हरित ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्रात १ लाख २९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, त्यासंबंधीच्या सामंजस्य करारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जलविद्युत ऊर्जानिर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोअरेज प्रकल्पासाठी ८२ हजार नदी २९९ कोटींची गुंतवणूक असलेल्या व १८ हजार ४४० रोजगार निर्मिती होणार असलेल्या तीन कंपन्यांसोबत सह्याद्री अतिथिगृह येथे सामंजस्य करार करण्यात आले.
कोणासोबत झाले करार?
उदेचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात जलसंपदा विभाग आणि एसजेवीएन लिमिटेड, जेएसडब्ल्यू एनर्जी लि. आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि. यांच्यातील सामंजस्य करारप्रसंगी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे, आदी उपस्थित होते. पम्प्ड स्टोअरेज सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आल्या. याशिवाय आणखी ४७ हजार ५०० कोटींची गुंतवणूक व १८ हजार ८२८ रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असलेले करार चार कंपन्यांसोबत करण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाराष्ट्रात विद्युत वितरण मंडळ या सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, ऊर्जा विभागाचे सहसचिव नारायण कराड उपस्थित होते.
The post appeared first on .