आशा सेविकांची विविध पदे भरण्याचा निर्णय झाला! – Asha Swayamsevika Bharti 2023

hanuman

Active member
aasha 2023

Asha Swayamsevika Bharti 2023


: The latest update for Asha Swayam Sevika Recruitment 2023. As per the latest news, there are a total of 5000 + 266 New Swayamsevika posts that will be recruiting soon in the Municipal Corporation. It has been decided to recruit five thousand Asha sevaks into the service. This time the remuneration given to aasha swayam sevika will be more that the rules of central government, So this is the golden opportunity for this job seekers. Further details are as follows:-​



मिरा-भाईंदर महापालिकेच्या आस्थापनेवरील काही महत्त्वाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ‘आशा’ सेविकांची रिक्त असलेली २७६ पदे भरण्याचा निर्णयही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत करून आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मिरा-भाईंदर पालिका हद्दीत आशा सेविकांच्या मदतीने आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषित बालकांचा शोध घेणे व इतर सरकारी योजनांचे काम केले जात आहे. यासाठी सध्या अनेक आशा सेविका ठोक मानधनावर कार्यरत आहेत. परंतु, मागील काही वर्षांत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, मनुष्यबळ अपुरे पडत आहे. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने आशा सेविकांची २७६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी, पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूददेखील करण्यात आली आहे. यासाठी एक विशेष समिती स्थापन करत त्यांच्या मदतीने आरोग्य केंद्र स्तरावर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच आवश्यक कार्यवाहीदेखील सुरू केली जाणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.




मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आशा सेविका (Asha Sevika) भरतीमध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत वस्ती पातळीवर गृहभेटीद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधाकरिता आशा सेविका या कामावर आधारित मोबदला तत्त्वावर नेमणूक करायची आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या संदर्भात जाहिरात काढली असून यामध्ये विवाहित (Married) आशा सेविकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे.



आशा सेविकांसाठी वयाची अट
मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 1000 ते 1200 लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका आणि अशा 250 घरांकरता नेमणूक करण्यात येईल. निवडीच्या निकषांमध्ये जरी ही अट दिली नसली तरी यामध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. शिवाय आशा सेविकांची वयोमर्यादा सुद्धा 25 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.



‘या’ कारणासाठी विवाहित आशा सेविकांना प्राधान्य
या आशा सेविकांवर विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी यामध्ये असणार आहे. विवाहित महिला असली तर कुटुंब नियोजन, गरोदर माता यासंबंधीच्या विषयांवर संवाद साधणे सोपे जाते त्यासाठी ही अलिखित अट असल्याचं सांगितलं गेलं आहे.



आशा सेविका कोण असतात, त्या नेमकं काय काम करतात?
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते. आशा सेविका ही गावातील स्थानिक असते. आशा सेविकेकडून गावातील आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेतृत्व करणे हे योगदान अपेक्षित असतं. साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्‍या आशा सेविकांवर असते. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने ‘आशा सेविका’ सामाजिक दुवा म्हणून काम करतात. राज्यभरात साधारण 70 हजार आशा सेविका कार्यरत आहेत. आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1 हजार लोकसंख्येमागे 1 आशा सेविका नियुक्त आहे तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 1500 लोकसंख्येमागे 1 आशा सेविका नियुक्त आहे.



मुंबई महानगरपालिकेत वस्तीपातळीवर गृहभेटीद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता आशा सेविका या कामावर आधारित मोबदला या तत्त्वावर नेमणूक करावयाची आहे. विहित अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून विभागवार अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


आशा सेविकायांचे कामाचे स्वरूप

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात, १००० ते १२०० लोकसंख्येसाठी एक ‘आशा’ स्वयंसेविका व अंदाजे २५० घरांकरिता नेमणूक करण्यात येईल. आशासेविका वस्तीपातळीवर गृहभेटी देवून सर्वेक्षण करतील. त्यांना नेमून दिलेल्या परिसरात सर्वेक्षण करुन विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार इत्यादीबाबत प्रबोधन व उपाययोजनाबाबत कार्य करतील.

आशा सेविकेसाठी निवडीचे निकष व अर्हता :

  • ‘आशा’ स्वयंसेविका महिला असणे आवश्यक आहे व वयोमर्यादा २५ ते ४५ असावी.
  • ‘आशा’ स्वयंसेविकेमध्ये नेतृत्व गुण असावेत व समुदायाशी संवाद साधण्याची क्षमता असावी.
  • ती साक्षर महिला असावी व तिचे किमान १० वी पर्यंत औपचारिक शिक्षण झालेले असावे.
  • इच्छुक सेविका विभागातील शक्यतो जवळ राहणारी असावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ मार्च २०२३ आहे



अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय (ए ते टी विभाग कार्यालय)

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी- १३ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२३

मानधन साधारण रु. ६०००/- पर्यंत प्रति महिना (कामावर आधारित मोबदला )







मुंबई पालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचे काम महत्त्वाचे आहे. करोना प्रादुर्भावात त्यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. संसर्गजन्य तसेच विविध स्वरूपाच्या आजाराचे निदान होण्यासाठी सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषण अशा उपक्रमांमध्ये आशा सेविकांची मदत घेतली जाते.



सध्या मुंबई पालिका क्षेत्रात १ हजार १५० आशा सेविका असून त्यांना मानधन दिले जाते. सध्याच्या आशा सेविकांची संख्या पाहता पालिकेच्या विविध विभागातील आरोग्यकेंद्रामध्ये एक हजार ते एक हजार २०० लोकसंख्येमागे एक आशा सेविकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार पाच हजार आशा सेविकांची नियुक्ती करण्याचे नियोजन होते आणि त्याला सुरुवात झाली आहे.



कांदिवली पश्चिमेच्या आर दक्षिण विभागात ४१५ सेविकांची नियुक्ती केली जाणार असून त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी नमुना व निवडीचे निकषही देण्यात आले आहेत. इच्छुक सेविका विभागातील आणि शक्यतो जवळ राहणारी असावी, किमान शैक्षणिक अर्हता दहावी असावी, २५ ते ४५ वयोगट आणि विवाहित असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. २४ मार्चपर्यंत कांदिवलीच्या आर दक्षिण विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. मुंबईतील पालिकेच्या अन्य विभागतही आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.


Asha Swayam Sevika Recruitment 2023

प्रकल्प अंमलबजावणी आराखडा २०२२-२३ मध्ये आशा योजनेंतर्गत आशा सेविकांची सांगली जिल्ह्यासाठी २६६ पदे मंजूर झाली आहेत. सध्या जिल्ह्यात १९५९ आशा सेविका कार्यरत आहेत. यामध्ये नवीन मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा नागरिकांना सहजतेने उपलब्ध होणार आहे. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या विशेष प्रयत्नाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या पाठपुराव्याने आशा सेविकांची जिल्ह्यासाठी २६६ पदे मंजूर झाली आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबविण्यात येत ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय साधण्याच्या दृष्टीने आशा सेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.



प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १९५९ : आशा सेविका कार्यरत होत्या. त्यामध्ये २६६ इतक्या नवीन आशा सेविकांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त मनुष्य बळ उपलब्ध झाल्याने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा नागरिकांना सहजतेने उपलब्ध होणार महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. आशा सेविकामार्फत रुग्णांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात. त्याबद्दल त्यांना त्यांच्या कामावर आधारित मोबादला देण्यात येतो. ‘आशां’ना सहाय्य व मार्गदर्शन करण्याकरिता ९६ गटप्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व १० तालुका समूह संघटक तालुका स्तरावर कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण ६४ आहेत.







महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्याचा भार हा प्रामुख्याने आशा सेविकांवर अवलंबून असतो. त्यांच्याच माध्यमातून राज्याचा आरोग्य विभाग गर्भवती व बालकांचे आरोग्य जपणूक, विविध साथींचा आढावा घेण्याचे काम तसेच वृद्धांचे आरोग्य, मानसिक आणि अन्य आजारांशी निगडित विविध विषय हाताळणे, मार्गदर्शन, माहिती गोळा करणे आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करण्याची कामे करत असते. आशांचे हे महत्त्व ओळखून मुंबई महापालिकेनेही प्रामुख्याने झोपडपट्टी विभागात ५,५०० आशा सेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या निकषांच्या पलीकडे जाऊन या आशा सेविकांना १० ते १२ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सुमारे साठ हजार आशा सेविका काम करीत असून प्रामुख्याने राज्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या या आशा सेविकांना जवळपास ७२ प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतात. मुंबई महापालिच्या अखत्यारीतील आशा सेविकांच्या माध्यमातून झोपडपट्टी विभागात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मासिक सभांचे आयोजन, जन्म-मृत्यूची नोंदणी, पात्र जोडप्यांची यादी, लसीकरणासाठी पात्र बालकांची नोंद, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व व पश्चात आवश्यक असलेल्या तपासण्यांची नोंद ठेवणे आदी ३९ प्रकारची आरोग्यविषयक कामे प्राधान्याने करावी लागतात. त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात साधारणपणे आठ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न या आशा सेविकांना मिळत असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


मुंबईतील गरीब वस्तींमधील वाढलेली लोकसंख्या, महिला व लहान मुलांची संख्या आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात या भागातील आरोग्यविषयक माहिती हाती असणे तसेच या वर्गाला आरोग्यविषयक सेवा योग्यप्रकारे पोहोचविण्याचे महत्त्व अधिक प्रकर्षांने अधोरेखित झाल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी साडेपाच हजार आशा सेविकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

Asha Swayam Sevika Bharti 2023

  • गोवर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एकूण आरोग्यव्यवस्थेचा लेखाजोखा घेतला जात आहे.
  • उपनगरीय रुग्णालयांमधील आरोग्यव्यवस्था, रचना, आरोग्यकेंद्रांची उपलब्धता, तेथील रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा दर्जा या आरोग्यसेवांशी निगडित विविध वैद्यकीय सेवांची गुणवत्ता तपासली जात आहे.
  • रिक्तपदांची पूर्तता करण्याचेही आव्हान आहे.
  • करोना संकटानंतर आरोग्य सुविधांसाठी गुणात्मक, संख्यात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची गरज वाढली आहे.
  • त्यात सर्वेक्षणाचा भाग महत्त्वाचा असून पालिका क्षेत्रामध्ये सध्या १,५५० आशासेविका आहेत.
  • त्यांच्या कामाचे निश्चित उद्दिष्ट साध्य केल्यानंतर त्यानुसार मानधन दिले जाते.
  • एक हजार लोकसंख्येमागे एक या प्रमाणानुसार आशासेविकांची नियुक्ती केली जाईल.
  • मुंबईत या नियोजनानुसार पाच हजार आशासेविकांची नियुक्ती केली जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्यअधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मानधनही समाधानकारक हवे


पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये गोवर संसर्गाच्या प्रसाराचा प्रभागनिहाय आढावा घेतला जात असताना आशासेविकांच्या उपलब्धतेचाही मुद्दा पुढे आला. मानधनाच्या मुद्द्यांवरही आशासेविकांच्या नियुक्तीवेळी समाधानकारक पर्याय देण्याची पालिका प्रशासनाची तयारी असल्याचे समजते. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. काळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.​

‘प्रशिक्षणानंतरच जबाबदारी द्यावी’

  • अचानक आलेल्या आजारांच्या साथींसाठी अनेकदा जास्तीचे काम करावे लागते.
  • गोवर संसर्गामध्ये काम करूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि अधिकच्या कामामुळे नेहमीची मोबदला मिळणारी कामे मागे पडतात.
  • त्यामुळे त्यांच्या मानधनाची रक्कम कमी होते.
  • तरी सर्वेक्षण, साथरोग नियंत्रणासाठी महिन्याला किमान ३,००० रुपये अतिरिक्त मानधन मंजूर करावे.
  • दर महिन्याच्या सात तारखेच्या आत मासिक मानधन देतानाच ज्या ७८ कामांसाठी मोबदला मिळतो, त्यातील काही कामांचा तपशील भरून घेतला जात नाही.
  • भरती झाल्यावर ताबडतोब प्रशिक्षण दिल्यानंतरच कामांची जबाबदारी आणि मोबदला देण्यात यावा’, अशी मागणी आहे.
  • मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन यांनी मुंबईत काम करणाऱ्या आशासेविकांचे प्रलंबित प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेले नाही याकडे लक्ष वेधले.


Previous Update –

Asha Swayamsevika Bharti 2023


Maharashtra Asha Swayamsevika Bharti 2023 – Maharashtra Asha Swayamsevika Bharti 2022 is starting soon, this will be a great opportunity for the 8th pass women’s in PCMC. Thera are total 157 vacancies under this bharti process.

तुमच्या ओळखीत कोणी आठवी उत्तीर्ण महिला नोकरीच्या शोधात असेल तर तुम्ही त्यांची मदत करु शकता. कारण आठवी उत्तीर्ण महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत (Pimpari Chinchwad Municipal Corporation, PCMC Bharti 2022) आशा स्वयंसेविका पदांची (Asha Swayamsevika Job 2023) भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

Asha Swayamsevika Recruitment 2022


Aasha Swayam Sevika Bharti 2022


या पदासाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करु शकतात. विवाहित महिलांना येथे कामाची संधी दिली जाणार आहे. तसेच पदासाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवार या पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थानिक रहिवाशी असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे.​

आकुर्डी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, भोसरी रुग्णालय, वाय.सी.एस रुग्णालय, सांगवी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, तालेरा रुग्णालय, थेरगाव रुग्णालय येथे एकूण १५७ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

  • Prabhakar Malharrao Kute Memorial Hospital Akurdi
  • PCMC Yamunanagar Hospital
  • PCMC Bhosari Hospital
  • PCMC Yashwantrao Chavan Memorial Hospital
  • PCMC Jijamata Hospital
  • PCMC Talora Hospital
  • PCMC Thergaon Hospital

Important Documents For Asha Swayamsevika Application 2022


पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock