दहावीच्या निकालासंदर्भात आक्षेप असेल तर गुणपडताळणीसाठी अर्ज कसा करायचा? – SSC Online Verification System

hanuman

Active member
Laptop.png


SSC Online Verification System by boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/ & verification.mh-ssc.ac.in : Students have to apply to the departmental board through online mode on the official website of the board to check marks after online result, get answer sheet copy and revaluation. Application has to be done on the website verification.mh-ssc.ac.in. All information, terms, conditions and instructions are available on the website. Students have to pay for this process online only. Students can also pay through net banking.​

विद्यार्थ्यांना जर का आपल्या गुणांची पडताळणी करायची असेल तर ते यासाठी अर्ज करू शकतात. 3 जून ते 12 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. याबाबतची सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरुपानेच पैसे भरावे लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नेट बँकिंगद्वारे देखील पैसे भरता येतील.



गुणपडताळणीसाठी शनिवार 3 जून ते सोमवार 12 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.50/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील.

तर, मार्च 2023 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी मागणीसाठी 1) ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन 2) स्वत: जाऊन घेणे आणि 3) पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने झेरॉक्स कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तर पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर झेरॉक्स कॉपी मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या प्रती विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे राहणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस सुरु राहणार असल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock