दिव्यांग पदोन्नती धोरणांतर्गत ४ टक्के आरक्षण लागू! Divyang Kalyan Vibhag Bharti 2023

hanuman

Active member
Divyang Kalyan Vibhag Bharti 2023

Divyang Kalyan Vibhag Bharti 2023


– Latest update is published by the CMO Maharashtra, The state will implement the promotion reservation policy for the disabled as per the Centre. 4 percent reservation applicable for promotion to disabled employees. Know More details at below:​



राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता (InternShip) विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार आहे. हा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. त्याचबरोबर, राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचा-यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू



CMO Maharashtra


दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतीपासून ते महानगर पालिकापर्यंत (स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये) ५ टक्के निधी राखीव आहे. या निधीचा स्थानिक ठिकाणी योग्य व पूर्णतः वापर करण्याचे कार्य सुरु आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये दिव्यांगासाठी सरळसेवा व पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण आहे. त्याची तपासणी शासन स्तरावरून करण्यात येत आहे. तसेच राज्यात २४ जिल्ह्यामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन झाले आहे. तसेच उर्वरीत जिल्ह्यामध्येही पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणास शासनाचे प्राधान्य असून दिव्यांगांना दाद मागण्यासाठी विशेष न्यायालय तयार करण्याचीही कार्यवाही विभागामार्फत सुरू आहे.





मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक २९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित बैठकीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील “दिव्यांग कल्याण” हे वेगळे करून स्वतंत्र “दिव्यांग कल्याण विभाग” निर्माण करण्यास तसेच मंत्रालयीन स्तरावरील स्वतंत्र विभाग, आयुक्त, दिव्यांग कल्याण, प्रादेशिक स्तर, जिल्हा स्तर तसेच तालुका स्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांची एकूण २०६३ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यास अनुसरुन सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १५ डिसेंबर, २०२२ च्या शासन अधिसूचनेद्वारे “दिव्यांग कल्याण विभाग” निर्माण करण्यात आलेला आहे. तसेच उच्चस्तरीय सचिव समितीच्या गुरुवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२२ रोजी झालेल्या सन २०२२ मधील ६ व्या बैठकीमध्ये “दिव्यांग कल्याण विभागासाठी” प्रथम टप्प्यात एकूण ४२ (३२ नियमीत पदे+१० बाहययत्रंणेद्वारे घ्यावयाची पदे) पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरुन नव्याने सुरु झालेल्या “ दिव्यांग कल्याण ” विभागास तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी अधिकारी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock