खुशखबर!! पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे HCचे आदेश! – Anganwadi Sevika Bharti 2023

hanuman

Active member
anganwadi sevika bharti

Mini Anganwadi Sevika Bharti 2023


: High Court order to approve recruitment of mini anganwadi workers before promotion, and start Mini Anganwadi Bharti process. Objection to the new promotion criteria Earlier, helpers who passed 10th were promoted as servants. However, according to the new norms of the government, it was decided to promote the 12th-passed helpers as servants. Therefore, the organizations challenged this new criterion in the court. Hence approval is given to fill up the vacancies prior to promotion.​

🧿

खुशखबर !! राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली आहे. मदतनीस म्हणून नव्या निकषानुसार दिलेल्या पदोन्नतीच्या आधी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या ज्या जागा रिक्त होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू करा, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. तर लवकरच मिनी अंगणवाडी सेविका भरती २०२३ सुरु होणार अधिक माहिती साठी महाभरती ला भेट देत राहा…व या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

पदोन्नतीच्या नव्या निकषाला आक्षेप

७ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२ च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली. याबाबतच्या शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रतेबाबतचा सविस्तर शासन आदेशही याआधी काढण्यात आला. परंतु अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रतेबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी २४ मार्च रोजी झाली. त्यावेळी न्यायालयाने सकृतदर्शनी या आक्षेपांचा विचार करून १७ एप्रिल २३ पर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती.​

मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता

याप्रकरणी पुन्हा सुनावणी होऊन नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याआधीची मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. पदोन्नतीच्या नव्या निकषाला आक्षेप पूर्वी दहावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जात होती. परंतु, शासनाच्या नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या नव्या निकषालाच संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले. म्हणूनच पदोन्नतीच्या आधीच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.​


Anganwadi Sevika Bharti 2023 New Update


Anganwadi Sevika Bharti 2023 – Minister Mangalprabhat Lodha has given great information about Anganwadi workers. 20 percent salary increase will be done. Also, we are going to recruit 20 thousand Anganwadi workers by the month of May. Also, 150 crores will be spent on purchasing mobile phones for Anganwadi workers. So we are starting 200 container Anganwadi Sevikas in municipal area. Lodha informed that Anganwadi rental rate will be increased.​

अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी – 20 टक्के पगार वाढ

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. (Anganwadi salary issues )अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी माहिती दिली आहे. (Maharashtra Anganwadi Bharti 2023 ) अंगणवाडी सेविका मानधन वाढ अर्थसंकल्प अधिवेशनात होईल, असे ते म्हणाले. 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत, अशी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरुच आहे. मानधनात वाढ करण्याची त्यांची मागणी कायम आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती देताना सांगितले की, 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोबाईल खरेदी करण्साचा 150 कोटी खर्च केले जाणार आहे. तर मनपा क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाडी सेविका सुरु करत आहोत. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली. तर अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

आज प्रश्नोतरच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. जवळपास 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या विभागाचे मंत्री उत्तर देत होते तेव्हा सगळेच म्हणत होते उत्तर व्यवस्थित दिलंच नाही. या सरकारची भूमिका योग्य नाही. 100 सदस्य प्रश्न उपस्थित करून देखील मंत्री बघू बघू म्हणत असतील हे योग्य नाही.ज्या घोषणा तोंडी केल्या जातायत मात्र सरकार अंमलबजावणी करत नाहीत, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच अंगणवाडी सेविका विषयी प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील असे सांगत असतील तर असे मंत्री कश्याला पाहिजे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली​


Anganwadi Sevika Recruitment 2023 Update


– Everyone is waiting for Anganwadi Sevika Recruitment Process to be carried Out !! Many of us have Question when will Be Maharashtra Anganwadi Worker Bharti Process Start in 2023 !! Here is the answer to all your questions. Anganwadi workers and assistants are going to be recruited for vacant posts in Anganwadi in the district. Before that, the assistant will be promoted on the vacant post. After that, recruitment will be done by direct service appointment as per the orders of the state government. So check eligibility for Maha Anganwadi Sevika Vacancy 2023, Age Limit for Maha Anganwadi Worker Jobs 2023 and other information at below :​

जिल्ह्यातील अंगणवाडीत रिक्त पदावर अंगणवाडीताई व – मदतनीस यांची भरती होणार आहे. त्यापूर्वी रिक्त पदावर मदतनीस यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यानंतर राहिलेल्या ठिकाणी राज्य शासनाच्या आदेशानुसार सरळ सेवा नियुक्तीने भरती होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ७१८ रिक्त पदाच्या भरतीची तयारी जिल्हा परिषदेकडून सुरू झाली आहे. जिल्ह्यात ३ हजार २६३ मोठ्या तर १९४५ मिनी अंगणवाडी आहेत. जिल्ह्यात १३१ पर्यवेक्षिकांचे पदे मंजूर आहेत. यापैकी ९४ पदे कार्यरत असून, ३७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ३ हजार २६३ अंगणवाडीत ३ हजार ३८ सेविका कार्यरत असून, २२५ पदे रिक्त आहेत.

मिनी अंगणवाडीमध्ये १ हजार २६ सेविका कार्यरत असून, ७७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात मदतनिसांचे ३ हजार १४७ पदे मंजूर असून, यापैकी २ हजार ७१५ पदे कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या ४३२ ठिकाणी पदांची भरती करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकासाठी यापूर्वी सातवी पास उत्तीर्णची अट होती. आता या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान १८ तर कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.


Anganwadi Sevika Bharti 2023


Anganwadi Sevak Bharti 2023 : The State Government has given approval to fill the vacant 20,000 posts of Anganwadi Servants, Helpers, Mini Anganwadi Sevakis. District Nirmala Pansare, president of the Zila Parishad and Pooja Parge, chairperson of the Women and Child Welfare Committee, have been ordered to fill the vacant posts in Anganwadi center in the district.​

अंगणवाडी सेविकांसाठी १२ वी पासची नवीन अट

राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार जागांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे. २६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

जानेवारीअखेरीस भरतीची प्रक्रिया सुरु होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागणार आहेत. त्यानंतर विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता, यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. या संदर्भातील .



अपडेट : २३ मार्च २०२० : सिंधुदुर्ग अंगणवाडी सेविका भरती लवकरच सुरु होण्याचे संकेत आहे, या संदर्भातील बातमी खाली दिलेली आहे.

Anganwadi Sevika Bharti 2020 Updates


Sindhudurg Anganwadi Sevaika Bharti 2020 details & updates are given below. The candidates are requested to keep visiting MahaBharti For more updates & details.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्‍त पदे भरण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्‍त 585 पदे भरण्यासाठी तालुकास्तरावर भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांनी दिली.​


राज्य सरकारने 2017 पासून अंगणवाड्यांमधील पद भरती करण्यास स्थगिती दिली होती. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारकडून स्थगिती उठवली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यांतर्गत जास्तीत जास्त मुलांची संख्या असणारी अंगणवाडी केंद्र, आदिवासी क्षेत्रातील कुपोषणाची तीव्र समस्या असलेली क्षेत्र, डोंगराळ भाग, तालुक्‍याच्या ठिकाणापासून दुर्गम भागात असेलेली अंगणवाडी केंद्रांचा प्राधान्याने विचार करून पदभरती करण्यात येणार आहे.​

सौर्स : प्रभात​



राज्यभरात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या सहा हजार ५०० रिक्त जागा भरण्यास मंजुरी देतानाच, भाडेतत्वावर सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतींच्या भाड्यात ग्रामीण भागासाठी चार हजार रुपये तर शहरभागासाठी सहा हजार रूपये मासिक भाडेवाढ करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेश सिंग यांनी शनिवारी दिली.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या राज्यभर रिक्त जागा आहेत. त्या त्वरित भरण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित होती. त्यावर लक्ष केंद्रीत करून या साडेसहा हजार जागा भरण्याचे आदेश ठाकूर यांनी विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनास दिले. याशिवाय अंगणवाडी केंद्राच्या तुटपुंज्या भाड्यामध्ये वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदे भरण्यावर तीन वर्षांपासून निर्बंध लावण्यात आले होते. आता हे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सेविका व मदतनीसच्या साडेसहा हजार जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेले ९८ अंगणवाडी केंद्र व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्र आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यभर रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त ४५ जागा भरण्याचे आदेशही ठाकूर यांनी यावेळी जारी केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.​


मासिक भाड्यातही वाढ
राज्यभरात ३७ हजार ५४५ अंगणवाडी केंद्र भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. या इमारतीच्या भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जाते. आढावा बैठकीत त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण व आदिवासी भागातील केंद्रासाठी याआधी ७५० रूपये मासिक भाडे दिले जात असे. यापुढे त्यासाठी एक हजार रूपये निश्चित केले आहेत. शहरी भागातील केंद्रासाठी ७५० रूपये भाडे होते. ते आता चार हजार रूपये करण्यात आले. महानगरामधील अंगणवाडी केंद्राचे भाडे ७५० रूपयांवरून सहा हजार रूपये करण्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock