नाशिक महानगरपालिकेत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु – Nashik Mahanagarpalika Bharti 2023

hanuman

Active member
Nashik-Mahanagarpalika.png

Nashik Mahanagarpalika Bharti 2023


: Nashik Mahanagarpalika is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Special Advocate”. Eligible candidates can apply offline before the last date. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website .

Nashik Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Special Advocate” posts. There are a total of 03 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is . Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 20th of May 2023. For more details about NMC Recruitment 2022, Nashik Municipal Corporation Bharti 2022, visit our website .​

Nashik Municipal Corporation Bharti 2023

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने व विरुद्ध दाखल होणाऱ्या खालील तक्त्यात नमूद न्यायाधिकरणांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या विशेष विधिज्ञाची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी नियुक्ती करणेकरिता विहित ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
Ne.gif

  • पदाचे नाव विशेष विधिज्ञ
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 35 ते 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२००२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2023

Nashik Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
विशेष विधिज्ञ03 पदे

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या
विशेष विधिज्ञ१) शैक्षणिक अर्हता आणि अनुभव – उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी.
२) प्राधान्यशील अर्हता- विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. ( LLM )पदवी धारक असावा.

३) वयोमर्यादा – किमान ३५ वर्ष कमाल ५० वर्ष

४) विधींज्ञांचे / वकिलांचे स्वतःचे कार्यालय, दूरध्वनी व सहाय्यक कर्मचारी यासह अद्यावत असले पाहिजे. उमेदवारास कमीत कमी १५ वर्षे वरील तक्त्यात नमूद केलेल्या न्यायाधिकरणामध्ये किंवा यापैकी जास्तीत जास्त न्यायाधिकरणामध्ये कामकाज केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

NMC Recruitment 2023 – Important Documents

  1. आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षाचे किमान १ ते २ न्यायनिवाडे व वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत
  2. सनद प्रत
  3. आधार कार्ड
  4. पॅन कार्ड
  5. शैक्षणिक प्रमाणपत्र

How To Apply For NMC Bharti 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • मनपा विशेष पॅनल वकील पदासाठी करावयाचा अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ यांचे कार्यालयात किंवा पोष्टाने दिनांक ३/०५/२०२३ ते दिनांक २०/०५/२०२३ पर्यंत १०.०० ते १६.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत सादर करावेत
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाहीत तसेच पोष्टाने दिनांक २३/०५/२०२३ पर्यंत १८.०० वाजेनंतर प्राप्त झालेल्या अर्जानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्जाचा नमुना (nmc.gov.in) या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरून सादर करावा. अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Nashik Municipal Corporation (NMC)
📥
Recruitment Details
NMC Recruitment 2023
👉
Name of Posts
Special Advocate​
🔷
No of Posts
03 Vacancies
📂
Job Location
Nashik
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Hon. Commissioner and Administrator Nashik Municipal Corporation, Nashik Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik 422002
✅
Official WebSite
arogya.maharashtra.gov.in

Educational Qualification For Nashik Municipal Corporation Recruitment 2023

Special Advocate1) Educational Qualification and Experience – The candidate should possess a Law Degree.

Age Criteria For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

Age Limit35 to 50 years

Nashik Mahanagarpalika Vacancy

Special Advocate03 Vacancies

All Important Dates For Nashik Municipal Corporation Recruitment

⏰
Last Date
20th of May 2023
2) Preferential Qualification- Graduate Examination in Law discipline L. L. M. ( LLM ) degree holder.

3) Age Limit – Minimum 35 years Maximum 50 years.

4) Lawyers/ Advocates should have their own office, telephone, and support staff up to date. The candidate must have at least 15 years of experience in the Tribunal mentioned in the above table or a maximum of these Tribunals.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For nmc.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

: The draft agreement with TCS has been finalized for the recruitment process of 700 posts in the Municipal Corporation. The process of contracting for a period of three years is in the final stage. The process of contracting for a ten-year period is in the final stages. In the coming days Nashik Municipal Recruitment Process will carried Out. Check below Update:



महापालिकेतील रिक्त पदांना भरतीस शासनाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर या भरतीसाठी शासनानेच ठरवून दिलेल्या टाटा इन्स्टिट्यूट कंपनीसोबत नोकर भरतीच्या कच्चा कराराला महापालिका आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली असून, सामंजस्य कराराची प्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येणाऱ्या तीन वर्षाच्या काळात महापालिकेत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.



मनपाने नोकर भरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती केली. त्यासंदभातील शासनाचा निर्णय महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी या दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएस या संस्थेकडून महापालिकेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून टीसीएसशी संपर्क साधण्यात आला होता. टीसीएसने नोकर भरतीसाठी होकार दर्शविल्यानंतर त्यासाठी नियमावली ठरविण्यात आली.



महापालिकेने त्यात काही बदल सुचविल्यानंतर कंपनीने कच्चा कराराचा मसुदा गेल्या आठवड्यात महापालिकेकडे पाठविला होता. त्याचा अभ्यास करून महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या कच्चा कराराला मान्यता दिली आहे. हा कच्चा मसुदा पुन्हा टीसीएसकडे पाठविण्यात आला असून, येत्या आठवडाभरात अंतिम सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील.





महापालिकेतील ७०० पदांच्या नोकर भरती प्रक्रियेसाठी टीसीएस या संस्थेसमवेत कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. तीन वर्षे मुदतीसाठी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. दहा वर्षे मुदतीसाठी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. दहा दिवसांत याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. एकीकडे शहराची लोकसंख्या २० लाखांपेक्षा जास्त झाली असताना गेल्या २४ वर्षांत जवळपास २८०० पदे रिक्त झाली आहेत. . ती दबाव, अर्थिक आरोप-प्रत्यारोप होण्याची भीती लक्षात घेत प्रशासनाने चाणाक्षपणे स्वप्रक्रियेला ‘टाटा’ करून या भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएससोबत करारनाम्याच्या अंतिम मसुद्यास चाल दिली. पुढील तीन वर्षांसाठी महापालिका टीसीएसला महापालिकेतील सर्वप्रकारच्या पदांच्या भरतीचे अधिकार देणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

दहा दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

d37395c8-741b-4ca1-92f8-535efac2fd67-800x304.jpg


Screenshot-2023-04-12-161118-800x233.png






Nashik Mahanagarpalika Bharti 2023


: NMC (Nashik Municipal Corporation) has recently announced recruitment for the vacant post. The recruitment process will be carried by TCS now. The official website of Nashik Mahanagar Palika is nmc.gov.in. More details are as follows:-​



स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कर्मचारी नियुक्त करताना लाड व पागे समितीच्या शिफारशी संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसह अन्य कुठलाही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मेघवाळ, मेहतर व वाल्मीकी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने शासनाने लाड व पागे समिती गठित केली. या समितीने डोक्यावरून मैला वाहणाऱ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छतेचे काम त्यांनाच द्यावे अशा सूचना केल्या आहेत.

Ne.gif


त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाल्मीक मेहतर व मेघवाळ समाजाच्या नागरिकांना स्वच्छतेचे काम दिले जात होते. परंतु २०१६ मध्ये तत्कालीन शासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बदल केला. त्यात मेघवाळ, वाल्मीकी व मेहतर समाजाव्यतिरिक्त स्वच्छतेचे काम करणारा प्रत्येक घटक या व्याख्येत बसविण्यात आला.​



शौचालय स्वच्छता, घाणीशी संबंधित तसेच मलनिस्सारण व्यवस्था नाली व गटारे ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग, डोक्यावरून महिला वाहून नेणारा वर्ग यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बसविण्यात आले.​



तसेच, सफाई कामगारांकरिता वारसा हक्काची तरतूददेखील करण्यात आली. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या वारसांना त्यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्या आधारे नेमणूक वर्ग चार किंवा वर्ग तीनमध्ये करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या. शासनाच्या या निर्णयामुळे वाल्मीकी, मेहता व मेघवाळ समाजा व्यतिरिक्त अन्य लोक सफाई कामाचे हकदार ठरले.​



परंतु असे असले तरी स्वच्छतेचे काम करणाऱ्यांचे नोकरी पदेदेखील घटली. लाड व पागे समितीच्या शिफारशी कायम करावे याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. यावर १८ एप्रिलला पुढील सुनावणी देण्याचे सूचित करताना तोपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नये, अशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.​







महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय, अग्निशमन विभागासाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात टीसीएस या संस्थेशी महापालिकेचा करारनामा होणार आहे. करारनामा झाल्यानंतर मनपाच्या बहुप्रतीक्षित असलेला ७०१ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



शासनाने नाशिक महापालिकेला आरोग्य वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागातील जवळपास ७०१ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती. त्यासाठी शासनाने नामनिर्देशित केेलेल्या संस्थांपैकी आयबीपीएस आणि टीसीएस या दोन संस्थांची निवड महापालिकेने केली होती. त्यानुसार मनपाच्या प्रशासन विभागाने संबंधित दोन्ही संस्थांना पत्र देऊन त्यांच्या अटीशर्ती तसेच भरती प्रक्रिया कशी राबविणार, त्यासाठीचे शुल्क किती आकारणार, याबाबतची माहिती मागविली होती. त्यासंदर्भात आयबीपीएसने भरती प्रक्रियेसाठी होकार कळविला होता. मात्र त्यानंतर करारनामा करण्याविषयी संस्थेने काहीच कार्यवाही केली नाही वा तसे स्वारस्यही दाखविले नाही. त्यामुळे प्रशासन विभागाने टीसीएस संस्थेशी संपर्क साधून भरती प्रक्रियेविषयी विचारणा केली असता, टीसीएसने उत्सुकता दाखविली असून, आता या संस्थेबरोबर करारनामा होणे तेवढे बाकी आहे. संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर मनपाची बैठक होऊन आढावा घेण्यात आला असून, पुढील आठवड्यात मनपा आणि टीसीएस यांचा करारनामा पूर्ण होऊन भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.​



महापालिकेचा आस्थापना खर्च वाढता असल्याने महापालिकेसमोर भरती करण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र, शासनाने आस्थापना खर्चाची अट एकवेळेसाठी शिथिल केल्याने तसेच सध्या मनपाचा आस्थापना खर्चही ३५ टक्क्यांपर्यंत आल्याने मनपाच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.​




महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदासाठीच्या भरतीची प्रक्रियेसाठी महापालिकेने टीसीएस कंपनीला दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. नियम व अटी महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी आयबीपीएस संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु, असमर्थता दर्शविण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नोकर भरतीचा प्रस्ताव सादर केला. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना २४ वर्षांपासून महापालिकेत कुठलीही नोकरभरती झाली नाही.

महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली. महापालिकेत सद्यःस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकर भरतीला अडचणीची ठरत आहे.

परंतु, कोरोना काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती.

परंतु,सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती. अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली.​




राज्याच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरभरतीसाठी आवश्यक असलेली ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट एका वेळेपुरती शिथिल केली आहे. त्यामुळे महापालिकेतील जम्बो नोकरभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सद्यस्थितीतील पदभरतीसोबतच नगरविकासच्या निर्णयानंतर महापालिकेत जवळपास २,८०० जम्बो भरतीतील मुख्य अडथळाही दूर झाला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेत सातव्या वेतन आयोगासह आश्वासित प्रगती योजनेमुळे महापालिकेचा आस्थापना खर्च सध्या ३५ टक्क्यांवर आहे.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र ‘क’ वर्गाचाच कार्यरत आहे. महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७,०९० पद मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे २,८०० हून अधिक पदे दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना उपलब्ध साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना मुलभूत सेवा-सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर गेल्यावर्षी शासनाने अग्निशमन विभागाच्या ३४८, तर वैद्यकीय व आरोग्य विभागातील ३५८ अशाप्रकारे एकूण ७०४ पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली.​



या भरतीसाठी आयबीपीएस संस्थेसमवेत कराराची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू आहे. परंतु, आता नानाविध कारणामुळे गेल्या अकरा वर्षांपासून अडकलेली महापालिकेतील नोकरभरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी घेतलेल्या लागोपाठ दोन निर्णयांमुळे दृष्टिपथास आली आहे. राज्यातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने या नोकरभरतीत अडथळा ठरणारी ३५ टक्के आस्थापना प्रशासनाने प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या अकरा विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी केल्याने महापालिकेत आता ७०४, नव्हे तर २,८०० पदांसाठी जम्बो भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.​

■ आरोग्य विभाग : ३५८
■ अग्निशमन विभाग : ३४८
■ एकूण पदे : ७०४
उर्वरित २,००० पदे नगरविकासच्या निर्णयामुळे महापालिकेत भरती


Nashik Mahanagarpalika Bharti 2023


Finally Nashik Mahanagarpalika has decided that this Recruitment Process will be carried out by IBPS. So Accordingly, the state government has given permission to Nashik Municipal Corporation to fill up 706 vacancies in Medical Health and Fire Department as a matter of urgency. Out Of TCS and IBPS, IBPS proposal has been received. Accordingly, this process will be implemented soon and preparations are underway. Nashik Mahanagarpalika Bharti 2023.

महापालिकेतील अकरा विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलींच्या प्रस्तावाला गुरुवारी महासभेने मान्यता दिली. या बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रियेस अखेर महासभेनेही हिरवा कंदील दिल्याने आता अग्निशमन, वैद्यकीय आरोग्यच्या ७०४ पदांसह विविध विभागांतील अडीच हजार रिक्त पदांच्या जम्बो भरतीची लगबग प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

महासभेच्या मान्यतेनंतर संबंधित सेवाप्रवेश नियमावली अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविली जाणार असून, गेल्या २१ वर्षांपासून वाढीव आस्थापना खर्च, आकृतिबंध आणि अन्य अडचणींमुळे रखडलेल्या महापालिकेतील प्रस्तावित नोकरभरती प्रक्रियेला आता वेग येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यानंतर नाशिक महापालिकेतील नोकरभरती दृष्टिपथात आली आहे. महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला, तरी आस्थापना परिशिष्ट मात्र ‘क’ वर्गाचाच कार्यरत आहे. महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गांतील ७,०९० पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे २,८०० हून अधिक पदे दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नाही. ‘ब’ संवर्गानुसार सरकारच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या १४ हजार पदांच्या सुधारित आकृतिबंधाला सरकारने गेल्या आठ वर्षांत मंजुरी दिलेली नाही. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना उपलब्ध साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी ७०४ पदांच्या भरतीला मान्यता दिली होती.​

Nashik Mahanagar Palika Bharti 2023





: : मागील अपडेट : :


महापालिकेच्या आस्थापनेवर जवळपास २८०० पदे रिक्त आहे. त्या व्यतिरिक्त महापालिका ‘ब’ वर्गाच्या दर्जात समाविष्ट झाल्याने त्यानुसार जवळपास १४ हजार पदांचा आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. परंतु, शासनाच्या नवीन नियमानुसार आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असेल तर रिक्त पदे भरता येत नाही.

त्यानुसार नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च जवळपास ४२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. जोपर्यंत पस्तीस टक्के परत खर्च येत नाही, तोपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासनाने स्पष्टपणे नकार दिला आहे. परंतु, मागील दोन वर्षात राज्यात कोरोनाचा सामना करताना मनुष्यबळाची कमतरता भासली.

त्यामुळे राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय या दोन प्रमुख विभागांचे रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली. परंतु सेवा प्रवेश नियमावलीचा महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने नोकर भरती होऊ शकली नाही. शासनाच्या सूचनेनुसार अग्निशमन विभागातील ३४८ व वैद्यकीय विभागातील ३५८ या एकूण ७०६ पदांसाठी सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देण्यात आली.

त्यानंतर राज्य शासनाने रिक्त पदांची भरती करण्यासाठी टीसीएस व आयबीपीएस या दोन संस्थांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले. त्यानुसार महापालिकेला आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव प्राप्त झाला.

आयबीपीएस या संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्याची तयारी प्रशासनाकडून केली असतानाच पदवीधर मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नोकर भरतीवरदेखील मर्यादा आल्या आहेत.

‘ॲप’च्या माध्यमातून फसवणूक

आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सामंजस्य करार होऊन नोकर भरतीची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. मात्र, सोशल मिडियाच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

यात महापालिकेत दोन हजार रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी ठराविक लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन करून ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जात आहे. ॲप डाऊनलोड करताना ओटीपी तसेच खासगी माहिती विचारली जात असल्याने यातून बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू असल्याने नोकर भरती करता येत नाही. महापालिकेने आयबीपीएस संस्थेमार्फत वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप संस्थेसोबत करार झालेला नाही. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्रक्रिया पार पडेल. बोगस भरती किंवा अन्य भूलथापांना बळी पडू नये.”





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांमध्ये मेगा भरती करण्याची घोषणा केल्यानंतर आता महापालिकेत अडीच हजार पदांवर नोकरभरती होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेत सध्या वैद्यकीय व अग्निशमन विभागात ७०६ पदांसाठीची भरतीप्रक्रिया सुरू होणार असून, आता उर्वरित रिक्त असलेल्या १,८०० पदांवरही भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचननेनंतर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासकीय, लेखा, तसेच तांत्रिक पदांसाठीची सेवाप्रवेश नियमावली मंजूर करण्यासाठी नगरविकासकडे आठ दिवसांत प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेत जम्बो नोकरभरतीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.



महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. एकीकडे महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला असला तरी सद्यःस्थितीत क वर्गाचाच आकृतिबंध आहे. निवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या जवळपास २,८०० पर्यंत पोहोचली आहे. करोना काळात सरकारने अत्यावश्यक बाब म्हणून ८७५ नवीन पदांना सरकारने मंजुरी दिली. मात्र, सेवाप्रवेश नियमावलीचा प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवाप्रवेश नियमावली मंजूर केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आयबीपीएस संस्थेसोबत आचारसंहितेनंतर नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुसरीकडे राज्यातील प्रमुख आयुक्तांची बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत प्रामुख्याने नोकरभरतीच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. त्यात राज्यभरात महापालिका व नगर परिषदांमधील जवळपास ४० हजार पदे भरली जातील, अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अडीच हजार रिक्त पदांवरही भरती होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेत २,८०० पदे रिक्त असून, त्यापैकी ७०६ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली आहे. मात्र, उर्वरित सुमारे २,१०० पदापैकी प्रशासन, लेखा व तांत्रिक संवर्गातील १,८०० पदांबाबत कारवाई करणे गरजेचे असल्याची बाब आयुक्त पुलकुंडवार यांनी नगरविकास विभागाकडे मांडली आहे. त्यामुळे आता या १,८०० पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव आठवडाभरात पाठवला जाणार आहे.​

Ne.gif


सेवाप्रवेश नियमावलीसाठी पाठपुरावा


सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या आचारसंहितेत ७०६ पदांची भरती अडकली आहे. ही आचारसंहिता चार फेब्रुवारीनंतर संपुष्टात येईल. तोपर्यंत उर्वरित १,८०० पदांसाठीच्या सेवाप्रवेश नियमावली मंजुरीसाठी मंत्रालयात पाठपुरावा केला जाणार आहे. आचारसंहितेच्या आत ही सेवाप्रवेश नियमावली मंजूर झाल्यास एकत्रितपणे अडीच हजार पदांसाठीची भरतीप्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. सध्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०६ मंजूर पदांसाठीची नोकरभरतीची प्रक्रिया सुरू आहे. आचारसंहितेनंतर ही प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाईल, तसेच उर्वरित जवळपास १,८०० पदे भरतीसाठी आवश्यक सेवाप्रवेश नियमावली तयार करून मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पुढील आठवड्यामध्ये पाठवली जाईल.​



महापालिकेच्या विविध विभागांतील ७०६ पदांची नोकरभरती प्रक्रिया नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. नोकरभरतीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात, आयबीपीएस बरोबर होणारा सामंजस्य करार आचारसंहितेत सापडल्याने मनपाची नोकरभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण ७,२०० इतकी पदे आहेत. परंतु, गेल्या १३ ते १५ वर्षांत महापालिकेत भरतीच झाली नाही. त्यात सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदांची संख्या वाढत गेल्याने कमी मनुष्यबळात सध्या मनपाचा कारभार सुरू आहे. रिक्तपदांची संख्या २,८०० वर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना मनपा प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य-वैद्यकीय व अग्निशमन या अत्यावश्यक सेवेशी संबंधित विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, सेवाप्रवेश नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकरभरतीची प्रक्रिया रखडली. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठी सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्य शासनाने नोकरभरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती करत त्यांच्यामार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याची सूचना मनपाला केली होती. त्यानुसार मनपाने संबंधित दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएसकडून महापालिकेला प्रस्ताव प्राप्त झाला असून, या संस्थेबरोबर करार करण्यात येणार होता. मात्र पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने करार करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

: अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या (Nashik Mahanagarpalika Bharti 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेचा एकमेव प्रस्ताव सादर झाल्याने याच संस्थेमार्फत भरती केली जाणार असून, साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023


कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही.​

NMC Recruitment 2023


मात्र, राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.​

NMC Firefighters Medical Recruitment process


कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्तपदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे. (Nashik Mahanagarpalika Bharti 2023)​

  • मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही, मात्र राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.
  • त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.
  • त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे.

सदर संस्थेने नाशिक महापालिकेला प्रस्ताव दिला असून, या प्रस्तावाचा अभ्यास प्रशासनाच्या मार्फत सुरू आहे. पुढील आठवड्यात आयबीपीएस संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीनेदेखील प्रस्ताव दिल्यास या मार्फतदेखील विचार होणार आहे. दोन्ही संस्थांमार्फत रिक्त पदांची भरती होईल किंवा महापालिकेला परवडेल, अशा एकाच संस्थेच्या माध्यमातून भरती होईल. जानेवारी महिन्यात रिक्त जागा भरल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

“अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या टीसीएस व आयबीपीएस या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यातील आयबीपीएस संस्थेने प्रस्ताव स्वीकारला आहे.”- मनोज घोडे- पाटील, उपायुक्त, प्रशासन.​

NMC Bharti 2023 | Nashik Mahanagarpalika Bharti 2023


Nashik Mahanagarpalika Bharti 2022




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock