अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ, भरती प्रक्रिया लवकरच अपेक्षित! – Nagpur Fire Brigade Bharti 2024

hanuman

Active member
Nagpur Fire Bharti 2021

Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2024




Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2024 Update – विभागातील निम्मी पदे रिक्त आहेत. सरकारने नव्या आकृतिबंधाला आणि सेवाभरती नियमाला मंजुरी दिली तरी पालिका प्रशासनाने मात्र रिक्त पदे भरण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे यंदाही अग्निशमन विभागाचा कारभार अपुऱ्या मनुष्यबळावरच चालणार हे स्पष्ट आहे. अग्निशमन विभाग महत्त्वाचा असल्याने विभागाचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. पण, सुरुवातीपासूनच प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. सरकारने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर केला, सेवाभरती नियमांनाही मंजुरी दिली. या निर्णयाला वर्ष उलटून गेले. तरीही प्रशासनाने नोकर भरती केली नाही. रोस्टरचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील १३ केंद्रांसाठी ८७२ पदे मंजूर आहेत. त्यात मुख्य अग्निशमन अधिकारी, स्टेशन ऑफिसर, उप अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशामक, ड्रायव्हर ऑपरेटर, वाहनचालक, अग्निशामक, टेलिफोन ऑपरेटर, मोटर फिटर, शिपाई-मजूर या पदांचा समावेश आहे. शहरातील नऊ केंद्रांसाठी विविध विभागात ६११ पदांची आवश्यकता आहे. सध्या अग्निशमन विभागात ३०३ कर्मचारी असून ४४९ पदे रिक्त आहेत.

Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2024


कार्यरत ३०३ कर्मचाऱ्यांमध्ये ४० पेक्षा अधिक कर्मचारी येत्या काही महिन्यात निवृत्त होणार आहेत. वाहन चालकांची ७ पदे रिक्त आहेत, यंत्रचालक १६२ पदे मंजूर असून त्यातील ४६ पदे रिक्त आहेत. सध्या ७५ पदांवर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. त्यातील काही पदे फायरमनची आहेत. उन्हाळ्यात आगीच्या अनेक घटना घडतात. ही बाब लक्षात घेतली तर अग्निशमन विभाग सक्षम असणे आवश्यक आहे. पण, सध्याचे अपुरे मनुष्यबळ बघता या विभागाला अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.​




नागपूर शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन विभागात ८७२ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या केवळ १४४ कर्मचाऱ्यांवर विभागाचा डोलारा सांभाळला जात -आहे. गेल्या दोन वर्षापासून रिक्त पदे भरण्याबाबत आकृतिबंधाला मंजुरी मिळूनही ४०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षात शहरात आगीच्या आणि इतरही -आपत्कालीन घटना बघता महापालिकेच्या अग्निशमन विभागात अपुऱ्या कर्मचान्यामुळे अनेकदा कामाचा ताण वाढत आहे. महापालिकेच्या आकृतिबंधानुसार अग्निशमन विभागात विविध विभागात एकूण ८७२ पदे मंजूर झाली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात नव्या पदासाठी भरती करण्यात आली नाही. शहरातील विविध भागात १५ केंद्राची आवश्यकता असताना सध्या केवळ ९ केंद्रे आहेत आणि त्यातील प्रत्येक केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. महापालिकेत ६३ फायरमनची कंत्राटी पद्धतीवर विभागात नव्याने पदभरती करणार आहे. या विभागातील निम्मी पदे रिक्त आहेत.






सरकारने नव्या आकृतिबंधाला आणि सेवाभरती नियमाला मंजुरी दिली असली, तरी पालिका प्रशासनाने रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. महालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विभागांपैकी अग्निशमन विभाग -सुद्धा एक महत्त्वाचा विभाग आहे. विभागाच्या बळकटीकरणाकडे पालिकेच्या सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिलेले नाही. त्यामुळे जैसे थे स्थितीत या विभागाचे आजही काम सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या विभागासाठी मंजूर पदांची संख्या ८७२ आहे. परंतु ही संख्या १३ अग्निशमन केंद्रासाठी आहे. सध्या महापालिकेकडे ९ अग्निशमन केंद्र ९ आहेत.​



त्यात मुख्य अग्निशमन अधिकारी, स्टेशन ऑफिसर, उप अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशामक, अग्निशामक, ड्रायव्हर ऑपरेटर, वाहनचालक, अग्निशामक टेलिफोन ऑपरेटर, मोटर फिटर, शिपाई-मजूर या पदांचा समावेश आहे. अग्निशमन विमोचक ५०० पदे असताना २९१ पदे रिक्त आहेत. प्रमुख अग्निशमन विमोचक ८१ पदे असताना ३७ पदे त्यात रिक्त आहेत. याशिवाय फिटर व वाहकांची १५ पदे असताना पाच पदे त्यात रिक्त आहे. राज्य सरकारने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर केला, सेवाभरती नियमांनाही मंजुरी दिली. या निर्णयाला दीड ते दोन वर्षे उलटून गेले, अद्याप प्रशासनाने नोकर भरती केली नाही. नोकर भरतीसाठी रोस्टरचे कारण पुढे केले जात आहे.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock