अंगणवाडी सेविका भरतीला मान्यता- हायकोर्टाचा आदेश! – Maharashtra Anganwadi Bharti 2023

hanuman

Active member
Anganwadi Sevika Bharti 2023 Details

Anganwadi Bharti 2023


– The recruitment process for the vacant posts of Anganwadi workers, helpers and mini Anganwadi workers, which has been stalled till now, will be implemented from the government level. The posts of Anganwadi workers and helpers are vacant in the district. However, there is reliable information that the vacant posts after promotion will be filled possibly between April, May.​



राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली आहे. मदतनीस म्हणून नव्या निकषानुसार दिलेल्या पदोन्नतीच्या आधी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या ज्या जागा रिक्त होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू करा, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. ७ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२ च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली. याबाबतच्या शैक्षणिक आणि वयोमर्यादा पात्रतेबाबतचा सविस्तर शासन आदेशही याआधी काढण्यात आला.

परंतु अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रतेबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी २४ मार्च रोजी झाली. त्यावेळी न्यायालयाने सकृतदर्शनी या आक्षेपांचा विचार करून १७ एप्रिल २३ पर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. याप्रकरणी पुन्हा सुनावणी होऊन नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याआधीची मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.



पदोन्नतीच्या नव्या निकषाला आक्षेप

पूर्वी दहावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जात होती. परंतु, शासनाच्या नव्या निकषानुसार बारावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या नव्या निकषालाच संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले. म्हणूनच पदोन्नतीच्या आधीच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.




अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांची 822 पदे रिक्त होती. यासाठी भरतीप्रक्रिया सुरू होती. आधी या भरतीला जिल्हा परिषद कर्मचारी संपामुळे ग्रहण लागले होते. आता अंगणवाडीसेविकांच्या संघटनेने भरतीवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अंगणवाडीसेविका संघटनेची याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेत पुढील सुनावणी 17 एप्रिलला ठेवली आहे. तोपर्यंत सर्व प्रक्रिया थांबवण्यास सांगितल्याने आता 17 एप्रिलपर्यंत अंगणवाडीसेविकांची भरती स्थगित राहणार असून, पुढील सुनावणीनंतर या भरतीची पुढील दिशा ठरणार आहे.



अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांच्या जागांसाठी सुरू असलेली भरतीप्रक्रियेला 27 मार्चला स्थगिती देण्यात आली आहे. महिला व बालकल्याण आयुक्त रुबल अग्रवाल यांनी हे आदेश काढले आहेत. दरम्यान, राज्यात 4 हजार 509 अंगणवाडीसेविका, 626 मिनी अंगणवाडीसेविका आणि 15 हजार 466 मदतनीस अशा 20 हजार 601 जागा रिक्त होत्या. या सर्व रिक्त जागांसाठी महिला बालकल्याण विभागाने भरतीप्रक्रिया सुरू केली होती. मुंबई उच्च न्यायालयात अंगणवाडीसेविकांनी भरतीबाबत याचिका दाखल केली असून, त्यावर प्राथमिक सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाने अंगणवाडीसेविका यांची भरती अथवा त्यांना कामावरून कमी करण्यास स्थगिती दिली आहे.







अंगणवाडीतील मदतनिसांना पदोन्नतीने अंगणवाडी सेविका होण्यासाठी बारावी उत्तीर्णची अट घालण्यात आली होती. त्याला संघटनांकडून विरोध झाला होता. पूर्वीप्रमाणे दहावी उत्तीर्ण ही अट ठेवण्याची मागणी होती. प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने याचिकेवर नुकत्याच झालेल्या सुनावणीत भरतीला 17 एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यातील अंगणवाड्यांतील सुमारे वीस हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अंगणवाडी कर्मचारी संघटनेने उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या दोन फेब्रुवारीच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर 24 मार्चला उच्च न्यायालयात प्राथमिक सुनावणी झाली. पुढील सुनावणी 17 एप्रिलपर्यंत होणार असून, तोपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानुसार, 17 एप्रिलपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशी सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल यांनी राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांसह कार्यक्रम अधिकार्‍यांना दिली.

दहावी पास निकष बदलला : अंगणवाडी कर्मचारी महासभा आणि अंगणवाडी कर्मचारी संयुक्त समितीचे असे म्हणणे आहे की, 20 वर्षापासून आणि तीस वर्षापासून हजारो मदतनीस अंगणवाडी केंद्रात काम करत आहे. त्या बालकांना पोषण आहार देतात. बालकांना अनौपचारिक शिकवण्याच्या कामांमध्ये मुख्य सेविकेला मदत करत असतात. त्यांच्यासाठी पूर्वी सातवी पास हे निकष होते. नंतर ते वाढवले गेले. आता अचानक महाराष्ट्र शासनाने दहावी पास निकष असताना ते बदलून बारावी उत्तीर्ण असावे, असा नवीन निकष फेब्रुवारी महिन्यात केला. त्यामुळे याला आव्हान देणे जरुरी होते, असे अंगणवाडी कर्मचारी महासभेने याचिकेमध्ये नमूद केले.



राज्यात 4509 अंगणवाडी सेविका, 626 मिनी अंगणवाडी सेविका तसेच 15 हजार 466 मदतनीस असे एकूण 20 हजार 601 एवढी रिक्त पदे आहेत. जिल्हा किंवा प्रकल्पाच्या अधीनस्त असलेली सर्व रिक्त पदे तसेच पुढील तीन महिन्यांच्या आत अर्थात 31 मे पूर्वी कालबद्ध कार्यक्रमानुसार भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, कार्यवाही सुरू करण्यात आली होती. आता सर्व प्रक्रिया थांबविली आहे. संघटनेकडून मदतनिसांच्या पदोन्नतीच्या शिक्षणामध्ये केलेल्या वाढीच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर याचिका दाखल केली. सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे.

निकष शासनाने का बदलला : याचिकेमध्ये हा देखील आरोप करण्यात आला की, शासनाने अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस असे त्यांचे पद रिक्त ठेवले गेले. त्याचे कारण शासनानेच खरंतर जनतेला सांगितले पाहिजे. मात्र बारावी पासच्या निकषामुळे त्यात अधिकच भर पडली. त्यामुळे भरती होत असेल, तर आधी ज्यांनी वीस ते तीस वर्षे सेवा केलेली आहे, त्यांचे काय? मदतनीस यांना बारावीऐवजी दहावी निकष होता. तो शासनाने का बदलला? असा सवाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस पटेल यांनी सरकारी पक्ष आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने दोन्ही भूमिका ऐकून घेतल्या. त्याबाबत टिपणे नोंदवून घेतली. तसेच 17 एप्रिल 2023 रोजी याची पुढील सुनावणी निश्चित केली. यासंदर्भात अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या अ‍ॅड. निशा शिवूरकर यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या की, एकतर शासनाने 2 फेब्रुवारी 2023 रोजी हा शासन निर्णय जारी केला. त्यामध्ये भरतीच्या संदर्भातील निकष दहावीवरून बारावी केले आहे. त्यामुळे ज्यांचे सामाजिक आर्थिक परिस्थितीने शिक्षण झालेच नाही. ज्या वीस पंचवीस वर्ष कार्यरत आहेत त्यांचे काय? त्या मदतनीस काय करणार? त्यामुळे आम्हाला शासनाच्या निर्णयाला आव्हान द्यावे लागले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे.





अंगणवाडींच्या रिक्त सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. बारावी उत्तीर्णची अट असली तरी या पदांसाठी DEd, BEd, MSc, BCom, BA झालेल्या महिलांचे अर्ज आले आहेत. निवड प्रक्रिया अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेनुसार होणार असल्याने अंगणवाड्यांना उच्चशिक्षित कर्मचारी मिळणार, हे स्पष्ट होत आहे. अंगणवाडी सेविका भरतीच्या पुढील अपडेट्ससाठी किंवा जॉईन व्हा.



शालेय जीवनाची सुरुवात अंगणवाडीपासूनच होते. बालकांना शाळेची सवय, अंक-अक्षर ओळख इथेच होते. पूर्वी या विभागाकडे शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. पण, विद्यार्थी-पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढू लागल्याचा फटका प्राथमिक शाळांना बसू लागला. इंग्रजी शाळा अंगणवाडी स्तरावरूनच विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचू लागल्या. त्यामुळे धोरणात बदल करण्यात आला. अलीकडे महिला बालविकास विभाग व शिक्षण विभाग हातात हात घालून काम करू लागले आहेत. त्यामुळे अंगणवाडी स्तरावरही शिक्षणाचे महत्त्‍व वाढले आहे.

अंगणवाडींच्या रिक्त पदांसाठी शासनाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्वी सेविकेसाठी दहावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची अट होती. मात्र, अलीकडे ऑनलाईन कामांचा भार वाढला आहे. माहिती भरण्यासह अनेक ऑनलाईन कामे करावी लागतात. त्यामुळे शासनाने दोन्ही पदांसाठी बारावी उत्तीर्णची अट लावली आहे. मात्र, त्यापेक्षाही अधिक शिक्षण घेतलेल्या महिलांचे या पदांसाठी अर्ज आले आहेत. सेविकेसह मदतनीस पदासाठीही बीएड, डीएड, एमएस्सी, बीकॉम, बीए झालेल्या महिलांनी अर्ज केले आहेत. बारावीपुढे शिक्षण झालेल्यांना त्यानुसार अधिकच्या गुणांची तरतूद आहे. त्यातून गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना उच्चशिक्षित कर्मचारी मिळणार आहेत.
अंगणवाडी सेविकांना सध्या साडेआठ हजार रुपये मानधन मिळते. तर मदतनीसना साडेचार हजार रुपये मिळतात. शासनाने नुकतीच त्यामध्ये अनुक्रमे दीड व एक हजार रुपयांची वाढ केली आहे. उच्चशिक्षितांचे अर्ज येण्यामागे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे चांगले मानधन हेही एक कारण आहे.

Anganvadi Bharti 2023 District wise Links


अंगणवाडी सेविकांनाही वाढ आशा स्वयंसेविकांचे मानधन ३५०० वरून पाच हजार रुपये करण्यात आले आहे तर गतप्रवर्तकांना आता ४७०० ऐवजी ६२०० रुपये मानधन मिळेल. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरून १० हजार रुपये करण्यात आले आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार २०० रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी मदतनिसांचे मानधनही ४ हजार ४२५ वरून ५ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविका भरतीच्या पुढील अपडेट्ससाठी किंवा जॉईन व्हा. तसेच अन्य जिल्ह्यांच्या अंगणवाडी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



आतापर्यंत रखडलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांची भरतीप्रक्रिया शासनस्तरावरून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात २८ अंगणवाडी सेविका, १७७ मदतनीसांची पदे रिक्त आहेत. मात्र, पदोन्नतीनंतर रिक्त असलेली पदे शक्यतो एप्रिल, मे दरम्यान भरली जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे…

शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून देशभरात अंगणवाड्यांचे जाळे पसरविण्यात आले आहेत. या अंगणवाड्यांमधून बाल्यावस्थेतील मुलांना आरोग्य, आहार, शिक्षण सुविधा पुरविण्याचे काम शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत आहेत.
दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, कोरोनाच्या आधी पन्नास टक्के रिक्त पदे मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविकांची भरण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मात्र, पदे रिक्त होती.

२०१७ पासून रिक्त प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोरोनाकाळातही प्रक्रीया राबविण्यात आली नाही. आता उर्वरित रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत. पदांबाबत भरतीप्रक्रिया रखडली होती. भरती झाली नव्हती, नंतर ही प्रक्रिया पूर्ण पदे भरण्याबाबत शासनाकडून आदेश सुरू झाले आहेत.​

निर्णयामध्ये काही बदल

अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदांसाठी शासनाने नव्याने काढलेल्या निर्णयामध्ये काही बदल केले आहेत. यापूर्वी असलेल्या काही अटी, शर्ती बदलून त्यात सुधारणा केली आहे. आता राज्य शिक्षण मंडळाअंतर्गत बारावी उत्तीर्ण व त्यास समकक्ष अशी शैक्षणिक पात्रता निश्चित केली. वयाची अट वाढवून ३५ केली आहे. विधवांसाठी वयाची अट ४० केली आहे. इच्छुक महिला त्या गावाची स्थानिक रहिवासी व महसुली गावातील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.​

तर विधवा दाखला हवा!

भरतीप्रक्रियेत एकच अर्ज आल्यास त्याठिकाणी पुन्हा जाहिरातीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. यावेळीही एकच अर्ज आल्यास त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पडताळून कायम केली जाणार आहे. एखाद्या विधवेचा अर्ज आल्यास त्यासाठी दहा गुण अतिरिक्त आहेत. महिलेने विधवा दाखला जोडणे आवश्यक आहे. पदोन्नती नंतर रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची भरती शैक्षणिक गुणवत्तेनुसार होणार आहे. बारावी आणि पुढील शिक्षणावर हे गुण आधारित आहेत.​


Maharashtra Anganwadi Bharti 2023

अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी माहिती दिली आहे. अंगणवाडी सेविका मानधन वाढ अर्थसंकल्प अधिवेशनात होईल, असे ते म्हणाले. 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत.

The recruitment process for the vacant posts of Anganwadi workers, helpers and mini Anganwadi workers is being implemented from the government level and this decision has been taken by the Integrated Child Development Project Department. The posts will be filled and applications have been invited from aspirants in each taluka.

शासनस्तरावरून रखडलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका २७५ रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.कोकण पट्यातील (sawantwadi anganwadi bharti 2023) जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ४३ अंगणवाडी सेविका, २१७ मदतनीस तर १५ मिनी अंगणवाडी सेविकांची पदे यात भरली जाणार असून प्रत्येक तालुकानिहाय इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अन्य जिल्ह्यांच्या अंगणवाडी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

📍


शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातुन देशभरात अंगणवाड्याचे जाळे पसरविण्यात आले आहे. या अंगणवाड्यांमधून बाल्यवस्थेतील मुलांना आरोग्य, आहार, शिक्षण सुविधा पुरविण्याचे काम त्याठिकाणी शासनाच्या माध्यमातून अंगणवाडीसेविका तसेच मदतनीस करत आहेत. त्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात; मात्र अलिकडे राज्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदे रिक्त होती. २०१७ पासून रिक्तपदांबाबत भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनाच्या आधी पन्नास टक्के रिक्त पदे भरण्याच्या हालचाली झाल्या होत्या; मात्र प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोरोना काळात ही भरती झाली नव्हती. नंतर ही प्रक्रिया पुर्ण करण्यात आली; मात्र आता उर्वरित सर्व रिक्तपदे भरण्याबाबत शासनाकडून आदेश काढण्यात आले असून तशा प्रकारची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय अर्ज मागविण्यात येत आहेत.​

📍


अंगणवाडी सेविका मदतनीस या पदांसाठी शासनाने नव्याने काढलेल्या निर्णयामध्ये काही बदल केले आहेत. पूर्वी असलेल्या काही अटी, शर्ती बदलून त्यात सुधारणा केली आहे. आता राज्य शिक्षण मंडळ अंतर्गत बारावी उत्तीर्ण व त्यास समकक्ष अशी शैक्षणिक पात्रता निश्चित केली असून वयाची अट वाढवून ३५ केली आहे. विधवांसाठी वयाची अट ४० केली आहे. इच्छुक महिला त्या गावची स्थानिक रहिवाशी व महसुली गावातील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

अंगणवाडी मदतनीस
तालुका*मंजूर पदे*रिक्त पदे
सावंतवाडी*२०७*२८
कणकवली*१९६*३७
मालवण*२००*५७
वेगुर्ले*१०७*१८
कुडाळ*२०६*३०
वैभववाडी*७७*५
देवगड*१६९*५७
दोडामार्ग*८०*६
एकूण*१२४२*१०२५
———-
मिनी अंगणवाडी सेविका
तालुका*मंजूर पदे*रिक्त पदे
सावंतवाडी*४१*३
कणकवली*५४*३
मालवण*३२*३
वेंगुर्ला*४३*०
कुडाळ*७६*५
वैभववाडी*२३*०
देवगड*५७*१
दोडामार्ग*२६*०





: Good news for job seekers. The latest update for Maharashtra Anganwadi Recruitment 2023. As per the latest news, Integrated Child Development Services [ICDS] is going to start the latest recruitment for Anganwadi Supervisor, Helper, Worker posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-​

खेड तालुक्यातील अंगणवाडीच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रीयेला मुदतवाढ देण्यात आली असुन उमेदवारी अर्ज येत्या सोमवार दि. ६ मार्चपर्यत स्विकारले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी दिली. खेड तालुक्यात ४५२ अंगणवाड्या सध्या कार्यरत असुन १०५ मदतनीस जागा रिक्त आहे. अंगणवाडी सेविकांच्या २० जागा रिक्त आहेत. राज्यभरात अंगणवाडी भरतीप्रक्रीया सुरु आहे. खेड तालुक्यात बुधवार १५ ते २४ फेब्रुवारी पर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती.



मात्र कागदपत्रे जमवण्यासाठी कमी कालावधीत शक्य न झाल्याने काही जागासाठी अर्ज दाखल न झाल्याने अखेर जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या आदेशानुसार खेड तालुक्यातील अंगणवाडी रिक्त जागांसाठी मुदतवाढ देण्यात आली असुन उमेदवारांनी सर्व कागदपत्रासह भरतीप्रक्रीयेसाठी सोमवार दि. ६ मार्च पर्यत अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी केले आहे. सध्या आपल्या मागण्यासाठी राज्यभरात अंगणवाडी सेविका संपावर असल्याने सध्या बालगोपाळांचा शालेय पोषण आहार बंद पडला आहे.​



मदतनीस रिक्त पदे असलेल्या अगंणवाडीचे नाव पुढलप्रमाणे :- लोढुंगवाडी, रौंधळवाडी, बच्चेवाडी, पराळे ,कोये, कुरकुंडी, आसखेड ब्रु, आडगाव, तोरणे, भलवडी , वि-हाम, कासारी, अनावळे, वांद्रा, पिंपळवाडी (औंढे) ,वाघु ,बागडेवस्ती ( कुरुळी ) , कुरुळी-१ , कुरुळी-२ , कडवस्ती , चिबंळीफाटा, माजगाव (चिबंळी) , खराबवाडी-२ , मोई, डोगरेवस्ती(निघोजे), मरकळ, माळीवस्ती (मरकळ) , पाटीलवस्ती (मरकळ) , मरकळ गावठाण , गोलेगाव , सोळु-२ , वडगाव घेनंद-२ ,केळगाव, पिंपळगाव, कु-हाडेवस्ती (च-होली खु.) ,विश्रांतवड (च-होली खु.) ,बोरदरा ,वाकी खु. ,जाचकवस्ती (काळुस) ,शेलपिंपळगाव – १, बहुळ ,शेलगाव ,लोखंडीदरवाजा (शेलपिपळगाव ) ,बापदेव वस्ती (कडाचीवाडी ) ,येलवाडी-१ ,येलवाडी-२ ,चव्हाणवस्ती (भोसे ),कडाचीवाडी , कोळीये , शेलु, भांबोली, आंबेठाण २, थोपटेवाडी (करंजविहिरे) ,सावरदरी, टाक्याची ठाकरवाडी (शेलु), वराळे, सुरकुलवाडी (वाडा ), लांडगेवाडी (वाडा ), शेटेवाडी (वाडा), दरकवाडी, वाळद, जैदवाडी, ढोरेभांबुरवाडी, जरेवाडी, सातकरस्थळ पूर्व, राक्षेवाडी नं १. , तुकईभांबुरवाडी, डेहणे, खरोशी, शिरगांव, मंदोशी, कारकुडी, बांगरवाडी ( एकलहरे ), ढमालेशिवार ( कडुस ) पानमंदवाडी (कडुस ), कडुस नं. २, गोलापुर (कडुस ) क्रांतीनगर ( कडुस ), शेंडेवाडी (कडुस ), नेहरेशिवार (कडुस) साबुर्डी, देशमुखवाडी (साबुर्डी )कोहिंडे बु ,रानमळा, उढाणेस्थळ ( दोंदे ), शिरोली, पोखरणस्थळ ( शिरोली ), भाम (संतोषनगर) ,तांबेवाडी ( वरुडे ), जऊळके खु,,ठाकरवाडी (जऊळके खु), ठाकरवाडी (रेटवडी), हवालदारमळा (रेटवडी) खरपुडी बु,, कनेरसर, सडकवस्ती (कनेरसर) वडाचीवाडी ( कनेरसर ), मलघेवाडी (मांजरेवाडी), निमगांव, दिघेडुंबरेवस्ती (दावडी), कमान, ठाकरवाडी (कमान), बारापाटी (कमान) , बुटटेवाडी, चास, आखरवाडी​




नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही तेथे नवीन अंगणवाडी उघडली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २० हजार ६०१ जुनी रिक्त पदे भरली जाणार आहेत. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ या केंद्र पुरस्कृत योजनेतून महाराष्ट्रात अंगणवाड्या चालविल्या जातात. त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणताना या सर्व अंगणवाड्या अपडेट करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच २०१७ पासून रिक्त असलेली २० हजार पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. येत्या ३१ मेपूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.

महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजुरी
महाराष्ट्रात ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका तर १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस अशी २ लाख ७ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. नोव्हेंबर २०२२ च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची ४ हजार ५०९, मिनी अंगणवाडी सेविकांची ६२६ आणि अंगणवाडी मदतनीसांची १५ हजार ४६६ अशी एकूण २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. ती ३१ मेपर्यंत भरण्याचे निर्देश आहेत.



अंगणवाडी सेविकांचा बांगडी मोर्चा
गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलने करत असून, सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी अंगणवाडी सेविकांनी आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी बांगडी मोर्चा काढला. या अनोख्या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वीही सोलापुरातील या अंगणवाडी सेविकांनी चटणी-भाकरी मोर्चा काढला होता.



बारावी उत्तीर्ण हवी, उच्च शिक्षणालाही स्थान
नव्या पदभरतीमध्ये अंगणवाडी सेविका किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय तिच्याकडे पदवी, पदव्युत्तर पदवी, अन्य उच्च शिक्षण असल्यास भरती प्रक्रियेत त्या शिक्षणासाठी विशेष गुणांचा भारांश दिला जाणार आहे. शिवाय किमान ३५ वर्षे ही वयोमर्यादाही घालण्यात आली आहे. शिवाय संबंधित उमेदवार खेड्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.





राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. १० मार्चनंतर नव्याने सेविका, मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिला व तरूणींसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. साधारणत: अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

यंदा प्रथमच सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. सात-आठ वर्षांनी पदभरती होत असल्याने अनेक उच्चशिक्षित देखील वर्ग- तीन व वर्ग-चार या संवर्गातून शासकीय नोकरीसाठी अर्ज करीत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीत मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात सेविकांची २३६ तर मदतनीसांची २६४ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाड्यांवर ५५ सेविकाची भरती केली जाणार आहे. सध्या जवळपास ९० मदतनीस महिलांना पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरु आहे. १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० मार्चपासून नवीन पदांसाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालयातूनच अर्ज उपलब्ध होणार आहेत. १५ दिवसांत संपूर्ण कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून द्यावा लागणार आहे.

त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची छाननी करेल आणि त्यानंतर मेरिटनुसार यादी प्रसिध्द होईल. शेजारील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची पडताळणी करतील. निवड झालेल्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

७४० अंगणवाड्यांमध्ये वाढणार पदे

जिल्ह्यातील ७४० मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्याच्या महिला व बालविकास विभागाला पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात आणखी ७४० पदे वाढणार आहेत. तसेच मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांचे मानधन देखील वाढणार आहे. सध्या मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांना दरमहा पाच हजार ६७५ रुपयांचे मानधन दिले जाते. तर मोठ्या अंगणवाड्यांमधील सेविकांना आठ हजार ३२५ रुपये आणि मदतनीस असलेल्यांना चार हजार ४२५ रुपये मानधन मिळते. त्यात वाढ करण्याचा निर्णय नवीन आर्थिक वर्षात होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.



खेड मध्ये अंगणवाडी सेविका भरती सुरु !!




खेड तालुक्यात २० सेविका आणि १०५ मदतनीस पदे रिक्त असल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात महिला उमेदवार आपले उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी येत असल्याने गर्दी होऊ लागली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी आहे.

खेड तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या रिक्त पदासाठी खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात महिला उमेदवार आपले उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होऊ लागली असुन गावात गावात आता शिक्षित महिला कागदपत्रासह अर्ज दाखल करत असल्यामुळे स्पर्धा तयार झाली आहे. तालुक्यात ४५२ एकुण अंगणवाड्यापैकी २० सेविका आणि १०५ मदतनीस पदे रिक्त असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २४ फेब्रुवारी अखेर शासकीय कार्यालयीन वेळेत दाखल करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे महिलांचे पतीराज कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावापळ करताना दिसत आहे.



आपल्या कुंटुबातील महिलेची वर्णी लागावी म्हणुन राजकीय हालचाली ना वेग आला असला तरी शैक्षणिक गुणात्मकतेवर निपक्षः पणे कागदपत्रा आधारे ही निवड होणार असल्यामुळे वशिला लावुनही उपयोग होणार नसल्याचे यामागे झालेल्या अंगणवाडी भरतीप्रक्रीयेतुन समोर आले आहे.



Mission Poshan 2.0, Mission Shakti and Mission Vatsalya are being implemented by the Ministry of Women and Child Welfare of the Central Government. After the corona epidemic in the state, the recruitment process of Anganwadi workers has not been done till date. Many Anganwadi posts are vacant due to various reasons. Therefore, there are difficulties in effectively implementing the three schemes Mission Poshan 2.0, Mission Shakti and Mission Vatsalya in Maharashtra. Considering this error, the state government has decided to recruit 20 thousand Anganwadi workers in the first phase.​

Anganwadi Bharti आज वित्त विभागाने सेविका,मिनी सेविका व मदतनिसांची मंजूर पदांच्या संकेत रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.यापूर्वी काही जिल्ह्यात ही पदे ५० टक्के प्रमाणात भरली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे रिक्त असलेली हजारो पदे भरण्यास आजच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे.

राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया आता सुरु झाली आहे. पदोन्नतीनंतर ३१ मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे. हि भरती भरतीसाठी १०० गुणांचे समीकरण वर आधारित असणार आहे. तसेच अंगणवाडी भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.​



दरम्यान, उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातरजमा केली जाईल. त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्पातील एक कर्मचारी, एक पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील. भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासचे उपायुक्त यांचा वॉच असणार आहे.​



निवडी संदर्भातील ठळक बाबी

  • एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड
  • शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला मिळणार संधी
  • शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड
  • ३० दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेरपडताळणी
  • बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार

भरतीसाठी १०० गुणांचे समीकरण

इयत्ता बारावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला ६० गुण मिळतील. ७० ते ८० टक्क्यांसाठी ५५ गुण तर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ५० गुण आणि ५० ते ६० टक्क्यांसाठी ४५ गुण, तर ४० ते ५० टक्क्यांसाठी ४० गुण दिले जाणार आहेत. पदवीधर उमेदवारासाठी ८० टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (७० ते ८० टक्क्यांपर्यंत चार गुण, ६० ते ७० टक्क्यांसाठी तीन गुण असे) एक गुण कमी होणार आहे.

पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.





राज्यातील अंगणवाड्यांमध्ये जवळपास ३० हजार ४०० पदांची भरती केली जाणार आहे. सेविकासाठी आता दहावीऐवजी बारावी उत्तीर्णची अट असणार आहे. मदतनीस व सेविकांची अंतिम निवड करण्याचा अधिकार तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनाच असणार आहे.



🧿
– आधी अंगणवाडीताईंचे प्रमोशन; नंतर भरती


आठ दिवसांत भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

प्रत्येक गावांमधील एक ते सहा वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, अक्षर, अंक ओळख व्हावी या उद्देशाने अंगणवाड्या सुरु करण्यात आहेत. राज्यात एक लाख दहा हजारांपर्यंत अंगणवाड्या असून आणखी वाढीव अंगणवाड्यांचा प्रस्ताव आहे. अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने ९ जानेवारीला पदभरतीला मान्यता दिली आहे. पण, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सेविकांसाठी शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी बारावी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय तयार झाला असून त्याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ भरतीला सुरवात होणार आहे. साधारणत: पुढील ८ दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल. इच्छुक उमेदवारांना तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन निकषांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. तत्पूर्वी, मदतनीस महिलांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जाणार असून त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यभरात १४८ पर्यवेक्षिकांची देखील भरती केली जाणार आहे.​

जिल्ह्यात साडेसहाशे जागांची भरती

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ४२५ मदतनीस व २२५ सेविकांची पदे रिक्त आहेत. महापालिकाअंतर्गत दोन, नगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक आणि ग्रामीणसाठी प्रत्येक तालुक्यात एक बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून आता रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीत उच्चशिक्षित तरूणी, महिला अर्ज करतील. अध्यापनाचा अनुभव असलेल्यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या पदभरतीत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही, असे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Selection Process Anganwadi Bharti 2023 Online Form Registration


निवडीची अशी असेल प्रक्रिया

  • अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार; सेविकांसाठी बारावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची पात्रता
  • तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उमदवाराने अर्ज करायचा
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी कागदपत्रे अर्जासोबत असावीत
  • शैक्षणिक पात्रता सारखीच असल्यास अध्यापनाचा अनुभव पाहिला जाईल.
  • सर्वच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता सारखी व अनुभवही नसेल तर जास्त वय असलेल्यास प्राधान्य असेल.
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय सर्व बाबी सारख्या असल्यास लॉटरी पद्धतीने उमेदवार निवडला जाईल.
  • बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी निवड केलेल्यांची व प्राप्त अर्जदारांची यादी शेजारील तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून पडताळणी हाईल.

Maharashtra ICDS Bharti 2023


मिशन पोषण २.० या उपक्रमामध्ये केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दररोजच्या पोषण आहाराची माहिती टाकणे बंधनकारक आहे. हे ॲप इंग्रजीत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांकडून पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे. या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

विश्वसनीय माहितीनुसार २६ जानेवारीनंतर भरतीप्रक्रिया सुरू होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्याबाबत हरकती मागवणे यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर विधवा, जात संवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या सर्वांचा विचार करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल​

अंगणवाडी भरती फॉर्म २०२३


राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांग़ितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.​


Anganwadi Maharashtra Application form 2023

चिमुकल्यांसाठी शाळेची गोडी लावणारी संस्कार केंद्र आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य केंद्र या दुहेरी भूमिकेत असणाऱ्या गावोगावच्या अंगणवाड्यात असणाऱ्या रिक्त पदांचा प्रश्न आता सुटू शकणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने आज (ता. ११ जानेवारी २०२३ रोजी ) मान्यता दिली. यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विस्कळित झालेल्या कामकाजाला पुन्हा गती येणार आहे.

गावोगावी बालकांसह महिलांच्या दृष्टीने अंगणवाडीचे कार्य आजही महत्त्वपूर्ण व मोलाचे ठरत आहे. त्यातच जिल्ह्यात तब्बल आजारावर पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांच्या कामकाजाला नक्कीच विस्कळितपणा आला असल्याने जिल्हा परिषदेने व लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. वर्षांपूर्वी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९, मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२ जागा रिक्त होत्या. यात नव्याने भर पडली असून एकट्या येवला तालुक्यात दोन्ही प्रकल्पांची प्रकल्प अधिकाऱ्यांसह ९९ पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यात कामकाजात विस्कळितपणा येऊन कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे.​

Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 and Madatnis Bharti 2023


अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्‍न वर्षोनुवर्षे पासून कायम असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आहे, त्या सेविका व मदतनिसांवर कामाचा ताण येत आहे. आपले काम पाहून शेजारच्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने साहजिकच विस्कळितपणा वाढत असल्याचे दिसते. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.



आज वित्त विभागाने सेविका,मिनी सेविका व मदतनिसांची मंजूर पदांच्या संकेत रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.यापूर्वी काही जिल्ह्यात ही पदे ५० टक्के प्रमाणात भरली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे रिक्त असलेली २० हजार १८३ पदे भरण्यास आजच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे.



भरती प्रक्रियेच्या वेगळ्यावेगळ्या निकषानुसार ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून भविष्यात मंजूर पदसंख्येच्या प्रमाणात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवावी, असे आदेश देखील शासनाने दिल्याने यापुढे रिक्त होणारी पदे वेळेत भरली जातील, अशी अपेक्षा वाढली आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2023 Details​

Name of DepartmentWomen and Child Development Department Maharashtra
Name of PostWorker, Mini worker, Supervisor and Asha Swayamsevika
Total PostVarious Posts
Apply ModeOnline Application Forms
StateMaharashtra
Official Website

Women and Child Development Department Maharashtra will release Anganwadi Recruitment 2023 Out Very Soon for 5000+ Posts. Interested candidates can check Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Notification Details at below. Registration Date, education Qualification, Age Limit, Salary, Selection Process etc.


प्रिय उमेदवारांनो, तुम्ही महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023 (Maharashtra Anganwadi Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा [ICDS] अंगणवाडी पर्यवेक्षक, मदतनीस, कार्यकर्ता पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
Ne.gif

  • पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षक, मदतनीस, कार्यकर्ता
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Maharashtra Anganwadi Bharti 2023 Notification & Online Form

Organization NameIntegrated Child Development Service [ICDS]
Post nameAnganwadi Supervisor, Helper, Worker
Total postsUpdate Soon
Job locationMaharashtra
Application started oncoming soon
Last date to applyUpdate Soon
CategoryRecruitment
Websiteicds.gov.in

Here you may find information about the Maharashtra Anganwadi Recruitment 2023 District-wise Jobs application form. The Government of Integrated Child Development Service [ICDS] will publish soon recruitment notice for the positions of Supervisor, Sevika, Sahayika, Sahayak, and AWH/AWW. Before the deadline, interested and qualified candidates must submit the online application. The age restriction, educational requirements, salary, vacancy, and other information is shown below for interest individuals to review.​

Maharashtra Anganwadi Recruitment 2023 – Educational Qualification

Name of Posts Qualification
Anganwadi Helper 8th Pass
Anganwadi Worker 10th pass
Supervisor Graduate

Anganwadi Bharti 2023 Age Criteria

  • अंगणवाडी भरती 2023 करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Maharashtra Anganwadi Application Fees

  • General. OBC – Rs. 300/-
  • SC/ ST/ PWD – Rs. 100/-

Salary Details in ICDS

  • वेतनश्रेणी – रु. 8,000/- ते 15,000/- प्रति महिना

How to Apply For Maharashtra Anganwadi Jobs

  • 1. The candidate has to visit the official website then new screen will open with various links.
  • 2. Download Maharashtra Anganwadi Recruitment Notification PDF, Read Complete Vacancy Details. 3. If you sure that you have complete eligibility then can participate in the recruitment 4. Click on Apply Online Form. After that new screen will open
  • 5. Fill your complete details in the application form and upload the scanned documents.
  • 6. Before submitting the final submit button re-check your filled application form.
  • 7. The applicant should pay the specified fee through any of the four modes of online payment. Separate instructions have to be followed for each mode of payment.
  • 8. After the payment of fee, PDF will be generated for Maharashtra Anganwadi Application Form 2023 which contains the details submitted by the candidate. The ID Number in the PDF Application Form is to be quoted for future reference.

Maharashtra Anganwadi Recruitment – District Wise

  • पुणे अंगणवाडी भरती 2023

  • भंडारा अंगणवाडी भरती 2023

  • चंद्रपूर अंगणवाडी भरती 2023

  • गोंदिया अंगणवाडी भरती 2023

  • वर्धा अंगणवाडी भरती 2023

  • अहमदनगर अंगणवाडी भरती 2023

  • धुळे अंगणवाडी भरती 2023

  • नाशिक अंगणवाडी भरती 2023

  • औरंगाबाद अंगणवाडी भरती 2023

  • नागपूर अंगणवाडी भरती 2023

  • अमरावती अंगणवाडी भरती 2023

  • बुलढाणा अंगणवाडी भरती 2023

  • यवतमाळअंगणवाडी भरती 2023

  • वाशीम अंगणवाडी भरती 2023

  • नंदुरबार अंगणवाडी भरती 2023

  • सांगली अंगणवाडी भरती 2023

  • सातारा अंगणवाडी भरती 2023

  • सिंधुदुर्ग अंगणवाडी भरती 2023

  • अकोला अंगणवाडी भरती 2023

  • कोल्हापूर अंगणवाडी भरती 2023

  • सातारा अंगणवाडी भरती 2023

  • गडचिरोली अंगणवाडी भरती 2023

  • बीड अंगणवाडी भरती 2023

  • जालना अंगणवाडी भरती 2023

  • उस्मानाबाद अंगणवाडी भरती 2023

  • लातूर अंगणवाडी भरती 2023

  • जालना अंगणवाडी भरती 2023

  • नांदेड अंगणवाडी भरती 2023

  • हिंगोली अंगणवाडी भरती 2023

  • परभणी अंगणवाडी भरती 2023

  • रत्नागिरी अंगणवाडी भरती 2023

  • जळगाव अंगणवाडी भरती 2023

  • सोलापूर अंगणवाडी भरती 2023

  • ठाणे अंगणवाडी भरती 2023

  • पालघर अंगणवाडी भरती 2023

  • रायगड अंगणवाडी भरती 2023



Previous Update-

Maharashtra Anganwadi Bharti 2022


Maharashtra Anganwadi Bharti 2022 : There are a total of 581 Anganwadi worker posts vacant in the District. This recruitment has not been conducted last 3 years. For more details about Maharashtra Anganwadi Recruitment 2022, Anganwadi Bharti 2022, Anganwadi Bharti 2022 Online Form, Anganwadi Bharti Maharashtra, visit our website . Further details are as follows:-​

जिल्हाभरात अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या तब्बल 581 जागा रिक्त आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. रिक्त जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कामाचा अतिरिक्‍त भार वाढला आहे.​

Ne.gif


Ne.gif


  • अंगणवाडीकडे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून पाहिले जाते.​
  • बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासन त्यांच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे.​
  • रिक्त जागामुळे अंगणवाडीतील बालकांचे भवितव्य अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत.
  • अनेक नजीकच्या अंगणवाडी सेविकांना रिक्त पदावरील अंगणवाडीचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे, मात्र त्याकडे त्यांना पूर्ण वेळ देता येत नसल्याने येथील अनेक बालकेही दुर्लक्षित ठरत आहेत.
  • सहा महिन्यांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडून रिक्त जागांच्या 50 टक्के जागा भरण्याचा आदेश आला.
  • या आदेशात 31 डिसेंबर 2019 पूर्वी रिक्त झालेल्या जागाना प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले होते.
  • त्यानुसार 50 टक्के जागा भरुनदेखील गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात आजपर्यंत 581 कर्मचार्‍यांच्या जागा या रिक्त आहेत.
  • येत्या काळात लवकर या जागा न भरल्यास अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Anganwadi Bharti 2022 – Vacancy Details


फक्त सोलापुरात ही परिस्थिती नसून अशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अंगणवाडीत काम करणारे कर्मचारी कमी मानधनावर प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. असे असतानाही कमी मानधनासाठी कर्मचार्‍यांची नियुक्‍ती राज्य शासनाकडून होत नसल्याने पालकांत शासनाच्या विरोधात रोष बळावत आहे. अक्कलकोट तालुक्यात सेविका 16, मिनी सेविका 3, मदतनीस 55, बार्शी तालुक्यात सेविका 12, मिनी सेविका 1, मदतनीस 30, वैराग सेविका 8, मदतनीस 20, करमाळा तालुक्यात सेविका 17, मिनी सेविका 1, मदतनीस 25. माढा तालुक्यात सेविका 2, मिनी सेविका 1, मदतनीस 22, कुर्डूवाडी आणि टेंभुर्णी येथे सेविका 6, मदतनीस 11, माळशिरस तालुक्यात सेविका 18, मिनी सेविका 1, मदतनीस 19, अकलूज येथे सेविका 17, मदतनीस 31. मंगळवेढा तालुक्यात सेविका 1, मिनी सेविका 1, मदतनीस 26, मोहोळ तालुक्यात सेविका 13, मिनी सेविका 5, मदतनीस 29, उत्तर सोलापूर सेविका 13, मदतनीस 20, पंढरपूर 1 सेविका 9, मदतनीस 36, पंढरपूर क्र. 2 येथे सेविका 9, मदतनीस 24, सांगोला तालुक्यात सेविका 3, मिनी सेविका 1, मदतनीस 10, कोळा येथे सेविका 11, मिनी सेविका 2, मदतनीस 9, दक्षिण सोलापूर येथे 9, मदतनीस 34 अशा जागा रिक्त आहेत.

जी रिक्त पदे होतील, त्यातील 50 टक्के पदांची भरती करण्याचा शासनाचा आदेश होता. त्यानुसार सर्व पदे भरण्यात आली आहेत. जानेवारी 2020 पासूनची रिक्त पदे शिल्लक आहेत. शासनाचा आदेश येताच रिक्‍त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच करण्यात येईल.

– जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प. सोलापूर

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock