती दखल –

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. 2025 पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत सरकार सहमत असून आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.​


MPSC Recruitment 2022-23


MPSC Recruitment 2023 – MPSC students are facing confusion about the coming examinations. The situation about Syllabus changes is not cleared by state government. Its expected that the New GR or Confirmations should be declared by MPSC departments as soon as possible.​

‘‘राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ च्या परीक्षेपासून लागू करावा, अशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या मागणीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. गेल्या आठवड्यात सरकारने आयोगाला निर्देशही दिले होते. मात्र अजूनही आयोगाने नोटीस न काढल्याने राजकीय पक्षांच्या आखाड्यात आयोगाचा निर्णय अडकला की काय अशी शंका विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.



केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढावा हेतूने ‘यूपीएससी’च्या धर्तीवर ‘एमपीएससी’चा नवीन अभ्यासक्रम जाहीर करून २०२३ च्या परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला. तसेच यावरून राजकीय पक्ष्यांमध्ये श्रेयवादही सुरू झाला आहे.



विद्यार्थ्यांमध्येही दोन गट पडले असून दोन्ही गटांकडून आंदोलने सुरू आहेत. एक गट बहुपर्यायी परीक्षा असायला हवी याचे समर्थन करीत आहेत तर दुसरा गट ‘यूपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक परीक्षा असावी याचे समर्थन करीत आहे.

एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम राज्यात कधीपासून लागू होणार यावर मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. राजकीय श्रेयवादात नाहक विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे.




मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मिळत आहे. 2025 पासून नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याची विनंती राज्य सरकारतर्फे एमपीएससीला करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे. ..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय

२०२३ पासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार होती. गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थींनी 2023 पासून होणारी वर्णनात्मक परीक्षा रद्द करून ती पद्धत २०२५ पासून लागू करावी अशी मागणी केली होती. यासाठी परीक्षार्थींनी राज्यभरात आंदोलनेही केली होती. आज पुण्यात साष्टांग दंडवत आंदोलन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांनी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत विषय मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. राज्यसेवा आयोगाने अजून याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढलेले नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आले होते. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध करत आज सकाळपासूनच पुण्यात आंदोलन करत होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार आणि माजी आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत.

याबाबत कॅबिनेट मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचा आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. परंतु, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.​


MPSC भरतीमध्ये जाचक अटींचा विद्यार्थ्यांना फटका! जाणून घ्या काय आहे गोंधळ!


– The state government has refused to raise the age limit due to Covid, saying that the recruitment process has gone too far now that 112 MPSC advertisements have been published. Minister Deepak Kesarkar gave this information while replying to an interesting suggestion made by Legislative Council member Shashikant Shinde. He explained that if the age limit is increased, the examination and recruitment will also be hampered. Check out this important Update about MPSC Recruitment 2023​

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा पदभरतीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, ‘एमपीएससी’ने पूर्व परीक्षेसाठी प्रत्येक विभागानुसार गुणवत्ता यादी (कट-ऑफ) जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने एकच विद्यार्थी सर्व विभागांच्या यादीमध्ये पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील पूर्ण माहीत आम्ही दिली आहे.

प्राप्त नवीन अपडेट नुसार, ‘MPSC’ने संयुक्त गट-ब आणि गट-क संवर्गातील ८,१६९ विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. लिपिक -टंकलेखक पदासाठी विभाग/प्राधिकारीनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या जाहिरातीत नमूद आहे. जाहिरातीत एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग/प्राधिकरण आहेत. यात अन्न व पुरवठा विभागात सर्वाधिक म्हणजे ११५३ जागा आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून निवड करू शकतात. त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक विभागांसाठी अर्ज करणार हे निश्चित आहे. आयोगाकडून सर्व विभागातील लिपिक-टंकलेखक पदसाठी समान पूर्व परीक्षा घेणार आहे. मात्र, त्यांची गुणवत्ता यादी राज्यनिहाय जाहीर न करता ती विभागनिहाय जाहीर होणार आहे. परिणामी, गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी हे त्यांनी अर्ज केलेल्या सर्वच विभागामध्ये पात्र ठरतील. यामुळे त्यांच्या खालोखाल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेतूनच बाद केले जाणार असल्याने त्यांना मुख्य परीक्षेची संधीच मिळणार नाही. याउलट राज्यनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केल्यास अन्य विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊन त्यांनाही मुख्य परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ‘MPSC’ने जाचक अटीमध्ये बदल करावा अशा मागणीचे निवेदन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आयोगाला दिले आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘MPSC’च्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन आणि संदेशालाही उत्तर दिले नाही.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी लावल्यास ७,०३४ लिपिक पदांच्या मुख्य परीक्षेसाठी उदाहरणादाखल १२ च्या गुणोत्तराने अंदाजे ८४,४०८ विद्यार्थी पात्र होतील. परंतु, आताच्या प्राधिकरणनिहाय पात्र करण्याच्या निर्णयामुळे, अंदाजे १५-२० हजार उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येण्याची शक्यता आहे. पूर्व परीक्षा ही केवळ चाळणी परीक्षा असून मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारेच अंतिम निवड यादी लागणार आहे. परंतु येथे चाळणी परीक्षेतच हजारो विद्यार्थ्यांच्या नोकरी मिळवण्याच्या संधी हिरावून घेण्यात येत आहेत.​





मागील अपडेट :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या पदभरतीसंदर्भात अजब निर्णय घेतला आहे. यामध्ये पदवीचे विद्यार्थी पात्र मात्र पदव्यूत्तर डिग्री अपात्र ठरवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) काही दिवसांपूर्वी माहिती व जनसंपर्क विभागाची (Job alert) भरती जाहीर केली. मात्र या भरतीसंदर्भात नवी नियमावली पुढे आली आहे. त्यामध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केलेले विद्यार्थी पात्र, पदवी घेणारे विद्यार्थी पात्र मात्र पदव्यूत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या पदवीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क (Information and Broadcasting department) महासंचालनालयामध्ये विविध पदांसाठी ४२ जागांची भरतीची जाहिरात MPSCद्वारे काढण्यात आली होती. गट-अ वरीष्ठ, गट-अ कनिष्ठ आणि गट-ब अशा श्रेणीचे हे ४२ पद असून यासाठी सोमवार २३ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे उपरोक्त सर्व ४२ पदांसाठी सारखीच शैक्षणिक आणि अनुभवाची पात्रता ठेवण्यात आली होती. शैक्षणिक पात्रतेमध्ये पत्रकारितेच्या पदवी आणि पदविकेची अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय ठरणार आहे. त्यामुळे MPSC चा निर्णय हा पत्रकारितेच्या पदवीवर प्रश्न उभा करणार आहे.

अनेक विद्यापीठांमध्ये पत्रकारितेचे पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी असे कोर्सेस चालविले जातात. विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्ये वरील सर्व कोर्सेस एकमेकांना पर्याय म्हणून दर्शविण्यात येतात. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानुसार पदवी आणि पदविका हिच शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे. यापेक्षा मोठी शैक्षणिक पात्रता आयोगाला मान्य नसल्याचे या निर्णयाच्या माध्यमातून दिसून येत आहे.

MPSC च्या जाचक नियमावलीमुळे पत्रकारितेचे शिक्षण घेऊन अनेक प्रसार माध्यम संस्थांमध्ये कार्य करून पात्रता मिळविलेले पत्रकार अपात्र ठरले आहेत. तक्रार आणि शंकांच्या निरसनासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर काही क्रमांक देण्यात आलेले आहेत. या क्रमांकांवर फोन करून माहिती दिली असता त्यावरून सचिवांच्या ई-मेलवर तक्रार नोंदविण्यास सांगितले जाते. मात्र त्या तक्रारीवर कुठलेही उत्तर मिळत नसल्याची भावना पदव्यूत्तर पत्रकारितेची पदवी घेतलेल्यांनी व्यक्त केली.



एकीकडे वर्ग १ आणि २ च्या पदांसाठी जाहिरात काढली जाते. त्यासाठी पदवी आणि पदविका अर्थात डिप्लोमा ग्राह्य धरला जातो. पण पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले जाते. हा नवा शोध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑनलाईन अर्ज सादरीकरणात येणा-या अडचणी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मंगळवारी २४ जानेवारी रोजी आश्वासन दिले.



Previous Update –

साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त


: The latest update for MPSC Recruitment 2023. As per the latest news, There are 5 lakhs of vacancies in various departments of the state government, local bodies, government, and semi-government organizations. Further details are as follows:-

राज्य सरकारचे विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत. राज्यात तब्बल साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त असताना, सरकारकडून केवळ काही विशिष्ट विभागांमधील पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही पदांच्या परीक्षेची शेवटची जाहिरात प्रसिद्ध होऊन २५ वर्षांचा काळ लोटला असून, जागा रिक्त असतानाही परीक्षेच्या जाहिराती का प्रसिद्ध होत नाहीत, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.​

  • २०१८ साली मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चारही गटांच्या मिळून एकूण दोन लाख जागा रिक्त आहेत.
  • त्यात भर म्हणजे ३० मे २०२२पर्यंत सरकारी पदांवरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख ८९ हजार ९६४ आहे.
  • यामुळे राज्यात राज्य सरकारचे विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, शासकीय, निमशासकीय संस्था आणि आस्थापनांमध्ये जवळपास साडेपाच लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत.
  • यातील केवळ १० टक्के जागा भरण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असून, या जागा केवळ चार ते पाच विभागांशी संबंधित आहेत.
  • अन्न पुरवठा निरीक्षक, कामगार निरीक्षक, वजनमाप निरीक्षक अशा अनेक पदांसाठी शेवटची जाहिरात निघून आता २९ वर्षे झाली आहेत.
  • अशा असंख्य पदांसाठी वर्षानुवर्षे जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाहीत.
  • केवळ चार ते पाच विभागांमधील पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करून सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या पदभरतीच्या धोरणानुसार ५० टक्के जागा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी), सरळसेवा परीक्षांद्वारे भरल्या जातात. २५ टक्के रिक्त जागा या खातेअंतर्गत परीक्षांमधून होतात. उर्वरित २५ टक्के जागा पदोन्नतीद्वारे भरण्यात येतात. गेल्या सात ते आठ वर्षांपासून काही विभागांच्या रिक्त जागांचे मागणीपत्रच लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या ५० टक्के पदांचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.​



: The latest GR has been published for the latest recruitment. The posts of Clerk-Typist Cadre are proposed to be filled through “Maharashtra Gazetted Group-B & Group-C Services Combined Preliminary Examination 2023” and the advertisement for the same will be published in the first week of January, 2023. Further details are as follows:-

राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापूढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असल्याने संदर्भाधीन क्र. ३ ते ५ येथील शासन निर्णयातील तरतूदी व सूचना विचारांत घेवून विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन क्र. २ येथील शासन पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

  • दि.१.१.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ या कालावधीत नियोजित स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आला असून, स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे (प्रत सोबत).
  • त्यानुसार लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे “महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३” मधून भरावयाचे प्रस्तावित असून, त्याकरीता जाहिरात जानेवारी, २०२३ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार असल्याने त्यासंबंधातील पदांचे मागणीपत्र पाठवितांना सद्या रिक्त असलेली पदे व नजिकच्या काळात पदोन्नती / सेवानिवृत्ती इत्यादी बाबींमूळे रिक्त होणारी पदे विचारांत घेण्याचे आयोगाने कळविले आहे.

MPSC Recruitment 2022




Previous Update –

MPSC विषयांकित पदभरतीकरीता मुलाखत वेळापत्रक जाहीर MPSC Recruitment 2022 – Interview Scheduled


: Maharashtra Public Service Mission (MPSC) has declared the interview scheduled for subject wise recruitment. Click on the below link for more details abput timetable. Further details are as follows:-

विषयांकित पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिध्द खालील जाहिरातीस अनुसरून त्यांच्यासमोर नमूद केल्याप्रमाणे आयोगाच्या कुपरेज, मुंबई येथील मुख्य कार्यालयात मुलाखती आयोजित करण्यात येतील :-

MPSC Interview Scheduled


MPSC Recruitment 2022


  • मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
    आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे मुलाखत पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. ४. मुलाखतीचा दिनांक संबंधित उमेदवारांना लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येत आहे.
  • जाहिरातीस अनुसरून पात्रते संदर्भात केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावरील “ उमेदवारांना सर्वसाधारण सूचना ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यातील व वैध सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे अनिर्वाय आहे.
  • पात्रतेच्या अनुषंगाने विहित नमुन्यातील वैध सर्व प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर न केल्यास मुलाखत घेण्याचे नाकारले जाईल. तसेच मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

MPSC Interview Timetable 2022



Previous Update –

MPSC भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प


: General Merit List and Provisional Selection List of Technical Assistant, Directorate of Insurance in Maharashtra Group-C Services (Main) Examination – 2021 have been published on the website of the Commission and based on that, candidates are invited to opt out of the recruitment process. Further details are as follows:-​

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.
  • सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
  • खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक ०१ डिसेंबर, २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक ०७ डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही. ८. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.​



Previous Update –

MPSC महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ – संगणक प्रणाली चाळणी तारीख जाहीर | MPSC Recruitment 2022


: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Animal Husbandry Service Group-A CBT Date. The exam will be held on 26th of December 2022. Further details are as follows:-​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ संवर्गाकरिता संगणक प्रणाली आधारित चाळणी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन विविध संवर्गाकरीता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येतील :-

MPSC Recruitment Exam Dates


MPSC Recruitment 2022


  • परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील. ३. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.
  • पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ (जाहिरात क्रमांक १२/२०२२) व सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ (जाहिरात क्रमांक १६/ २०२२) या दोन संवर्गांकरीता सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
  • सामायिक चाळणी परीक्षेमधील गुणांच्या आधारे संवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्तायादी तयार करण्यात येईल, तसेच सामायिक परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.



Previous Update –

नवीन अपडेट -MPSC सहायक नगररचनाकार चाळणी परीक्षा 2022 | MPSC Recruitment 2022


MPSC Recruitment 2022 : आयोगामार्फत रविवार, दिनांक २० नोव्हेंबर, २०२२ रोजी विषयांकित परीक्षा मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व पुणे जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई येथे रविवार, दिनांक २० नोव्हेंबर, २०२२ रोजी मध्य व हार्बर रेल्वेचा मोठ्या प्रमाणात मेगाब्लॉक असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत असण्याची शक्यता आहे. यास्तव, उमेदवारांनी परीक्षेकरिता निश्चित केलेल्या वेळेपूर्वी संबंधित परीक्षा उपकेंद्रांवर उपस्थित राहण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. परीक्षा उपकेंद्रावर शेवटच्या प्रवेशासाठी निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.​

MPSC Recruitment 2022




Previous Update –

: The latest update for MPSC Exam 2022. All the recruitment process for Group C will be carried under the MPSC Recruitment process 2022. This new GR is published by MPSC department today on 2nd November 2022.​

राज्य शासकीय कायालयातील गट-क मधील लिपिक संवर्गातील सर्व पदे या पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रस्तुत शासन शासन निर्णय लिपिक वर्गीय भरतीस लागू राहील. या संदर्भातील अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF GR पहावा.

पहिल्या टप्प्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील. लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करून बृहन्मुंबई व बृहन्मुंबईबाहेरील लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी कार्यपद्धती विहित करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे संबंधित विभागाने आपली मागणीपत्र पाठविणे आवश्यक असेल. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लिपिक-टंकलेखक पदांकरीता स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल. जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम घेण्यात येणार आहे.

पूर्वीप्रमाणेच आरक्षण लागू
दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील लिपिकवर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणली असली तरी, सदर पदांना जे आरक्षण यापूर्वी लागू होते त्यानुसारच आरक्षण व अनुषंगिक सोयी-सवलती लागू राहतील. पदभरतीकरिता आयोगाकडे मागणीपत्र पाठविताना अनुकंपा भरतीसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार रिक्त पदांची गणना करावी. अनुकंपा तत्त्वावरील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर राहील, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत .
Ne.gif







  • राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीत तक्रारी आल्यानंतर या विभागाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.
  • त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या प्रतिष्ठित आणि अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
  • या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • गेल्या वर्षीच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे, असे ठरले होते.
  • त्याप्रमाणे आधीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाइन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.
  • या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती आणि इतर अटी-शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

राज्यात ७५ हजार पदांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत नामनिर्देशनाद्धारे परीक्षा घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीत तक्रारी आल्यानंतर या विभागाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या प्रतिष्ठित व अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आधीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवानिवड मंडळाच्या कक्षेतील, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेची रिक्त पदे ऑनलाइन पद्धतीने वरील संस्थांमार्फत भरण्याचा निर्णय झाला. या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती आणि इतर अटी-शर्ती सामान्य प्रशासन विभागामार्फत (सेवा) निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.​



Previous Update –

MPSC मार्फत संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक!!


MPSC Recruitment 2022 : Maharashtra Public Service Commission has declared the Prospectus for Conducting Screening Examinations Based on Computer System. Click on the below link to download the complete details.​

आयोगामार्फत सरळसेवा भरतीसाठी प्रसिद्ध विविध 40 जाहिरातींकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रसिध्दीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकी वर क्लिक करावे.

संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.​



Previous Update –

MPSC Exam- दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरीता सक्षम नसल्यास सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत!!


: Tha latest update for MPSC Examination. As per the latest news, Guidelines for disabled candidates have been published on the Commission’s website to provide scribes and other facilities during the examination if disabled candidates are not able to write during the examination. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग उमेदवार लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह विनंती अर्ज (प्रपत्र-१ अथवा प्रपत्र-२) सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या खालील जाहिराती/अधिसूचनेस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह preexamination@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे.​

MPSC Recruitment 2022


ज्या उमेदवारांनी यापूर्वीच विषयांकित परीक्षेसाठी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह सादर केला आहे, अशा उमेदवारांनी परत विनंती अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

केवळ संबंधित जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन अर्ज सादर करताना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरिता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय असणार नाही. ऑनलाईन अर्जाद्वारे दावा करुन उमेदवारांनी विहित पध्दतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यासच लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय राहील.​



Previous Update –

नवीन अपडेट- MPSC द्वारे आता 100% पदभरती होणार; GR प्रकाशित | MPSC Recruitment 2022


: The latest update for Maharashtra Public Service Commission Recruitment 2022. As per the latest news, the way is cleared to 100 percent recruitment through MPSC. As per the instructions in the government decision, the revised diagrams have been finally approved. The recruitment will be soon. Further details are as follows:-​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पदभरतीवर कोरोनामुळे काही प्रमाणात पायबंद घालण्यात आला होता. मात्र आता संबंधित निबंध पूर्ण हटविण्यात आले आहेत. तसा शासन निर्णयच वित्त विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे एमपीएससीव्दारे १०० टक्केपदभरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


Ne.gif


वित्त विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत. त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे १०० टक्केभरण्यास मुभा देण्यात येत आहे. त्याचबरोबर अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्केभरण्यास अनुम ती देण्यात येत आहे. या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर, किमान एक पद भरता येईल.​

⏰


⏰


⏰


⏰


⏰


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत निबंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव, वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.​


MPSC Recruitment 2022


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock