परिचारिका संवर्गातील रिक्त पदे भरणार, पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार!- Nurse Recruitment 2024

hanuman

Active member
Nurse Recruitment 2024

Nurse Recruitment 2024 -परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी; तसेच परिचारिका संवर्गातील सर्व स्तरांवरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील व प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. परिचारिका संवर्गाच्या विविध मागण्यांबाबत मंगळवारी (ता. पाच) मुंबईत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. मंत्री मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे, राज्य उपाध्यक्ष भीमराव चक्रे, राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, राज्य खजिनदार राम सूर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य आशा यादव, सेंट जॉर्ज शाखेच्या अध्यक्ष कामिनी सोनवणे व स्मिता म्हसकर आदी उपस्थित होत्या. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



मेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी, परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करावी, परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये, रिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी, वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघराची सुविधा असावी आदी सूचना मुश्रीफ यांनी दिल्या. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असून, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांत या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे गत महिन्यात आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांसोबत बैठक झाली व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी लवकरच बैठक बोलावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मंत्री मुश्रिफ यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याची खात्री दिली.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock