अहमदनगर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती – अर्ज करा!! | Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023

hanuman

Active member
Ahmednagar-Mahanagarpalika-logo.jpg

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Details


: AMC (Ahmednagar Municipal Corporation) is going to recruit for the vacant posts of “Full time Medical Officer, Medical Officer, Part Time Medical Officer, A.N.M. (Female)”. Interested and eligible candidates can apply before the 13th of March 2023. The official website of Ahmednagar Mahanagarpalika is amc.gov.in. Further details are as follows:-​

अहमदनगर महानगरपलिका, येथे “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम. (महिला)” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
13 मार्च 2023
आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम. (महिला)
  • पद संख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे
    • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
    • इतर पदे – 65 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 150/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवार – रु. 100/-
  • अर्ज पद्धती ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जुनी महानगरपालिका, यतिम खाना समोर, माळीवाडा, अहमदनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    13 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अधिकृत वेबसाईट –

Ahmednagar Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी05 पदे
वैद्यकीय अधिकारी05 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी03 पदे
ए.एन.एम. (महिला)05 पदे

Educational Qualification For Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
वैद्यकीय अधिकारीMBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
ए.एन.एम. (महिला)SSC, ANM Course Completed, Mediical Nursing Council Registration

Salary Details For Ahmednagar Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीRs. 30,000/- per month
ए.एन.एम. (महिला)Rs. 18,000/- per month

Ahmednagar Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents

  1. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला ( Leaving / TC Certificate )
  4. शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र
  5. नमुना अर्जात संपुर्ण माहिती.

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Details

Department NameAhmednagar Municipal Corporation
Recruitment NameAhmednagar Mahanagarpalika Recruitment
Name of PostsCivil Engineer, Town Planning Specialist, MIS Specialist
Total Posts03 Vacancies
Application ModeInterview Details are given
Official Website

Eligibility Criteria For Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

Civil EngineerB.E Civil Degree
Town Planning SpecialistPost Graduation Degree
MIS SpecialistDiploma in Computer Science

How To Apply For Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2023

  • वरील पदांसाठी अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अपुर्ण स्वरुपातील, स्वाक्षरी नसलेले, अर्हता व अनुभव धारण करीत नसलेले अर्ज मुलाखत व निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद संबंधितांनी घ्यावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    13 मार्च 2023
    आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Ahmednagar Mahanagarpalika Vacancy 2023 – Eligibility Criteria

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For AMC Recruitment 2023 | amc.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Update


– After receiving official approval from the Government, Ahmednagar Municipal Corporation is going to fill Various vacant positions of Engineers, Medical Officer, Stenographers and various Posts. Candidates who wants to become a part of Ahmednagar Mahanagarpalika must Know latest Update about Vacancies To be filled in Ahmednagar MNC 2023. Check it out below :​

अहमदनगर महापालिकेतील तांत्रिक पदांच्या सुमारे १७५ रिक्त कर्मचाऱ्यांच्या जागा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मनपा स्थापनेनंतरची ही पहिलीच भरती प्रक्रिया होणार असून, या माध्यमातून महापालिकेला २५ नवीन अभियंते, ७ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. विद्युत, पाणीपुरवठा, नगररचना व बांधकाम विभागात तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने येणाऱ्या अडचणी या भरतीमुळे दूर होणार आहेत.

महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेचा २८९० जागांचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे. त्यातील प्रत्यक्ष १६०० जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत आणखी काही कर्मचारी व अभियंते निवृत्त होणार आहेत. बहुतांश तांत्रिक पदे रिक्त असल्याने कामात अडथळे येतात. या रिक्त पदांपैकी ९ जागा प्रतिनियुक्तीने, तर १७५ जागा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त करण्यासाठी पथदिवे घोटाळ्यापासून मनपाच्या विद्युत विभागाकडे अभियंता नाही. विद्युत पर्यवेक्षकही नाही. भरती प्रक्रियेतून २ विद्युत अभियंते व ३ विद्युत निरीक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्युत विभागात पूर्ण वेळ अभियंते व निरीक्षक उपलब्ध होणार आहेत. यातून विभागाचे कोलमडलेले कामकाज पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.



मनपात होणाऱ्या भरती प्रक्रियेत ही पदेही भरण्यात येणार
संगणक प्रोग्रॅमर, आरेखक (ड्रॉप्समन) / आर्किटेक्चरल असिस्टंट, विद्युत पर्यवेक्षक, गाळणी परिचर (पाणी लॅब लॅबटेक्निशियन), रक्तसंक्रमण अधिकारी, स्त्री रोगतज्ञ, बालरोग तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, परिचारीका (जी.एन.एम.), सहाय्यक परिचारीका / प्रसविका, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघुटंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाज विकास अधिकारी, सॅनिटरी सब इन्स्पेक्टर, सब ऑफीसर, ड्रायव्हर, ऑपरेटर, फायरमन.​



अभियंत्यांच्या या जागा भरणार : शाखा अभियंता (स्थापत्य) ६, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३, अभियांत्रिकी सहाय्यक ८, शाखा अभियंता (यांत्रिकी) २, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ३, शाखा अभियंता (विद्युत) २, कनिष्ठ अभियंता (ॲटोमोबाईल ) १. सध्या गरज म्हणून त्यापैकी २५ पदे भरण्यात येणार आहेत.



अहमदनगर महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभागृहात पाणी प्रश्‍नावर व विकास योजनेच्या आराखड्यावर चर्चा सुरू असताना अभियंते व कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर नगरसेवक भैय्या गंधे यांनी भरती प्रक्रियेबाबत माहिती विचारली. येत्या मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्पष्ट केले. तसेच मानधनावर अभियंता नियुक्ती संदर्भात झालेल्या प्रक्रियेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबतही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.



सदस्य निवडीनंतर झालेल्या विशेष सभेत शहरातील विविध वसाहती, रस्ते व भागांना नावे देण्याचे अकरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनामार्फत युनिटची मागणी करणे व इरादा जाहीर करण्याचा विषय मंजूर करताना सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी शहराचा वाढता विस्तार व जागांची कमतरता लक्षात घेऊन शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. दरम्यान, सभेत सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. विशेष सभेच्या सुरुवातीलाच नगरसेविका दिपाली बारस्कर, रुपाली वारे, संपत बारस्कर, सागर बोरुडे यांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. अभियंता रोहिदास सातपुते यांनी प्रश्‍नांना उत्तर देताना माझ्याकडे फक्त वितरण व्यवस्था असल्याचे सांगितले.​



जल अभियंता परिमल निकम रजेवर असल्याने अभियंता गाडळकर यांनी उत्तरे देत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नामकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विकास योजनेच्या नवीन आराखड्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी सभापती वाकळे यांनी शहराच्या वाढत्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष वेधले. मनपा हद्दीतील बहुतांश परिसर विकसित झाले आहेत. नव्या आराखड्यानंतर भविष्यात वाढत्या विस्तारामुळे हद्दवाढ करावी लागणार असल्याचे मत व्यक्त केले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी महासभेच्या सूचनेनुसार हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करता येईल, मात्र, कोणते क्षेत्र घ्यायचे याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र या विषयावर चर्चा झाली नाही. सभेच्या शेवटी नगरसेवकांनी पथदिवे ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी अद्याप पथदिवे बसविण्यात आले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनाकडून लवकरात लवकर पथदिवे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.​




आस्थापना खर्चाची अट शिथिल करून महापालिकेला सरळ सेवा भरतीतून तांत्रिक पदाच्या १७५ जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. राज्य सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


आस्थापना खर्चाची अट शिथिल करून १७५ जागांवर सरळ सेवा भरतीद्वारे कर्मचारी नियुक्तीसाठी मनपाने नगरविकास विभागाकडे नुकताच प्रस्ताव सादर केला होता. मुंबई येथे बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी भरतीला हिरवा कंदिल दाखविला.​

२ हजार ८९० जागांचा कर्मचारी आकृतिबंध मंजूर

महापालिकेचा २ हजार ८९० जागांचा कर्मचारी आकृतिबंध मंजूर आहे. प्रत्यक्षात मात्र सोळाशे कर्मचारीच कार्यरत आहेत. प्रत्येक विभागांतील तांत्रिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजात अनेक अडचणी येतात. विकासकामे तातडीने मार्गी लागत नाहीत. अनेक कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी ही भरती करता येत नाही. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
मनपाचा आस्थापना खर्च ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत गेल्याने आकृतिबंध मंजूर असला तरी नव्याने कर्मचारी भरतीला अडचणी येतात. त्यामुळे रिक्त जागांवर कर्मचारी भरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मनपाने शासनाकडे केली होती.

या जागा भरणार – Ahmednagar MNC Vacancy 2023

शासनाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर मनपात शहर खालील पदांवर भरती होणार !!!

  • अभियंता​
  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)​
  • जलअभियंता​
  • उपअभियंता (विद्युत)​
  • माहिती व जनसंपर्क अधिकारी​
  • पर्यावरण संवर्धन अधिकारी तसेच तीन सहायक नगररचनाकार.​
  • तसेच संगणक प्रोग्रॅमर​
  • शाखा अभियंता (स्थापत्य)​
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)​
  • अभियांत्रिकी सहायक​
  • आरेखक​
  • आर्किटेक्चरल असिस्टंट​
  • शाखा अभियंता​
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)​
  • शाखा अभियंता (विद्युत)​
  • विद्युत पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता​
  • गाळणी परिचर (पाणी लॅब टेक्निशियन)​
  • रक्तसंक्रमण अधिकारी​
  • स्त्री रोगतज्ज्ञ​
  • वैद्यकीय अधिकारी​
  • लॅब टेक्निशियन​
  • पारिचारिका​
  • सहायक परिचारिका​
  • प्रदूषण नियंत्रण अधिकारी​
  • पशुधन पर्यवेक्षक​
  • लघुटंकलेखक​
  • कनिष्ठ विधि अधिकारी​
  • समाज विकास अधिकारी​
  • स्वच्छता निरीक्षक आदी १७५ जणांची भरती केली जाणार आहे.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock